करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतावत असतात. तुमच्या प्रातिनिधिक आणि निवडक प्रश्नांची उत्तरे देणारे व्यासपीठ सुरू करीत आहोत-
करिअर मंत्र.  अभ्यासक्रमांसंदर्भातील तुमच्या शंका आम्हांला कळवा. तुमचे प्रश्न, शंका आम्हाला career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर जरूर कळवा अथवा करिअर वृत्तान्त, लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१० या पत्त्यावर लिहून पाठवा.
माझ्या मुलीने इतिहास विषय घेऊन पदवी प्राप्त केली आहे. तिला हेरिटेज मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कन्झर्वेशन स्टडीज या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम करायचा आहे. हा अभ्यासक्रम कुठे उपलब्ध आहे?
– नीना पेझारकर, मुंबई.

या विषयाशी संबधित अभ्यासक्रम दिल्लीच्या इन्स्टिटय़ूट ऑफ हेरिटेज अ‍ॅण्ड रिसर्च मॅनेजमेंट या संस्थेत करता येतो. या संस्थेत मास्टर ऑफ आíकऑलॉजी अ‍ॅण्ड हेरिटेज मॅनेजमेंट, मास्टर इन कन्झर्वेशन, प्रीझर्वेशन अ‍ॅण्ड हेरिटेज मॅनेजमेंट हे दोन अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. यंदा ही प्रवेशपरीक्षा २४ मे २०१४ ला होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०१४ ही आहे. या परीक्षेचा कालावधी सकाळी १०. ३० ते दुपारी १ असा आहे. परीक्षेचा निकाल ३ जून २०१४ रोजी घोषित केला जाईल.
परीक्षेचा अभ्यासक्रम- इंडियन हिस्ट्री, कल्चर अ‍ॅण्ड आíकऑलॉजी, म्युझियम्स ऑफ इंडिया, हेरिटेज टुरिझम, मॅनेजमेन्ट ऑफ हेरिटेज, हेरिटेज कन्झर्वेशन, भूगोल, नॅचरल हेरिटेज, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, बारावी स्तरावरील मूलभूत विज्ञान, कार्यकारणभाव यासारख्या विषयांवर प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारले जातील. ई-मेल- dirhm@bol.net.in
वेबसाईट- http://www. dihrm. delhigovt.nic.in/                      
संस्थेचा पत्ता-१८ ए सत्संग विहार मार्ग, कुतुब इन्स्टिटय़ूशनल एरिया, न्यू दिल्ली-११००६७.  
माझा मुलगा निनाद दहावीनंतर पेट्रोलियम इंजिनीअिरग करू इच्छितो. संस्थांची नावे सांगा?
– विकास धर्माधिकारी. पनवेल, रायगड.

