18 November 2019

News Flash

यूपीएससीची तयारी : निबंध – विषयांचे आव्हान

आजच्या लेखात आपण यूपीएससीच्या निबंधाच्या पेपरची नेमकी मागणी काय असते हे पाहणार आहोत.

(संग्रहित छायाचित्र)

अपर्णा दीक्षित

आजच्या लेखात आपण यूपीएससीच्या निबंधाच्या पेपरची नेमकी मागणी काय असते हे पाहणार आहोत. २०१८ मध्ये विचारल्या गेलेल्या विषयांची यादी पुढीलप्रमाणे –

Section – A

(1)  Alternative technologies for a climate change resilient India.

(2)  A good life is one inspired by love and guided by knowledge

(3)  Poverty anywhere is a threat to prosperity everywhere

(4)  Management of Indian border disputes – a complex task

Section – B

(1)  Customary morality cannot be a guide to modern life

(2)  The pastl is a permanent dimension of human consciousness and values

(3)  A people that values its privileges above its principles loses both

(4)  Reality does not conform to the ideal, but confirms it

वरील विषयांची यादी पाहता असे लक्षात येते की, एकूणच विषय आव्हानात्मक आहेत. शाळा कॉलेजमध्ये ज्याप्रमाणे निबंध विषयांची निवड केली जात असे, तशी निवड यूपीएससी करताना दिसत नाही. त्याचबरोबर सर्वच विषय भारताच्या संदर्भातच लिहायचे आहेत असे बंधन नाही. त्याबद्दल सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे.

सर्वसाधारणत: सुविचारांवर आधारित, तत्त्वज्ञानाचा पाया असणारे, किंवा जे अमूर्त विषय असतात, ते विषय लिहिणे जसे आव्हानात्मक असते तसेच गुणांच्या बाबतीत हमखास परतावा देणारेही असतात. या विषयांवर निबंध लिहीत असताना भारतातील उदाहरणे आणि संदर्भ देत असतानाच जागतिक स्तरावरील उदाहरणे आणि संदर्भही जरूर द्यावेत. वरील यादीतील अ भागातील तिसऱ्या विषयात ज्याप्रमाणे भारतातल्या शिक्षण व्यवस्थेवर टिप्पणी करू शकतो, त्याचप्रमाणे जागतिक पातळीवरील अनेक उत्तम शैक्षणिक व्यवस्थांची उदाहरणेही देऊ शकतो. याप्रकारच्या निबंधांमधून व्यक्ती म्हणून आपण कोण आहोत त्याची प्रगल्भता विविध उदाहरणे, दाखले, नमुने यांतून देता येते. असे करत असताना साहित्य, चित्रपट, संगीत, जगाचा इतिहास या सगळ्यातले संदर्भ वापरत लिखाण समृद्ध करता येते.

याउलट सामान्य अध्ययनाशी निगडित विषय निवडत असताना एखाद्या विषयात आपण किती खोलवर जाऊ शकतो, विषयाची गुंतागुंत किती प्रगल्भ होणे उलगडून दाखवू शकतो याचा कस लागतो. हे निबंध शक्यतो भारतीय वास्तवाला धरून लिहावेत. चर्चेच्या अनुषंगाने जागतिक पातळीवरचे मुद्दे येण्यास हरकत नाही, मात्र आपल्या आजुबाजूच्या वास्तवाचे आपल्याला भान आहे हे दाखवण्यासाठीची, हा निबंध ही उत्तम संधी आहे. आता आपण २०१८ मध्ये विचारण्यात आलेल्या निबंधांच्या विषयांचे लिखाण करताना येणाऱ्या व आलेल्या आव्हानांची थोडक्यात चर्चा करूया.

Section – A मधील पहिल्या विषयासाठी लिखाण करताना Alt. tech – resilient म्हणजे काय? या शब्दाला विशेष अर्थ आहे. त्या अर्थाच्या जवळ जाणाऱ्या- अनेक गोष्टी हवामान बदलाच्या संदर्भात बोलल्या जातात. उदा. Adaptetion किंवा mitigation  पण fesilient म्हणजे संकटाचा मुकाबला करण्याची क्षमता वा उपाययोजना निर्माण करून ठेवणे असा अर्थ अपेक्षित आहे. शिवाय Alt. techue म्हणजे काय याचे ही विशेष ज्ञान असणे अपेक्षित होते. म्हणजे आता वापरात असलेल्या तंत्रज्ञानाला जास्त पर्यावरणपूरक पर्याय असणे असा त्याचा अर्थ होतो. हे सर्व आयाम लक्षात घेऊन लिखाण करणे हे या विषयासाठीचे आव्हान होते.

