25 April 2019

News Flash

करिअरन्यास

मुंबईतील शैक्षणिक संस्थेमधून एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. एमबीएच्या प्रवेशासाठी दहावीत किती टक्के गुण मिळायला हवे? एमबीए अभ्यासक्रम किती वर्षांचा असतो?

| August 10, 2015 01:01 am

मुंबईतील शैक्षणिक संस्थेमधून एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. एमबीएच्या प्रवेशासाठी दहावीत किती टक्के गुण मिळायला हवे? एमबीए अभ्यासक्रम किती वर्षांचा असतो?
– सोनाली तुळसकर, विलेपाल्रे.
एमबीएसाठी दहावीची टक्केवारी लक्षात घेतली जात नाही. दोन वष्रे कालावधीच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पदवी परीक्षेत किमान ४५ ते ५० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक ठरते. एमबीए प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. मुंबईमध्ये एस. पी. जैन इन्स्टिटय़ूट, जमनालाल बजाज, नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट आदी अनेक संस्था आहेत. प्रत्येक संस्थेचे शुल्क
वेगवेगळे असते.

मी बीकॉम मागच्या वर्षी उत्तीर्ण झालो. त्यानंतर मी विधी शाखेच्या प्रथम वर्षांला प्रवेश घेतला, पण मी प्रथम वर्षांत नापास झालो. आता मी एमबीए करण्याचा विचार करत आहे. मी विधी शाखा सोडून एमबीएला प्रवेश घेऊ की विधी शाखेचाच अभ्यास करू? आणखी काय करता येईल, याची मला माहिती हवी होती.
– गौरव भावसार, मालेगाव.
गौरव, धरसोडवृत्तीने फारसे काहीच साध्य होत नाही. वेळ आणि पसा वाया जातो. कुणाच्या तरी सांगण्यावरून तू विधी शाखेला प्रवेश घेतलेला दिसतोस. आता कुणाच्या तरी सांगण्यावरून एमबीएला जाण्याचा विचार तुझ्या मनात आला आहे. समजा, एमबीएच्या प्रथम वर्षांला अनुत्तीर्ण झाल्यास तू पुन्हा तिसरा अभ्यासक्रम करशील का? आपल्याला गती आणि आवड कशात आहे हे बघणे महत्त्वाचे. केवळ एखादा अभ्यासक्रम केल्याने लगेच चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध होत नाहीत. विधी शाखेतील प्रथम वर्षांत अनुत्तीर्ण कोणत्या कारणांमुळे झालास याचा प्रामाणिकपणे
शोध घे. टाइमपास म्हणून या शाखेला प्रवेश घेतला असशील तर निकाल असाच लागू शकतो. विधी विषयाचा अभ्यास उत्तम केलास, त्यात चांगले ज्ञान प्राप्त केलेस तर या क्षेत्रात उत्तम संधी मिळू शकतात.

मी अलीकडेच इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन या विषयात बीई केले आहे. या क्षेत्रामध्ये उत्तम करिअर करण्यासाठी आणखी कोणते अभ्यासक्रम किंवा अल्प कालावधीचे पदविका अभ्यासक्रम करणे अपेक्षित आहे? हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या शिक्षणसंस्था कोणत्या? त्यानंतर शासकीय अथवा खासगी दूरसंचार कंपनीमध्ये काम करता
येईल का?
– हेमांगी थोरात
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फॉम्रेशन टेक्नालॉजी या संस्थेने काही पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. पत्ता- पोस्ट बॉक्स नंबर, ५, एनआयटी कॅम्पस, पोस्ट ऑफिस,
कालिकत- ६७३६०१. ईमेल- mtech@calicut.nielit.gov.in
वेबसाइट- calicut.nielit.gov.in उत्तम शैक्षणिक गुणवत्ता, प्रवेश परीक्षा, मुलाखत या टप्प्यांवर यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना या क्षेत्रात संधी मिळू शकते.

मला जेनेटिक्स विषयात संशोधन करायचे आहे. त्यासाठी मी काय करू? मी दहावी उत्तीर्ण आहे.
– ओम माटे
आधी तुला जीवशास्त्र या विषयासह बारावी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. त्यानंतर बीएएस्सी, एमएस्सी केल्यानंतर संशोधन करण्यास तू पात्र ठरू शकशील. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च या संस्थेत पाच वष्रे कालावधीचा बीएस-एमएस हा डय़ुएल पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम विज्ञान शाखेतील संशोधनाला प्राधान्य देणारा आहे. हा अभ्यासक्रम केल्यानंतर आपल्या आवडीच्या विषयात संशोधन करण्याची संधी मिळू शकते. या संस्थेचे कॅम्पस पुणे, भोपाळ, मोहाली आदी ठिकाणी आहे. प्रवेशासाठी जेईई- अॅडव्हान्स्डचे गुण ग्राह्य धरले
जातात. शिवाय ही संस्था स्वतंत्र प्रवेश
परीक्षाही घेते.

