मला बारावीमध्ये ८२ टक्के गुण मिळाले असून मी पुण्यात विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांत शिकते. मला ‘इन्स्पायर’ शिष्यवृत्ती प्रमाणपत्र मिळाले आहे. ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठीची प्रक्रिया सांगाल का?- विधी केतकर

ही शिष्यवृत्ती बीएस्सी प्रथम वर्षांची तुमची गुणपत्रिका आणि प्रगती अहवाल प्राप्त झाल्यावर दिली जाईल. तुमची शैक्षणिक कामगिरी समाधानकारक असल्यास बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षांला एक लाख २० हजार रुपये दिले जातील.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहिराती साधारणत: ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. कृपया त्याकडे लक्ष ठेवावे. http://www.online-inspire.gov.in. या वेबपोर्टलवर अर्ज भरण्याच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध करून देण्यात येते. अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन भरता येतो. मात्र ऑनलाइन अर्ज भरल्यास उत्तम. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर असल्याने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपासून साधारणत: चार महिन्यांनंतर शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे कळविण्यात येते. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पोर्टलवरून शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्याचे पत्र डाऊनलोड करावे. कृपया डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी भवन, न्यू मेहरुली रोड, नवी दिल्ली- ११००१६ या पत्त्यावर संपर्क साधावा.
वेबसाइट- http://www.inspire-dst.gov.in online- http://www.inspire-dst.gov.in she. ईमेल- inspire-dst@nic.in

मी आता कला शाखेच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. मला पदवीसाठी अर्थशास्त्र विषय घ्यायचा आहे. या विषयातील करिअर संधींची माहिती सांगाल का?
– अभिजीत रणशूर
तुम्ही अर्थशास्त्र हा विषय नक्कीच घ्या. या विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर पुढील करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात- वित्तीय सल्लागार, सिक्युरिटिज अॅनॅलिस्ट, ऑपरेशन अॅनॅलिस्ट, बिझनेस अॅनॅलिस्ट, मॅनेजमेंट कन्सल्टंट, ट्रस्ट ऑफिसर, इक्विटी ट्रेडर, अॅसेट मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट बँकर, कॉस्ट एस्टिमेटर, इकॉनॉमिस्ट अॅनालिस्ट, रिडेव्हलपमेंट स्पेशालिस्ट, पब्लिक युटिलिटिज मॅनेजर, अर्बन प्लॅिनग रिसर्च असिस्टंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कोऑíडनेटर, रिजनल आणि अर्बन प्लानर, प्रोग्रॅम अॅनॅलिस्ट, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह अॅनॅलिस्ट, पॉलिसी कोऑíडनेटर, बजेट अॅनालिस्ट, पब्लिक सेक्टर अॅनालिस्ट, ट्रेड पॉलिसी अॅनालिस्ट, रिसर्च असोसिएट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट असिस्टंट, रिअल इस्टेट व्हॅल्युएशन असोसिएट, प्रॉपर्टी मॅनेजर, अर्बन प्लॅिनग रिसर्च असिस्टंट, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट रिसर्चर, अॅक्विझिशन अॅनॅलिस्ट, अर्थविषयक सल्लागार, फायनान्शिअल प्लॅनर, स्टॉक ब्रोकर, पॉलिसी अॅनालिस्ट, डेमोग्राफर, अर्थपत्रकारिता, संशोधक, संख्याविश्लेषक किंवा इंडियन इकॉनॉमिक सíव्हस ही परीक्षा देऊन केंद्र सरकारच्या अर्थ विभागात उत्तम दर्जाची नोकरी मिळू शकते किंवा महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणूनही संधी मिळू शकते. शासकीय सेवा,बँका, वित्तीय संस्था, कॉर्पोरेट्स या ठिकाणी अशा संधी उपलब्ध असतात.

वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण होऊन १२ वष्रे उलटली आहेत. मला माझे सध्याचे क्षेत्र बदलायचे आहे. मला नवनवीन ठिकाणे बघायची आवड आहे. माझ्या आवडीशी सुसंगत ठरेल असे करिअर सुचवा.
– सम्राट लबडे
आपण बारावी करून खूप कालावधी उलटला आहे. तसेच सध्या आपण कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहात हे आपल्या प्रश्नावरून स्पष्ट होत नाही. मार्केटिंग, एक्स्पोर्ट, इम्पोर्ट किंवा इंटरनॅशनल बिझनेस या विषयांमध्ये तज्ज्ञता प्राप्त केल्यास किंवा अनुभव असल्यास नवनवीन ठिकाणे फिरण्याची तुमची आवड पूर्ण होऊ शकेल. पण त्यासाठी तुम्हाला या विषयांमध्ये पदविका/ पदवी/ प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर चांगल्या कंपन्या किंवा संस्थांमध्ये अनुभव घ्यायला हवा. त्यात आपल्या गुणवत्तेनुसार किंवा इतरांपेक्षा वेगळे काम करून दाखवले तर संस्था व्यवस्थापक संधी देऊ शकतात. संबंधित विषयांतील अभ्यासक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातूनही करता येऊ शकतात.

माझ्या मुलीने बी.एस्सी. फॉरेन्सिकमध्ये प्रवेश घेतला आहे. या क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी आहेत?
– सतीश सुर्वे
या क्षेत्रातील तज्ज्ञांना करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळा, सीआयडी, सीबीआय, पोलीस दल, बँका, विमा कंपन्या, कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये या तज्ज्ञांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. स्वत:ची प्रयोगशाळा उघडून स्वयंरोजगारही करता येऊ शकतो. अधिक कौशल्य आणि प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तमोत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात.

मला आíकटेक्चर करायचे आहे. या विषयाला कितपत संधी आहे? सेट डिझायिनगला किती संधी आहे?
– तेजस्विनी वायळ
आíकटेक्चर या विद्याशाखेला कायमच मोठी मागणी राहिली आहे. मात्र त्यासाठी या विषयामध्ये मनापासून रस असायला हवा. या क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार त्याला संधी उपलब्ध होतात. आíकटेक्चर अभ्यासक्रम केल्यावर सेट डिझायनिंग हे करिअर करणे सुलभ जाऊ शकते. सध्या विविध चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, लग्नादी सभारंभ किंवा इतर मनोरंजनाचे कार्यक्रम यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सेट उभारावे लागतात. त्यामुळे या क्षेत्रातही उत्तम करिअर करता येऊ शकतं.
(करिअर अथवा अभ्यासक्रमासंबंधीचे आपले प्रश्न career.vruttant@expressindia.com
या पत्त्यावर पाठवावेत.)