द इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकाऊंटस् ऑफ इंडियातर्फे घेण्यात येणाऱ्या फाऊंडेशन व इंटरमीजिएट अभ्यासक्रमांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
फाऊंडेशन अभ्यासक्रम : अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
शैक्षणिक शुल्क : फाऊंडेशन अभ्यासक्रमासाठी मौखिक व टपालद्वारा देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांकडून ३५०० रु. शैक्षणिक शुल्क आकारण्यात येईल.
इंटरमीजिएट अभ्यासक्रमासाठी आवश्यक पात्रता : इंटरमीजिएट अभ्यासक्रमासाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी फाऊंडेशन अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा अथवा ते कुठल्याही विषयातील पदवीधर असायला हवेत.
शैक्षणिक शुल्क : इंटरमीजिएट अभ्यासक्रमासाठी मौखिक मार्गदर्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून १५७००, तर टपालाद्वारे मार्गदर्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून १९७०० रु. शैक्षणिक शुल्क आकारण्यात येईल.
अंतिम अभ्यासक्रम : अंतिम अभ्यासक्रमाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेचा इंटरमीजिएट अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
शैक्षणिक शुल्क : अंतिम अभ्यासक्रमासाठी मौखिक मार्गदर्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ११५०० रु., तर टपालाद्वारे मार्गदर्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून १६५०० रु. शैक्षणिक शुल्क आकारण्यात येईल.
भविष्यकालीन संधी : इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकाऊंटस् ऑफ इंडियाचे वरील अभ्यासक्रम पूर्ण करून पात्रताधारक झालेल्या विद्यार्थ्यांना विविध कायदे आणि नियमांनुसार ऑडिट करणे व विविध कायद्यांतर्गत कागदपत्र वा रिटर्नस् दाखल करण्यासाठी अधिस्वीकृती मिळेल.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती, तपशील व माहितीपत्रकासाठी इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकाऊंटस् ऑफ इंडिया, चौथा मजला, रोहित चेंबर्स, जन्मभूमी मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे अथवा दूरध्वनी क्र. ०२२-२२०४३४१६, २२८४११३८ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.icmai.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
ज्या विद्यार्थ्यांना दि इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकाऊंटस् ऑफ इंडियाचा सीएमए अभ्यासक्रम करून आपले करिअर करायचे असेल अशांसाठी हे अभ्यासक्रम फायदेशीर ठरू शकतात.