Section – A मधील दुसरा विषय हा Bertrand Russell चे वाक्य आहे. फक्त प्रेम आणि ज्ञान या संकल्पनांविषयी आपल्याला असलेल्या माहितीच्या आधारे १०००-१२०० शब्द लिहिणे हे आव्हानच आहे. यासाठी एक चांगला मार्ग म्हणजे मुळातच इतर विचारवंतांनी याबद्दल काय म्हटले आहे वा नीतिशास्त्रामध्ये यावर काही भाष्य केले आहे हे लक्षात घेऊन लिखाण करणे. तसेच साहित्य, तत्त्वज्ञान ही सर्व याबद्दल काय बोलतात हे लक्षात घ्यावे.

Section – A मधील तिसऱ्या विषयाचे लिखाण करण्यासाठी  GS1 आणि GS2 मधील ज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. त्यात गरिबी कशी मोजली जाते. त्यासाठी कोणकोणते निर्देशांक वापरले जातात, इतरत्र त्यांचा वापर कसा केला जातो. याबरोबरच वर्गभेदाकडे कसे बघितले जाते. ‘वर्ग’ ही संकल्पना काय आहे. याचं ज्ञानदेखील आवश्यक होते.

Section – A मधील चौथ्या विषयाचे लिखाण करताना सीमा प्रश्न कसे सोडवले जातात याचे ज्ञान असणे आवश्यक होते. त्यामध्येही भारताचे सीमाप्रश्न काय आहेत आणि ते सोडवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न आणि त्यांचे यश वा अपयश यांची कारणमीमांसा करून हे काम कसे क्लिष्ट आहे हे दाखवणे अपेक्षित होते.

Section – B मधील पहिला विषय हा तुलनेने सोपा होता. यामध्ये हे दाखविणे अपेक्षित होते की, मुल्ये ही स्थळ-काळानुसार बदलत असतात. जसजशा आधुनिकतेबद्दलच्या संकल्पना बदलतात तसतशा मूल्यांबद्दलच्याही संकल्पना बदलतात. त्यामुळे पारंपरिक मूल्यव्यवस्था वा शहाणपण तोकडे वाटायला लागते आणि म्हणून आधुनिक जीवनामध्ये मार्ग दाखविण्यासाठी ती पुरेशी ठरत नाही याचे दाखले देणे अपेक्षित होते.

Section – B मधील दुसरा विषय हा Eric Hobbsman या विचारवंतांचे वाक्य आहे. यामध्ये प्रामुख्याने तीन बाबींचा विचार करणे अपेक्षित होते. ते म्हणजे Human consciousness म्हणजे काय Values वा मूल्य म्हणजे काय? आणि past वा भूतकाळ वा संचित म्हणजे काय. तसेच या तीन संकल्पनांमधील परस्परसंबंधांची गुंतागुंत लक्षात घेऊन लिखाण करणे अपेक्षित होते.

Section – B मधील तिसरा विषय हा Dwight Eisenhower यांचा सुविचार आहे. जरी वरवर पाहता हे वाक्य Philosophical’ वाटत असले तरी यामध्ये समाजशास्त्राच्या जवळ जाणारे असे काहीतरी आहे. कारण Privilege वा विशेषाधिकार ही संकल्पना मुळातच समाजशास्त्रीय आहे. समाजामध्ये कोणाला हे विशेषाधिकार असतात, ते का प्राप्त होतात. ते जन्माने प्राप्त होतात की, कष्टाने प्राप्त होतात. या सर्वाचा अभ्यास GS1, GS2 आणि GS3 मध्ये केला असेल तर त्याच्या मदतीने निबंध लिहिता येणे शक्य होते. तसेच या विषयातील नतिक प्रश्नावर देखील लिहिता येणे शक्य होते.

Section – इ मधील चौथा विषय हा सर्वात अवघड विषय होता. यामध्ये तीन गोष्टींवर लक्ष देणे अपेक्षित होते. त्या म्हणजे पहिली Reality वा वास्तव म्हणजे काय, दुसरी आदर्श म्हणजे काय, तिसरी म्हणजे Conform आणि Confirm यांच्या अर्थातील फरक. या सर्व संकल्पनांचा अर्थ लक्षात घेऊन Gustav Flaubert यांच्या या वाक्याचा अर्थ उलगडून सांगणे आव्हानात्मक होते.

First Published on June 20, 2019 12:26 am

Web Title: article on essay challenge of subjects
Just Now!
X