मी दहावी उत्तीर्ण असून मला कार डिझायिनगमध्ये रस आहे. पण कोणता अभ्यासक्रम करावा याबाबत मी गोंधळलो आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
– नितेश तळेकर
तू प्रॉडक्ट डिझाइनचा अभ्यासक्रम करणे श्रेयस्कर ठरेल. त्यासाठी तुला बारावीनंतर बॅचरल ऑफ डिझाइन इन प्रॉडक्ट डिझायिनग हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. हा अभ्यासक्रम एनआयडी अहमदाबाद, आयआयटी मुंबई, एमआयटी पुणे आदी संस्थांमध्ये करता येईल. या संस्थांमधील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते.
मी बारावीचा विद्यार्थी असून मला व्यापारासंबंधित अभ्यासक्रम करायचा आहे. बारावीनंतर मी कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ?
– पीयूष पालस्कर
तुला नेमका कुठला व्यवसाय करायचा आहे, हे आधी ठरवावे लागेल. वडिलोपार्जति व्यवसाय असल्यास तो अधिक उत्तम आणि प्रभावीरीत्या करण्यासाठी फॅमिली बिझनेस मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम करणे सोईस्कर ठरते. मात्र हे अभ्यासक्रम पदव्युत्तर आहेत. बारावीनंतर पाच वष्रे कालावधीचे बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ, रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, आयआयएम इंदौर, गीतम युनिव्हर्सटिी आदी संस्थांनी सुरू केले आहेत. पदवी घेतल्यानंतर दोन वष्रे कालवधीचा एमबीए किंवा एमएमएस अभ्यासक्रम करता येऊ शकतो. बारावीनंतर बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन हा तीन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम आता सर्वत्र उपलब्ध आहे.

यूपीएससीचे माध्यम कोणते असते आणि निबंधलेखन फक्त इंग्रजीमध्ये करायचे असते का?
– प्रताप सुरवसे
संघ लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा परीक्षा देशाच्या कोणत्याही अधिकृत भाषेतून देता येते. तुम्ही मराठीतूनही परीक्षा देऊ शकता. परीक्षेचा पेपर मात्र इंग्रजी आणि िहदी भाषेत असतो. निबंधाचा पेपर इंग्रजीतूनच सोडवावा लागतो.
मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए राज्यशास्त्र केले आहे. मी बारावी नापास आहे. मी एम.ए. करू शकेन का?
– अप्पासाहेब मगर
आपल्याला एम.ए करण्यास कोणतीही अडचण येऊ नये.

मी आठ वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठातून एम. कॉम (फायनान्स) पूर्ण केले. मला आता पीएच.डी करायचे आहे. पुणे, मुंबई विद्यापीठांपेक्षा हा अभ्यासक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अथवा टिळक विद्यापीठामधून करणे योग्य ठरेल का? पीएच.डी करण्याआधी एम.फिल. करणे आवश्यक आहे का? पी.एचडीनंतर संधी काय आहेत? अध्यापन क्षेत्रात येण्यासाठी पीएच.डीनंतर नेट/सेट करणे आवश्यक असते का? – श्व्ोता बोधे
आठ वर्षांच्या कालावधीनंतर आपल्याला नेमक्या कोणत्या कारणासाठी पीएच.डी करायची आहे, याची स्वयंस्पष्टता आपल्या मनात असणे आवश्यक आहे. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पीएच.डी करण्यास हरकत नाही. तथापि, पुणे/ मुंबई विद्यापीठातून पीएच.डी अभ्यासक्रम करता आल्यास उत्तम. आपल्याकडे पदव्युत्तर पदवी या अर्हतेवर विविध प्रकारच्या संधी मिळू शकतात. त्यामुळे पीएच.डी केल्यावरच लगेच उत्तमोत्तम संधी मिळू शकतात, असे नाही. पीएच.डी असल्यास इतर उमेदवारांपेक्षा कदाचित एक पाऊल पुढे राहता येईल. पण त्यामुळे इतरांपेक्षा लगेच पुढे जाता येईल असे सहसा होत नाही. आपल्याला कोणत्या विषयात पीएच.डी करायची आहे हे एकदा स्पष्ट झाल्यावर त्या क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनात्मक संधी मिळू शकते. अध्यापनाचे क्षेत्र उपलब्ध आहेच. पीएच.डी पूर्ण केल्यास नेट/सेट करण्याची
गरज नाही.

