05 August 2020

News Flash

एमपीएससी मंत्र : सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्वपरीक्षा विश्लेषण

सन २०१७ मध्ये गट क संवर्गातील सहायक मोटार वाहन निरीक्षक या तांत्रिक पदाच्या भरतीसाठीचा नवा पॅटर्न लागू करण्यात आला

(संग्रहित छायाचित्र)

फारुक नाईकवाडे

सन २०१७ मध्ये गट क संवर्गातील सहायक मोटार वाहन निरीक्षक या तांत्रिक पदाच्या भरतीसाठीचा नवा पॅटर्न लागू करण्यात आला. या पॅटर्ननुसार परीक्षा आत्तापर्यंत केवळ २०१७सालीच झाली आहे. त्यामुळे आता २०२०मध्ये या पदासाठीची भरती होण्याची शक्यता गृहीत धरता येईल.

सन २०१७ मध्ये झालेल्या पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केल्यास पुढील तयारीसाठी उपयुक्त ठरेल. विचारण्यात आलेल्या प्रश्नांची घटकनिहाय संख्या सोबतच्या कोष्टकामध्ये देण्यात आली आहे.

सन २०१७च्या पूर्वपरीक्षेतील काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू. या प्रश्नांतील योग्य उत्तराचा पर्याय ठळक केलेला आहे.

*  प्रश्न –  खालीलपकी कोणता दिवस हा महाराष्ट्रातील वृक्षरोपणासाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंदला गेला?

१)   १ जुलै २०१६

२)   १५ जुलै २०१५

३)   ९ ऑगस्ट २०१६

४)  १५ ऑगस्ट २०१६

*       प्रश्न – ओटावा करारासंबंधी योग्य विधान ओळखा.

१)   ओटावा करार सांस्कृतिक देवाणघेवाणीविषयी होता.

२)   ब्रिटिश साम्राज्यातील उद्योगप्रधान राष्ट्रांनी परस्परांना जकात सवलती द्याव्यात.

३)   हुकूमशहांना आळा घालण्यासाठी हा करार होता.

४)   भारतीय कृषी उद्योगाचा विकास करण्यासाठी हा करार होता.

 

*      प्रश्न – वेस्टर्न ब्लॉटिंग कसल्या संशोधनासाठी वापरतात?

१) आरएनए    २) प्रथिने

३) डीएनए     ४) कर्बोदके

*       प्रश्न-  जेव्हा —– स्त्रियांनी इल्बर्ट बीलमधील ‘भारतीय न्यायाधीशांना युरोपियनांसंबंधी खटले चालविण्यास परवानगी दिली’ या गोष्टीला पाठिंबा देणारे पत्र लिहिले, तेव्हा पुरुषांचा स्त्रियांच्या स्वतंत्रता आंदोलनातील सहभागाविषयीचा दृष्टिकोन बदलला.

१) महाराष्ट्रीयन २) गुजराती         ३) बंगाली          ४) पंजाबी

*       प्रश्न – महाराष्ट्राच्या खालील हवामान विभागांचा काळजीपूर्वक अभ्यास करा.

  1. i) उष्णकटिबंधीय वर्षां अरण्यांचा विभाग -अट
  2. ii) उष्णकटिबंधीय निम्नशुष्क किंवा स्टेपी हवामानाच प्रदेश- इर

iii) उष्णकटिबंधीय दमट, कोरडे किंवा मानसून सॉव्हाना हवामानाचे प्रदेश – AW

वरील हवामान विभाग खालीलपकी कोणत्या हवामान शास्त्रज्ञाशी / शास्त्रज्ञांशी संबंधित आहेत?

  1. a) डॉ. त्रिवार्था b) कुमारी सेंपल
  2. c) कोप्पेन d) थॉर्नवेट

उत्तरांसाठी पर्याय –

१) a, c आणि d

२) c आणि d

३) फक्त a

४) फक्त b

*       प्रश्न – जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार हा (कलम २१) ——-

१)   राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात.

२)   सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती निलंबित करू शकतात.

३)   सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वमंजुरीने राष्ट्रपती केव्हाही निलंबित करू शकतात.

४)   कोणत्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाही.

*       प्रश्न – स्नो टायर सोडून सर्व टायरसाठी खालीलपकी कोणता पर्याय युनिफॉर्म टायर ग्रेडिंग्साठी वापरला जातो?