दहावीनंतर पेट्रोलियम इंजिनीअिरग या विषयात पदविका अभ्यासक्रम सुरू असणाऱ्या शिक्षण संस्था सध्या तरी दिसत नाहीत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पेट्रोलियम अथवा पेट्रोकेमिकल इंजिनीअिरगमध्ये अभ्यासक्रम करता येऊ शकतो. त्यासाठी जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन ही परीक्षा द्यावी लागेल.
० लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठात  पेट्रोकेमिकल इंजिनीअिरग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र त्यासाठी बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
० केंद्र  सरकारच्या पेट्रोलियम अ‍ॅण्ड नॅचरल गॅस मंत्रालयानं राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना केली असून या संस्थेस आयआयटीसारखाच सेन्टर ऑफ एक्सलन्सचा दर्जा केंद्र सरकारने दिला आहे. या संस्थेनं बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन पेट्रोलियम इंजिनीअिरग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला जेईई – अ‍ॅडव्हान्सच्या गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांना बारावी विज्ञान परीक्षेत ६० टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती आणि जमातीच्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळायला हवेत.
पत्ता- राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, रातापूरचौक- २२९३१६, वेबसाइट- admissions @rgipt.ac.in
ई-मेल- admissions @rgipt.ac.in
 ० युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलियम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीजने ६ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन अप्लाइड पेट्रोलियम इंजिनीअिरग वुइथ स्पेशलायझेशन इन अपस्ट्रीम ६ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन अप्लाइड पेट्रोलियम इंजिनीअिरग वुईथ स्पेशलायझेशन इन गॅस स्ट्रिम ६ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन केमिकल इंजिनीअिरग वुईथ स्पेशलायझेशन इन रिफायिनग अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यूपीईएस इंजिनीअिरग अ‍ॅप्टिटय़ूूड टेस्ट दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात घेतली जाते. या परीक्षेचा कालावधी तीन तासांचा राहील. या परीक्षेची केंद्रे- मुंबई, भोपाळ, हैदराबाद, अहमदाबाद.
या परीक्षेत एकूण २०० गुणांचे प्रश्न विचारले जातील. परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीची राहील. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांवर प्रत्येकी ५० गुणांचे प्रश्न, इंग्रजी कॉम्प्रिहेन्शन ३० आणि चालू घडामोडींवर २० गुणांचे प्रश्न विचारले जातील.
अर्हता- विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत ८० टक्के आणि बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ८० टक्के गुण मिळाल्यास यूपीईएसईटी देण्याची आवश्यकता नाही. JEE-MAIN  उत्तीर्ण उमेदवारांना दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळायला हवेत. तसेच बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ६० टक्के गुण मिळायला हवे. JEE-MAIN मध्ये किमान एक लाखापर्यंत रँकिंग मिळायला हवे. पत्ता- यूपीईएस कॅम्पस,  पोस्ट ऑफिस -बिधोली व्हाया, प्रेमनगर डेहरादून-२४८००७. वेबसाइट-www.upes.ac.in
ई-मेल-enrollments@upes.ac.in.
 
 मला पीएसआय परीक्षेचा अभ्यासक्रम सांगा?
    – उमेश वाघ, िपपळनेर.
पीएसआय म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर-पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि शारीरिक क्षमता चाचणी अशा टप्प्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागते. प्राथमिक परीक्षा ही वस्तुनिष्ठ पद्धतीची असते. त्याचा अभ्यासक्रम सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे आहे- भारत आणि जागतिक भूगोल. यावर साधारणत: २० प्रश्न विचारले जाऊ शकतात. चालू घडामोडी – यावर साधारणत: २५ प्रश्न विचारले जाऊ शकतात. गणितावर २० प्रश्न विचारले जातात. भारतीय राजकीय व्यवस्था, पंचायत राज आणि अर्थशास्त्र या विषयावर २५ प्रश्न विचारले जाऊ शकतात. इतिहास, सामाजिक सुधारणा, सामान्य विज्ञान या विषयांमध्ये प्रत्येकी २० प्रश्न विचारले जातील. असे १५० प्रश्न या प्रश्नपत्रिकेत राहतील.  एकूण ३०० गुणांचे प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा बहुतेक सर्व जिल्ह्य़ांच्या मुख्यालयी होते.
 या परीक्षेद्वारे मुख्य परीक्षेसाठी एकूण जागांच्या उपलब्धतेनुसार विशिष्ट प्रमाणात उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेसाठी केली जाते. मुख्य परीक्षेमध्ये एकूण दोन पेपर्स असतात. हे पेपर्ससुद्धा वस्तुनिष्ठ पद्धतीचे राहतात. पेपर एकमध्ये इंग्रजीचे ७० आणि मराठीचे १३० गुणांचे प्रश्न असे २०० गुणांचे प्रश्न विचारले जातील. पेपर दुसरा हा सामान्य अध्ययानाचा आणि दोनशे गुणांचा राहतो. या प्रश्नपत्रिकेत कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि अर्थशास्त्र, इतिहास आणि सामाजिक सुधारणा, पंचायत राज, राजकीय व्यवस्था आणि सामान्य अध्ययन, संख्याशास्त्र आणि मानसिक क्षमता या घटकांवर प्रश्न विचारले जातात. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता चाचणीला सामोरे द्यावे लागेल. ही चाचणी २०० गुणांची असते. हा टप्पा यशस्वीपणे पार केलेल्या उमेदवारांची ७५ गुणांची मुलाखत घेतली जाते.
   