मी २००५ मध्ये बारावी झालो. त्यानंतर काही कारणास्तव मी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकलो नाही. बारावीनंतर मी सहा महिने कालावधीचा ग्राफिकशी संबंधित अभ्यासक्रम केला. त्यामध्ये मी फोटोशॉप, कोरल ड्रॉ, फ्लॅश हे विषय शिकलो, पण त्यानंतर मी मित्रांच्या, नातेवाईकांच्या सांगण्यावरून पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. पण माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले नाही. या दोन-तीन वर्षांत मी फोटोग्राफिक इचिंग या प्रकारातील कामे करत होतो. शिवाय रंगभूमी/नाटय़ क्षेत्रातही काम करत होतो. आता माझे वय २९ आहे. मी अजूनही स्थिरस्थावर झालेलो नाही. मी मुलाखतीसाठी जातो तेव्हा ग्राफिक्सशी संबंधित पोर्टफोलिओ विचारतात. कृपया मार्गदर्शन करावे.
– इंद्रजित
इंद्रजित, तू अतिशय सविस्तररीत्या प्रश्न विचारला आहे. या प्रश्नात अनेक उपप्रश्न आहेत. तुझ्यासारख्याच अनेकांना या टप्प्यातून जावे लागते. त्यांच्यासाठीही हे उत्तर उपयुक्त ठरू शकते. आजच्या स्पध्रेच्या युगात तुम्ही जे कोणते क्षेत्र निवडाल त्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला अतिशय परिश्रम घ्यावे लागतात. त्याला पर्याय नाही. आपली बुद्धिमत्ता आणि परिस्थिती बघूनच कोणत्याही विषयाची निवड करावी. आपल्याला कशात अधिक रूची आहे हे आपल्याशिवाय इतरांना कळणे तसे कठीण आहे. त्यामुळे कुणाच्या तरी सांगण्यावरून असा निर्णय घेणे टाळायला हवे. कारण सांगणाऱ्यांना कोणत्याही समस्यांना तोड द्यायचे नसते. ते तुम्हांलाच द्यावे लागते. तुम्ही जे एखादे क्षेत्र निवडता त्यात अधिकाधिक गुणवत्ता मिळवायला हवी. लगेचच यश कोणत्याच क्षेत्रात मिळत नाही. तू काही वष्रे ग्राफिक्सचे काम केले आहेस. त्यात तू टिकून राहायला हवे होते. त्यात सध्या नवी नवी सॉफ्टवेअर येत आहेत, ती शिकून घे. यावर लक्ष केंद्रित केल्यास तुझ्या कामाचा दर्जा निश्चित वाढू शकतो. तुला अभिनयात रस नाही हे स्वत:च कबूल केलेस. स्वत:मधील कमतरता कळणे हा मोठा गुण आहे. तू अभिनयाच्या क्षेत्रापासून दूर हो. त्यामुळे वेळ वाचेल आणि तुझ्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करता येईल. पोर्टफोलिओ म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात (तुझ्या बाबतीत ग्राफिक्स) जे काही केले त्याची माहिती/छायाचित्रे यांचे प्रभावीरीत्या सादरीकरण. पोर्टफोलिओ बघून विषयाबाबतचे तुमचे प्रात्यक्षिक ज्ञान किती आहे, याची चाचपणी केली जाते.

मी २०११ साली देवगड येथून ६६ टक्के गुण घेऊन एसएससी केले. त्यानंतर आíथक परिस्थितीमुळे मी पुढील शिक्षण घेऊ शकले नाही. सध्या मुंबईत येऊन मी घरकाम करीत असते. आता मला पुढील शिक्षणासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत?
– करिष्मा पाटील
आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून पदवी अभ्यासक्रम करू शकता. हा अभ्यासक्रम केल्यावर तुम्हाला राज्य सरकारच्या विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेला बसता येऊ शकेल. आपण टायिपग अथवा शॉर्टहँडचे अभ्याक्रमही करू शकता. चांगल्या लघू टंकलेखकांना उत्तम मागणी आहे. शासकीय कार्यालयांमध्येही लघुलेखकांची सातत्याने गरज भासते. आपण कॅटेिरग, बेकरी, ब्युटिशियन, हाऊसकीिपग, ट्रॅव्हल मॅनेजमेंट यांसारखे अल्प मुदतीचे अभ्यासक्रमही करता येतील. आपल्याला नेमकी कशामध्ये आवड आणि गती आहे हे या अनुषंगाने महत्त्वाचे ठरते.

अभ्यासक्रम, करिअर संधी विषयक
आपले प्रश्न
career.vruttant@expressindia.com
या पत्त्यावर पाठवावेत.

First Published on August 10, 2015 1:01 am

Web Title: career guidance 2
टॅग Career Guidance