News Flash

कृषी विस्तार व्यवस्थापन अभ्यासक्रम

वयोमर्यादा- अर्जदारांचे वय सर्वसाधारपणे ४५ वर्षांहून अधिक नसावे.

कृषी विस्तार व्यवस्थापन

केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालय व कृषी आणि शेतकरी कल्याण विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चर एक्स्टेन्शन मॅनेजमेंट- मॅनेज, हैदराबाद येथे दूरस्थ शिक्षण पद्धतीअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या कृषी विस्तार- व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
आवश्यक शैक्षणिक अर्हता- अर्जदार कृषी अथवा संबंधित विभागातील पदवीधर असावेत किंवा ते कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांना कृषी क्षेत्र,
सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्था, शेतकरी
संस्था इत्यादींमध्ये काम करण्याचा
अनुभव असावा.
वयोमर्यादा- अर्जदारांचे वय सर्वसाधारपणे ४५ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट विशिष्ट परिस्थितीत शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती- अर्जदारांची शैक्षणिक अर्हता व कृषीसंबंधित क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे त्यांना अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येईल. दूरस्थ शिक्षणपद्धतीवर आधारित या अभ्यासक्रमाचे माध्यम हिंदी व इंग्रजी राहील. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष असेल.
अर्जासह पाठवायचे शुल्क- अर्जदारांनी अभ्यासक्रम शुल्क म्हणून आपल्या अर्जासह १५ हजार रुपयांचा ‘मॅनेज हैदराबाद’ यांच्या नावे असणारा व हैदराबाद येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहिती- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी इन्स्टिटय़ूटच्या www.manage.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत- विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज डायरेक्टर अ‍ॅण्ड प्रिन्सिपल
को- ऑर्डिनेटर (पीजीडीएईएम), नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल एक्स्टेन्शन मॅनेजमेंट (मॅनेज) राजेंद्रनगर, हैदराबाद -५०००३० या पत्त्यावर १५ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत. ल्ल ल्ल

करिअर संधी
हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण विकास, कृषी तसेच पशुवैद्यक, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, विपणन, ग्रामीण भागातील आर्थिक सेवा, सहकारी
व बहुउद्देशीय संस्था यांमधील नोकरीच्या संधीसोबत ग्रामीण स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 12:08 am

Web Title: article on agricultural extension management courses
Next Stories
1 पटकथालेखनाकडे वळताना..
2 ‘एल अ‍ॅण्ड टी’ची बिल्ड इंडिया स्कॉलरशिप
3 जनसंपर्क सल्लागार
Just Now!
X