मी ४० वर्षांचा असून भारतीय लष्करातून पुढच्या वर्षी निवृत्त होत आहे. मला एमपीएससी परीक्षेला बसता येईल का?
– संभाजी पवार.
लष्कर किंवा शासकीय नोकरीत असलेल्या उमेदवारांना एमपीएससीच्या परीक्षेत वयोमर्यादेमध्ये सवलत दिली जाते. मात्र पदनिहाय या वयोमर्यादेत बदल होऊ शकतो. त्यासाठी विविध पदांच्या अर्हतेकडे लक्ष ठेवावे लागेल. एमपीएससीमार्फत विविध पदांच्या जाहिराती सातत्याने वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होतात. त्याविषयीची विस्तृत माहिती एमपीएससीचे संकेतस्थळ http://www.mpsc.gov.in/ यावर दिली जाते. त्यामुळे या संकेतस्थळाला दररोज भेट द्यावी.

मी राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलाजी या संस्थेतील इन्फम्रेशन टेक्नॉलॉजीच्या तिसऱ्या वर्षांला आहे. मला आता या टप्प्यावर माझ्या भविष्याविषयी मार्गदर्शनाची गरज आहे. असे मार्गदर्शन कुठे मिळेल?
– आदित्य जोशी, मुंबई.
आपण तिसऱ्या वर्षांला आहात. म्हणजेच एक वर्षांनंतर आपण पदवी प्राप्त करणार आहात. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या विर्षांच्या विद्यार्थ्यांने आता नव्याने काऊन्सेिलग करून घेण्याऐवजी शेवटच्या वर्षांच्या अभ्यासक्रमावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. अन्यथा आतापर्यंतचा वेळ, पसा आणि अभ्यास वाया जाऊ शकतो. बीटेक केल्यावर एमटेक किंवा एमबीए हे दोन पर्याय उपलब्ध होतात. परदेशात एमएस पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतो. बीटेकनंतर नोकरीही मिळू शकते. मात्र आपणास अभियांत्रिकी शिक्षणामध्ये रस आहे किंवा नाही हे आपल्या मनास स्वच्छपणे विचारावं लागेल. तीन वर्षे आपण हा अभ्यासक्रम करण्यात घालवलीत याचा सर्वसाधारण अर्थ आपणास अभियांत्रिकीमध्ये रस आहे असाच होतो. तसे नसेल तर मात्र आपणास नेमका कशात रस आहे हे ठरवावे लागेल. त्यानंतर पुढची दिशा स्पष्ट करता येऊ शकेल.

मी बीई अंतिम वर्षांची विद्याíथनी असून मला यूपीएससीच्या परीक्षेला बसावयाचे आहे. पण अनेकजण सांगतात की, आता फार उशीर झाला आहे. बीई केल्यावर मी यूपीएससीची तयारी करू शकते का?
– सुजाता कांबळे.
यूपीएससीच्या परीक्षेसाठी किमान अर्हता कोणत्याही विषयातील पदवी ही असते. त्यामुळे तू पदवीधर होत आहेस याचा अर्थ तू अगदी योग्य मार्गावर आहेस. यूपीएससीच्या परीक्षेची तयारी ही हळूहळू करावयाची असतेच, यात शंका नाही. कारण इंग्रजी, भाषा, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी यासारख्या विषयांचा अभ्यास ही कायम चालू असणारी प्रक्रिया आहे. त्याकडे लक्ष दिल्यास उत्तमच. नसले तरी विशेष काळजी करावयाचे कारण नाही. स्वत:ची बुद्धिमत्ता कशी आणि किती आहे, याचे चांगले आकलन प्रत्येक विद्यार्थ्यांला झालेले असते. त्यानुसार अभ्यासात झोकून द्यायचे असते.  वर्ष दोन वर्षे असे परीक्षातंत्र लक्षात घेऊन अभ्यास केल्यास यश दृष्टिक्षेपात येऊ शकते.