मला अर्थशास्त्रात एम.ए. परीक्षेत ४९ टक्के गुण मिळाले आहेत. मला अर्थशास्त्राशी संबंधित कुठले करिअर करता येईल?
    – रवींद्र म्हाब्दी
आपल्याला गुण कमी असले तरी निराश होऊ नये. अर्थशास्त्राच्या संकल्पना उत्तम रीतीने अवगत असल्यास आपण संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ‘इंडियन इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिक्स’ ही परीक्षा देऊ शकता. केंद्र सरकारच्या अर्थ आणि सांख्यिकी खात्यातील वरिष्ठ पदांसाठीच्या भरतीसाठी ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते. संघ लोकसेवा आयोगामार्फतच घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचाही आपण विचार करावा. मुख्य परीक्षेत आपण अर्थशास्त्र हा विषय एक पर्यायी विषय म्हणून निवडू शकता. नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यास अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होता येईल. प्रसारमाध्यमांमध्ये अर्थशास्त्र या विषयावर लेखन करणाऱ्या तज्ज्ञांची गरज भासते. आपण पत्रकारितेचा अभ्यासक्रम करून माध्यमांमध्ये करिअर करायचे ठरवल्यास अर्थविषयक पुरवणी /अर्थविषयक स्तंभ अथवा चालू घडामोडींवर विश्लेषण करण्यासंबंधीचे काम करण्याची संधी मिळू शकते.

मी यशवंतराव मुक्त विद्यापीठामधून बी.ए. पूर्ण केले असून सध्या नोकरी करत आहे.  नोकरी करत असताना एखाद्या विदेशी विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम  बहि:स्थ शिक्षणाद्वारे पूर्ण करता येईल का?
    – लक्ष्मण सोळुंके, देगलूर
परदेशी विद्यापीठांच्या दूरस्थ शिक्षण संस्थेमार्फत काही विषयांतील पदवी, पदव्युत्तर, प्रमाणपत्र असे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. आपल्याला नेमक्या कोणत्या विषयात पदव्युत्तर पदवी करायची आहे, हे निश्चित करा. अमेरिकेतील युनिव्हर्सटिी ऑफ फ्लोरिडा, ड्रेक्सेल युनिव्हर्सटिी-फिलाडेल्फिया, अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क युनिव्हर्सटिी, ओहिओ स्टेट युनिव्हर्सटिी, युनिव्हर्सटिी ऑफ सेंट्रल फ्लोरिडा, युनिव्हर्सटिी ऑफ मिशिगन, युनिव्हर्सटिी ऑफ वॉिशग्टन, बोस्टन युनिव्हर्सटिी आदी विद्यापीठांमध्ये विविध विद्याशाखांशी संबंधित ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

 मी बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स पूर्ण केले आहे. मला स्पर्धा परीक्षांची वा इतर पर्यायांची माहिती द्यावी?
    – महेंद्र चौधरी
राजपत्रित अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी राज्य आणि लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आपण देऊ शकता. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कारकून वा प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा देऊ शकता. राज्य लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक वा पोलीस उपनिरीक्षक या पदांसाठी स्वतंत्ररीत्या परीक्षा घेतल्या जातात, त्याही तुम्ही देऊ शकता. लिखाणाची आवड असल्यास आपण पत्रकारितेचा अभ्यासक्रम करून त्या क्षेत्रात प्रवेश करू शकता. संगणकीय प्रोग्रॅिमगसंबंधित विविध भाषांवर प्रभुत्व मिळवल्यास तेही क्षेत्र तुम्हाला करिअरसाठी उपलब्ध होऊ शकेल. आपली गती आणि आवड कशामध्ये आहे, ही बाब महत्त्वाची ठरते.

मी २६ वर्षांचा असून माझे बारावी विज्ञान शाखेतून पूर्ण झाले आहे. मला ऑफशोअर इंडस्ट्री, रिग्ज, प्लॅटफॉर्म यासंबंधित करिअर करायचे आहे अथवा बारावीच्या आधारे शििपगमध्ये ऑफिससंबंधित अभ्यासक्रम पूर्ण करायचे आहे.
    – सतीश कांबळे
आपले वय अधिक झाल्याने बारावीनंतरच्या नॉटिकल सायन्स अथवा मरिन इंजिनीअिरग अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकणार नाही. तथापि, आपण अ‍ॅकॅडेमी ऑफ मेरिटाइम एज्युकेशन अ‍ॅण्ड ट्रेिनग या संस्थेचे काही प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करू शकाल.
उद्योगावर आधारित पदविका अभ्यासक्रम पोस्ट डिप्लोमा इन शिप बिल्डिंग टेक्नॉलॉजी/ कालावधी- सहा महिने, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन  ड्रेजिंग  टेक्नॉलॉजी/ कालावधी- एक वर्ष, डिप्लोमा इन नेव्हल आíकटेक्चर अ‍ॅण्ड ऑफशोअर टेक्नॉलॉजी/ कालावधी- तीन वर्षे (अर्हता- दहावी किंवा बारावी/ निवड-निवड चाचणी आणि मुलाखत/ संधी- शिपयार्ड, डॉकयार्ड, शिप डिझाइन).
या संस्थेने अल्प मुदतीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू केले आहेत –
१) सर्टििफकेट कोर्स इन मरिन करोजन कंट्रोल, कालावधी- सहा महिने,  सर्टििफकेट कोर्स इन शिप बििल्डग टेक्नॉलॉजी, कालावधी- सहा महिने,  सर्टििफकेट कोर्स इन शिप/ ऑफशोअर स्ट्रक्चर डिझाइन, कालावधी- सहा महिने. पत्ता- एएमईटी युनिव्हर्सटिी, नंबर १३५, ईस्ट कोस्ट रोड,
कनाथूर ६०३११२, चेन्नई.  
वेबसाइट- http://www.ametuniv.ac.in
ईमेल- office@ametuniv.ac.in

   मी मेकॅनिकल इंजिनीअिरगच्या पदविका अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांला आहे. या क्षेत्रासंबंधीचे करिअर उत्तम व्हावे, म्हणून काय करता येईल? मला पदवी अभ्यासक्रम परदेशातील विद्यापीठातून पूर्ण करायचा आहे.  
 – महेश कावडे
आधी तुम्ही उत्तम गुणांनी तंत्र निकेतनाची पदविका उत्तीर्ण व्हा. त्यानंतर दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मेकॅनिकलच्या दुसऱ्या वर्षांला प्रवेश मिळवा. अभियांत्रिकीची पदवी उत्तम गुणांनी उत्तीर्ण करा. त्यानंतर परदेशातील एमएस अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करा. आपल्याला कोणत्या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवायची आहे, ते निश्चित करा. परदेशातील शिक्षणासाठी बराच खर्च येतो. तो करण्याची आपल्या पालकांची तयारी आहे का, हेही बघा. परदेशातील शिक्षणासाठी बँका कर्ज देतात. सध्या अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती दिली जाते. जीआरई आणि टॉफेल परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यास फीमध्ये काही प्रमाणात सवलत मिळू शकते.

मी बीएस्सी गणित केले असून सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मला मुक्त विद्यापीठातून गणितात एम.एस्सी. करता येईल का?
    – धनश्री पांडे
तुम्हाला इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामधून गणित विषयात एम.एस्सी करता येईल. मात्र
पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.