06 August 2020

News Flash

दृष्टिकोन

दृष्टिकोन म्हणजे डोळस भान जगण्याची सकारात्मक जाण

| February 10, 2014 01:12 am

दृष्टिकोन म्हणजे डोळस भान
जगण्याची सकारात्मक जाण

हत्ती आणि सात आंधळे
किंवा एव्हरेस्ट सर करणारा
अंध गिर्यारोहक एरिक वाईहेनमेर
गोष्ट कोणाचीही, कोणतीही असो;
दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.

जगताना चुकत-माकत
शहाणपण मिळत जातं.
वागताना कळत-नकळत
डोळसपण जगण्यात येतं.
पेला अर्धा भरलेला की रिकामा
जे दिसतं त्याकडे कसं पाहतो,
ते महत्त्वाचं असतंच, पण
आयुष्यात जे घडतं त्याकडे
कोणत्या नजरेतून बघतो आपण
ते जीवनमोलाचं असतं; कारण
पाहणं आणि दिसणं यातला
तिसरा कोन दृष्टीचा असतो.

समोर मार्ग आणि संधी असताना
डोळस असूनही बरेचजण
चाचपडत असतात; तर काही
समस्यांतून.. संकटांतूनही
माग काढीत.. मात करीत
संधी निर्माण करीत असतात.

का? कसं? कशासाठी?
शिकायचं, मिळवायचं आणि
जगायचं, हे मिळवायचं आणि
जगायचं.. हे पक्कं ठरलं की
वाट आणि दिशा.. दृष्टीच्या
टप्प्यात उजळायला लागते.

मार्ग दिसत नसला तरीही
नव्यानं वाट तयार होत जाते,
त्याकरिता जगताना हवा असतो,
एकलव्याचा लक्ष्यवेधी
सकारात्मक दृष्टिकोन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2014 1:12 am

Web Title: aspects
Next Stories
1 कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांची तयारी
2 यूपीएससी/ एमपीएससी (मुख्य परीक्षा ) – स्वातंत्र्योत्तर भारत
3 आधुनिक जगाचा इतिहास
Just Now!
X