विद्यापीठ विश्व

प्रथमेश आडविलकर

mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

विद्यापीठाची ओळख

यू शिकागो किंवा यू ऑफ सी या नावाने सर्वत्र परिचित असलेले आणि अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील शिकागो या शहरात वसलेले ‘शिकागो विद्यापीठ’ हे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जगातले नवव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. तत्कालीन अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक जॉन रॉकफेलर यांच्या पुढाकाराने या विद्यापीठाची स्थापना १८९० साली झाली. शिकागो विद्यापीठातील अर्थशास्त्र व व्यवसाय शिक्षण विभाग हे जगातील नामांकित शैक्षणिक केंद्र आहेत. जागतिक अर्थकारणावर असलेल्या त्यांच्या प्रभावामुळे शिकागो हे जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपकी एक आहे. शिकागो विद्यापीठ हे खासगी विद्यापीठ असून ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणारे संशोधन विद्यापीठ आहे. ’ let knowledge grow from more to more and so be human life enrichedहे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.

शिकागो विद्यापीठ एकूण २१७ एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. विद्यापीठाच्या या कॅम्पसमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, पाच शैक्षणिक संशोधन विभाग आणि सात व्यावसायिक विभागांद्वारे चालतात. आज शिकागोमध्ये सुमारे तीन हजार प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत. तर जवळपास पंधरा हजारांहून अधिक पदवी-पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम

शिकागो विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. विद्यापीठाने समाजशास्त्र, कायदा, अर्थशास्त्र, साहित्यिक टीका, धर्म विभागांसह इतर अनेक शैक्षणिक विषयांच्या विकासात प्रमुख भूमिका बजावली आहे. विद्यापीठामध्ये साहित्य, समाजशास्त्र, गणित, अभियांत्रिकी, कला आणि विज्ञान विभागही आहेत. मात्र शिकागो विद्यापीठ आपल्या व्यावसायिक स्कूल्ससाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे अधिक विद्यार्थी या विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात. प्रमुख पाच विभागांमध्ये जीवशास्त्र, समाजशास्त्र, भौतिकशास्त्र, मॉलिक्युलर इंजिनीअिरग आणि मानववंशशास्त्र या विभागांचा तर व्यावसायिक विभागांमध्ये प्रिझ्झर स्कूल ऑफ मेडिसिन, जगप्रसिद्ध असे बूथ स्कूल ऑफ बिझिनेस, लॉ स्कूल, स्कूल ऑफ सोशल सíव्हस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, ग्रॅहम स्कूल ऑफ कंटिन्युइंग लिबरल अ‍ॅण्ड प्रोफेशनल स्टडीज, हॅरिस स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी स्टडीज इत्यादी स्कूल्सचा समावेश आहे. विद्यापीठातील या सर्व स्कूल्सच्या अंतर्गत सर्व पदवी, पदव्युत्तर व संशोधन विभाग चालतात. शिकागोमधील या स्कूल्सच्या माध्यमातून, विद्यापीठ ५१ मेजर्स आणि ३३ मायनर्स म्हणजेच पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रम चालवते. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टििफकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना त्या त्या कार्यक्षेत्रातील विविध संस्थांची मान्यता मिळालेली आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि िस्प्रग या दोन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. विद्यापीठामध्ये बायोइंजिनीअिरग, कॉम्प्युटर सायन्स, अर्थशास्त्र, इतिहास, भाषाशास्त्र, तर्कशास्त्र, राज्यशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संगीत, इंग्रजी, मानसशास्त्र इत्यादी विषयांपासून ते युरोपियन सायन्स, अ‍ॅटमॉसफिअरिक अ‍ॅण्ड प्लॅनेटरी सायन्स, जेनेटिक्स, सर्जरी, बायोइंजिनीअरिंग, न्युरोलॉजी, न्युरोबायोलॉजी इत्यादी हजारो विषय उपलब्ध आहेत.

सुविधा

शिकागो विद्यापीठातील शिक्षण जरी अतिशय महाग असले तरी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच, विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या आवारात विवाहित व अविवाहित विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा बहाल करण्यात येते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

वैशिष्टय़

शिकागोच्या भौतिकशास्त्र विभाग आणि मेट लॅबने दुसऱ्या विश्वयुद्धाच्या मॅनहॅटन प्रकल्प प्रयत्नांचा मुख्य भाग असलेल्या व जगातील पहिली अणुविभाजन क्रिया  (शिकागो पाइल -१) विकसित करण्यात मदत केली. विद्यापीठाच्या संशोधन प्रयत्नांमध्ये फेर्मी नॅशनल एक्सलेटर प्रयोगशाळा (fermi national accelerator laboratory) आणि आरगॉन नॅशनल लॅबोरेटरी (argonne national laboratory) तसेच मरिन बायोलॉजिकल प्रयोगशाळेचे व्यवस्थापन इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. विद्यापीठाचे स्वत:चे स्वतंत्र प्रकाशनगृह आहे. शिकागो युनिव्हर्सटिी प्रेस हे अमेरिकेतील सर्वात मोठे विद्यापीठ प्रकाशनगृह आहे. २०२१पर्यंत अमेरिकेचे पूर्व अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नावे असलेल्या बराक ओबामा अध्यापन केंद्र विद्यापीठात सुरू होईल.

शिकागोच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये, जगविख्यात अर्थतज्ज्ञ फ्रीडमन, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला, ओरॅकलचे संस्थापक-संचालक लॅरी एलिसन व उद्योगजगतातील अनेक नामवंतांचा समावेश आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांनी काही काळ शिकागो विद्यापीठात अध्यापन केले होते. ऑक्टोबर २०१८ पर्यंतच्या सांख्यिकीनुसार, आतापर्यंतचे एकूण ९८ नोबेल पारितोषिक विजेते आणि चार टय़ुरिंग पुरस्कार विजेते या विद्यापीठाशी विद्यार्थी वा प्राध्यापक म्हणून संलग्न होते. म्हणजेच ते विद्यापीठात विद्यार्थी वा प्राध्यापक होते/आहेत.

संकेतस्थळ :

http://www.uchicago.edu/