राज्यशास्त्र विषय घेऊन बीए केल्यास करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध होतील?
– सागर रौंडल
राज्यशास्त्र विषयामध्ये तुम्ही पदव्युत्तर पदवीनंतर नेट / सेट देऊन प्राध्यापक पदासाठी पात्र ठरू शकता. बीए केल्यावर एलएलबी करता येऊ शकते. केंद्र लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेसाठी राज्यशास्त्राचा पर्याय निवडता येतो. पदवी-पदव्युत्तर पदवी स्तरापर्यंतचा सविस्तर अभ्यास झाल्याने या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तम गुण मिळू शकतात. राजकीय व्यवस्था आणि विविध प्रणालींची इत्थंभूत माहिती मिळाल्याने राजकीय क्षेत्रात करिअर करता येऊ शकेल.

मी आयआयटी रुरुकीमधून सिव्हिल इजिंनीअिरगमध्ये बीटेक् केले आहे. सध्या मी वित्तीय ब्रोकरेज कंपनीत विश्लेषक म्हणून काम करतो. मला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करायचा आहे.  शाळेत असल्यापासून अॅस्ट्रोफिजिक्स विषयाची आवड असल्याने त्यामध्ये पीएचडी करावे असे वाटते. पण गेल्या काही दिवसांपासून मला वित्तीय क्षेत्रात रस वाटू लागला आहे. या क्षेत्रातील संधी आणि प्रगती याबद्दल माहिती आहे. अशा स्थितीत एमबीए (वित्त) करणे उचित ठरेल की अॅस्ट्रोफिजिक्समध्ये पीएचडी?
  – चिन्मय हजारे
तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलेले आहे. एकीकडे ज्ञात रस्ता आहे. दुसरीकडे अज्ञात मार्ग आहे. ज्ञात रस्त्याने गेल्यास धोके कमी असतात. पण यातून समाधान, आनंद कितपत मिळेल हे मोजता येणे कठीण. अज्ञात रस्त्याने जाणे म्हणजे आव्हानांचा स्वीकार करणे. कोणतेही आव्हान हे आपल्या क्षमतांची कसोटी पाहणारे असते. त्यात यशस्वी ठरण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज असते.
तुम्ही बी.टेक.नंतर सिव्हिल इंजिनीअिरग वा तत्सम विषयांमध्ये एम.टेक. न करता तुमच्यापुढे चालून आलेली वित्तीय क्षेत्रातील संधी तुम्ही स्वीकारलीत. याचा अर्थ करिअरबद्दल संकल्पना स्पष्ट आहेत. शिवाय आता तुम्हाला या क्षेत्रात रस निर्माण झाला आहे. या क्षेत्रातील पुढील प्रगतीच्या वाटा कोणत्या आहेत याचीही कल्पना आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या क्षेत्रात उडी मारण्याऐवजी एमबीए (वित्त) करणेच योग्य ठरेल. सारे जग अर्थकारणाभोवती फिरत असल्याने या करिअरमध्ये तुम्हाला हव्या त्या उंचीपर्यंत पोहोचता येऊ शकते.

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन
High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

मी कला शाखेत बीए केले आहे. त्यानंतर शिक्षण पदविका अभ्यासक्रम केला. सध्या इतिहास विषयात एमए करीत आहे. मला कुठल्या क्षेत्रांत करिअर करता येईल?
 – माधुरी ओम्बासे
एमए इतिहास आणि नेट/सेट/पीएचडी केल्यावर कनिष्ठ/ वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून संधी मिळू शकते. बीए आणि शिक्षण पदविका या शैक्षणिक गुणवत्तेवर शाळांमध्ये शिक्षक होता येईल. राज्य आणि केंद्रीय नागरी सेवा परीक्षांमधील एका विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी एमएपर्यंतचा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. इतिहास संशोधक म्हणूनही करिअर करता येते. म्युझिऑलिस्ट (वस्तुसंग्रहालय देखभालतज्ज्ञ) आणि ऑíकओलॉजिस्ट (पुरातन वास्तुशास्त्र), नाणेशास्त्र, इपिग्रॅफिस्ट (वास्तुलेखवाचन) यासारख्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. मात्र यासाठी इतिहासाचा अभ्यास मनापासून आणि सर्व संकल्पना स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक ठरते. इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ सनावळी आणि युद्धप्रसंगाचा अभ्यास नव्हे हे ध्यानात ठेवायला हवे.
 
