बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे पिलानी व हैद्राबाद येथे बीफार्म (ऑनर्स) या पदवी अभ्यासक्रमासाठी   पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक शैक्षणिक पात्रता  : अर्जदार विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र वा गणित हे विषय घेऊन किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व असावे. जे विद्यार्थी यंदा वरील विषयांसह बारावीच्या परीक्षेला बसले असतील तेसुद्धा या अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
निवड पद्धती: अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे घेण्यात येणाऱ्या बीआयटीएसएटी- २०१५ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. अर्जदारांची बारावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी व बीआयटीएसएटी या प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना बीफार्म अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क: अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून पुरुष उमेदवारांनी २०९० रु. (महिला उमेदवारांसाठी १५९०) रु. भरणे आवश्यक आहे.
संपर्क: अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्सच्या http//www.bitsadmission.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:  विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज अधिष्ठाता (प्रवेश), बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स, पिलानी ३३३०३१ (राज) येथे २० फेब्रुवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.