१)   टायरमधील हवेचा दाब, टायरचे मटेरियल, ट्रेडची मांडणी

२)   ट्रेडची झीज, ट्रक्शन, उष्मारोधक

३)   ट्रेडची झीज, ट्रेडची मांडणी

४)   वरीलपकी कोणतेही नाही.

*       प्रश्न – उच्च दाबाची कुलिंग सिस्टीम याकरिता वापरतात की—–

१)   सिस्टीममध्ये कुलंट हे उच्च तापमान ठेवून न उकळता सरक्युलेट केले जाते.

२)   सिस्टीममध्ये कुलंट हे कमी तापमान देऊन न उकळता सरक्युलेट केले जाते.

३)   कुलंट वाया जाते तेव्हा सिस्टीममधून वाफ व गळती होते.

४)   वरीलपैकी कोणतेही नाही.

या प्रातिनिधिक प्रश्नांच्या आधारे पुढील बाबी अभ्यास करताना लक्षात घ्यायला हव्यात.

*  सामान्य अध्ययन घटकामधील उपघटकांवरील प्रश्नांची संख्या प्रत्येक वेळी एकसारखी राहण्याची शक्यता नाही. प्रत्येक उपघटकावर किमान पाच प्रश्न विचारण्यात येतील याची दक्षता घेऊन सर्व सहा घटकांचे मिळून ५० प्रश्न विचारले जाण्याची शक्यता गृहीत धरता येईल.

*  काही घटकांवर सरळसोट तर नागरिकशास्त्रासारख्या घटकावर सर्वच प्रश्न बहुविधानी अशी पद्धत वापरलेली आहे. मात्र प्रश्नांचे स्वरूप प्रत्येक वेळी प्रत्येक घटकासाठी एकसारखेच असेल असे नाही. त्यामुळे प्रत्येक घटकासाठी मूलभूत संकल्पना समजून घेणे आणि तथ्यांचा नेमका अभ्यास आवश्यक आहे.

*   सामाजिक सुधारणा मुद्यावर तथ्यात्मक प्रश्नांची अपेक्षा जास्त असली तरी समाजसुधारकांबाबत नेमकी माहिती असणे बहुविधानी प्रश्नांसाठी आवश्यक असल्याचे दिसते.

*  बुद्धिमत्ता चाचणीमध्ये गणितावर आधारित प्रश्नांची संख्या कमी आहे. व्यक्ती व त्यांच्या वैशिष्टय़ांचे संयोजन, अनुमान, निष्कर्ष, तर्कक्षमता (Syllogism) यावरील प्रश्नांची संख्या जास्त आहे. एकूणच अभाषिक तार्किक क्षमतेपेक्षा भाषिक तार्किक क्षमतेवर आधारीत प्रश्नांची संख्या जास्त आहे.

*   अभ्यासक्रमामध्ये यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी संबंधित चालू घडामोडी असा उल्लेख असला तरी प्रश्नांचे विश्लेषण केल्यावर लक्षात येते की प्रत्यक्षात यंत्र व स्वयंचल अभियांत्रिकी क्षेत्रातील उपयोजनावर (Application of Mechanical and Automobile Engineering) प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे अभ्यास करताना ’चालू घडामोडी’ याचा अर्थ या क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान आणि पारंपरिक तंत्रज्ञानाचे उपयोजन असा अभिप्रेत आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

वरील विश्लेषणाच्या आधारे पूर्वपरीक्षेची तयारी कशा प्रकारे करता येईल याबाबत पुढील लेखांमध्ये चर्चा करण्यात येईल.

घटक विषय        प्रश्नसंख्या

सामाजिक व औद्योगिक सुधारणा         ७

सामान्य विज्ञान         ९

इतिहास       ७

भूगोल        ९

नागरिकशास्त्र       ८

चालू घडामोडी       १०

एकूण सामान्य अध्ययन        ५०

बुद्धिमापनविषयक प्रश्न         ३०

यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी संबंधित चालू घडामोडी           २०

एकूण         १००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2019 12:09 am

Web Title: assistant motor vehicle inspector retrospective analysis abn 97
Next Stories
1 स्पगेटी फोंतानेला
2 एमपीएससी मंत्र : सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा योजना
3 शब्दबोध : चमचा
Just Now!
X