‘नि कमार’ म्हणजेच नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च येथे उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
० पुणे, हैदराबाद, गोवा, इंदूर व दिल्ली येथे उपलब्ध असणारा दोन वर्षे कालावधीचा अ‍ॅडव्हान्स्ड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
० पुणे येथे उपलब्ध असणारा प्रोजेक्ट इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
० पुणे येथे उपलब्ध असणारा रिअल इस्टेट अ‍ॅण्ड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर विषयातील
पदव्युत्तर अभ्यासक्रम.
० पुणे येथे उपलब्ध असणारा इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स, डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
० पुणे येथे उपलब्ध असणारा मॅनेजमेंट ऑफ फॅमिली अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन बिझनेस या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
० हैदराबाद येथे उपलब्ध असणारा क्वान्टिटी सव्‍‌र्हेइंग अ‍ॅण्ड कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
० हैदराबाद येथे उपलब्ध असणारा हेल्थ सेफ्टी व एन्व्हायर्नमेंट विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
निवड प्रक्रिया- अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येऊन त्याआधारे त्यांना प्रवेश देण्यात येईल.
अधिक माहिती- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘निकमार’च्या http://www.nicmar.ac.in किंवा admission.nicmar.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च (निकमार) २५/१, बालेवाडी, नॅशनल इन्शुरन्स अकादमी पोस्ट ऑफिस, पुणे- ४११०४५ या पत्त्यावर
१५ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

अर्ज व माहितीपत्रक
उमेदवारांना एका अभ्यासक्रमाचा प्रवेश अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवी असल्यास त्यांनी १९०० रु. चा व एकाहून अधिक अभ्यासक्रमासाठी २५०० रु. चा ‘एनआयसीएमएआर, पुणे’ यांच्या नावाने असणारा व पुणे येथे देय असलेला
डिमांड ड्राफ्ट विनंतीअर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.