मी बारावी कला शाखेत शिकत आहे. मला इतिहास, पुरातत्त्व, भारतविद्या, नाणकशास्त्र या विषयांची आवड आहे आणि या विषयांमध्ये करिअर करू इच्छितो. या विषयावरील पुढील अभ्यासक्रमांविषयी माहिती द्याल का?
 – दीपक पाटेकर
तुम्हाला इतिहास विषयात उत्तम करिअर करायचे असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑíकऑलाजी हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करायला हवा. हा अभ्यासक्रम केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आíकओलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडिया या संस्थेमार्फत चालवला जातो. एकूण १५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. उमेदवारांच्या निवडीसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. इतिहास विषयातील पदव्युत्तर पदवी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. अभ्यासक्रमाच्या दोन वर्षांच्या कालावधीत दरमहा आठ हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाते. पत्ता- डायरेक्टर, इन्स्टिटय़ुट ऑफ ऑíकऑलॉजी, आíकओलॉजिक सव्र्हे ऑफ इंडिया, रेड फोर्ट, दिल्ली- ११०००६.  संकेतस्थळ – http://www.asi.nic.in

मी बीकॉम केले आहे. त्याबरोबर एमएस- सीआयटी आणि टॅली (बेसिक्स) या क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी आहेत. उत्तम करिअरसाठी मी काय करू?
–  संभाजी मत्रे
वाणिज्य शाखेतील उमेदवारांना उत्तमोत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. एमबीए इन फायनान्स किंवा सीए करून वित्तीय क्षेत्रात उच्च पदी पोहोचणे शक्य आहे. स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड या क्षेत्रातही करिअर करता येऊ शकते. अकौंटन्सीमधील सर्व प्रमेय, सिद्धांत आणि संकल्पना स्पष्ट असल्यास बीकॉम, टॅली या शैक्षणिक अर्हतेवरही खासगी क्षेत्रात अकौंटंट म्हणून उत्तम करिअर करता येऊ शकते.

मी माहिती तंत्रज्ञानमधील पदविका प्राप्त केली आहे. आता अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. या सोबत मला आणखी कोणता अभ्यासक्रम करता येईल?
– प्रभू गोगटे
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची काठीण्यपातळी अधिक असते. अनेक विषय अभ्यासावे लागतात. बऱ्याच असाइनमेंट्स, प्रोजेक्टस् असतात. प्रत्येक सत्राच्या परीक्षेआधी अनेक परीक्षा होत असतात. त्यामुळे विद्यार्थी सतत व्यग्र असतो. नियमित अभ्यास करावा लागतो. अशा स्थितीत आणखी एखादा अभ्यासक्रम करणे मुश्कील आहे. त्यामुळे एकाही विषयाला न्याय देता येणार नाही.
 
मी सध्या बीएस्ससी संगणक विज्ञानाच्या अंतिम वर्षांला शिकत आहे. यानंतर एमसीएस करावे की एमसीए करावे? मला दोन्ही वर्षी पहिली श्रेणी मिळाली आहे. कॅम्पस इंटरव्ह्य़ूमध्ये यश मिळवण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत?  
– रोहित जोशी
 एमसीएस हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे तर एमसीए हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे एमसीएला एक वर्ष अधिक द्यावे लागते. एमसीएस केल्यावर नोकरीची संधी एक वर्ष आधीच मिळू शकते. एमसीएच्या प्रवेशासाठी गणित विषयासह कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांला प्रवेश मिळू शकतो. तर एमसीएसला बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स विद्यार्थ्यांला प्रवेश मिळू शकतो. आपल्याला बीएसस्सीला दोन्ही वर्षांमध्ये प्रथम श्रेणी मिळाली याचा अर्थ आपण उत्तमरीत्या हा अभ्यासक्रम करत आहात. आपल्याला गणितात गती असेल तरच एमसीएकडे वळावे. संकल्पना नीट स्पष्ट असल्यास आणि विषयांवर हुकूमत मिळवल्यास कोणत्याही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतल्याने फारसा फरक पडत नाही. खासगी क्षेत्रात तुम्ही प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग किती प्रभावीपणे करू शकता यावरच गतिमान प्रगती अवलंबून असते. कॅम्पस मुलाखतीसाठी येणारी तज्ज्ञ मंडळी उमेदवारांची हीच क्षमता वेगवेगळ्या पद्धतीने जोखत असतात.

मी बीएस्सी हॉर्टकिल्चर गेल्या वर्षी पूर्ण केले आहे.  करिअर पर्यायांची माहिती द्याल का?
 – निलेश दंदिले
तुम्ही एमएस्सी हॉर्टकिल्चर करायला हवे. शक्य असल्यास पुढे पीएचडीही करायला हवी. त्यामुळे संशोधन, उच्चशिक्षण, अन्नप्रक्रिया उद्योग यामध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. राज्य सेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या वन विभागासाठी लागणाऱ्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट या पदांसाठीच्या प्रवेश परीक्षेला बसू शकता. राज्य सरकारच्या कृषी विभागाला लागणाऱ्या प्रवर्ग एक आणि प्रवर्ग दोनच्या कृषी अधिकारीपदाच्या परीक्षेलाही तुम्हाला बसता येईल. भारतीय वन सेवासाठी तसेच बँकांच्या कृषी अधिकारी पदासाठी तुम्ही पात्र ठरू शकाल.                                     
(करिअर अथवा अभ्यासक्रमासंबंधीचे आपले प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवावेत.)