मी रयत शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षणसेवक म्हणून कार्यरत आहे. मला शिक्षणाधिकारी किंवा उपशिक्षणाधिकारी  व्हायचे आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
– सूरज दिवटे
शिक्षणाधिकारी पदाच्या निवडीसाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे अंतिम निवड केली जाते.

मी अर्थशास्त्रात एम.ए. केले आहे. कशात करिअर करावे हे सुचत नाही. मी सरकारी नोकरीसाठी अर्ज केले, पण काहीच उत्तर नाही. मी काय करू?
– भाग्यश्री यादव
कोणताही पदवी अभ्यासक्रम केल्यावर  थेट शासकीय नोकरी मिळणे आता जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे आपल्याला राज्य किंवा केंद्राच्या सेवेत जायचे असल्यास नागरी सेवा परीक्षा द्यावी लागेल. आपण इंडियन इकॉनॉमिक आणि स्टॅटिस्टिकल सíव्हससाठी घेतली जाणारी परीक्षा देऊ शकता. ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक  परीक्षा देऊन बँकिंग क्षेत्रात आपण करिअर करू शकता. नेट/सेट किंवा पीएच.डी केल्यास अध्यापनाच्या क्षेत्रातही प्रवेश करता येईल. आपण अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्याने वित्त, अर्थकारण, सांख्यिकी आदी क्षेत्रांची तुम्हाला चांगली माहिती असेलच, त्यामुळे वेल्थ मॅनेजमेंटचे काही अल्पावधीचे अभ्यासक्रम करून वेल्थ मॅनेजमेंटच्या क्षेत्रातही जाता येईल. एमबीए फायनान्स करून वित्तीय सल्लागार म्हणूनही कार्यरत होता येईल. आपल्याला संधी खूप आहेत. मात्र, आपण आतापावेतो जे शिक्षण घेतले त्याचा पाया भक्कम असणे अत्यंत गरजेचे आहे. संकल्पना स्पष्ट असणे आवश्यक आहे, अन्यथा संधी सहजासहजी उपलब्ध होणार नाहीत.

मी यंदा दहावी उत्तीर्ण झालो. मला नासा/ इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत व्हायचे आहे. त्यासाठी मी कशात उच्च शिक्षण घेऊ?
– मंदार सोनार
नासा आणि इस्रो या दोन्ही संस्थांमध्ये अभियांत्रिकी अथवा विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी अथवा पीएच.डी. पदवी प्राप्त केल्यानंतर प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे आधी तू उत्तम गुणांनी बारावी उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न कर. त्यानंतर तुला इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी/ तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे लागेल किंवा भौतिकशास्त्रात एम.एस्सी. करावे लागेल. शास्त्रज्ञ पदाच्या भरतीसाठी नियमित जाहिराती दिल्या जातात. सध्या तरी तू बारावीच्या परीक्षेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कर.

मी यंदा बारावी उत्तीर्ण झालो.  मला इलेक्ट्रिकल इंजिनीअिरगमध्ये बीई करायचे आहे. त्यानंतर देशात किंवा अमेरिकेत कॉम्प्युटर इंजिनीअिरग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, इन्फम्रेशन टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे. बीई/एमई केल्यावर मला शासकीय संस्था किंवा चांगल्या कंपनीमध्ये संधी मिळेल का?
– मििलद शुक्ला
तुला एमई कॉम्प्युटर इंजिनीअिरग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी या विषयात करायचे असल्यास बीईसुद्धा यापकी एकाच विषयात कर. बीई/ एम.ई. केल्यानंतर शासकीय अथवा चांगल्या कंपनीत संधी मिळू शकते. मात्र, त्यासाठी तुला चारही वष्रे किमान प्रथम श्रेणी मिळायला हवी. सर्व सत्रांची परीक्षा एकाच प्रयत्नात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शिवाय उत्तम संवादकौशल्य हवे. विषयाचे परिपूर्ण ज्ञान मिळवायला हवे.

मला बारावी विज्ञान शाखा (आयटी) मध्ये ७५ टक्के गुण मिळाले आहेत. बीएस्सी आयटी वा बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये पदवी या दोन अभ्यासक्रमांबाबत गोंधळ उडतो आहे. यापैकी कुठल्या अभ्यासक्रमाला अधिक संधी आहे? या दोन विषयांत फरक कोणता?
– राजश्री देशमुख
या दोन्ही विषयांमध्ये फारसा फरक नाही; तथापि, कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमात व्यक्तिगत मायक्रोप्रोसेसरचे डिझाइन, पर्सनल कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटर, सíकट डिझायिनग आणि सॉफ्टवेअरची निर्मिती, गणना आदींचा समावेश असतो. इन्फम्रेशन टेक्नॉलॉजीमध्ये साधारणत: माहितीची सुरक्षा, प्रक्रिया, वहन, माहिती पुन्हा प्राप्त करणे यांचा समावेश असतो. शिवाय संगणक नेटवर्कची स्थापना, डिझायिनग, डाटा मॅनेजमेंट, कॉम्प्युटर हार्डवेअर, संगणकीय व्यवस्थापन या विषयांचा समावेश केला जातो. आयटीमध्ये कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन आणि सॉफ्टवेअरवर भर दिला जातो आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये कॉम्प्युटिंगच्या सद्धांतिक बाबीवर भर दिला जातो. तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर हा आयटीचा गाभा असून कॉम्प्युटर सायन्स हे या तंत्रज्ञानाच्या विकासाला साहाय्य करते. त्यामुळे तुला कॉम्प्युटिंग कार्यप्रणाली अथवा संगणकीय डिझाइनमध्ये रस आहे की संगणकाचा वापर करून माहिती व्यवस्थापनात व त्यायोगे समस्या निवारणात स्वारस आहे हे लक्षात घेऊन विषयाची निवड करावी.

मला फूड टेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दर्जेदार शिक्षण संस्थांची नावे  सांगाल का?
– प्रशांत हेंद्रे
१. सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट ही आपल्या देशातील खाद्यान्न तंत्रज्ञान शाखेत शिक्षण-प्रशिक्षण देणारी आणि संशोधन करणारी आघाडीची संस्था आहे. या संस्थेने  एम.एस्सी. इन फूड टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. पत्ता- द कोऑíडनेटर, सीएसआयर- सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट, चेलुवाम्बा मॅन्शन, के. आर. एस. रोड, म्हैसूर- ५७००२०.
ई-मेल- hrd@cftri.res.in
वेबसाइट-  http://www.cftri.com
२. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्रॉप प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी ही जागतिक दर्जाची शिक्षण आणि संशोधन देणारी संस्था केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने स्थापना केली आहे. या संस्थेने  मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड प्रोसेसिंग इंजिनीयिरग हा अभ्यासक्रम सुरू केला आह.
पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्रॉप प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, पुदूकोट्टई रोड, तंजावूर- ६१३००५, तामिळनाडू
ई-मेल- director@iicpt.edu.in
वेबसाइट- http://www.iicpt.edu.in
३. इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेने फूड इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.  पत्ता- माटुंगा, मुंबई- ४०००१९. वेबसाइट- ww.ictmumbai.edu.in
४. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्रपेन्युअरशिप अ‍ॅण्ड मॅनेजमेंट. या संस्थेने फूड टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. पत्ता- एनआयएफटीईएम कॅम्पस, प्लॉट नंबर ९७, सेक्टर- ५६, एचएसआयआयडीसी इंडस्ट्रियल स्टेट कुंडली, जिल्हा सोनपत- १३१०२८, हरयाणा.
वेबसाइट- http://www.niftem.ac.in
ई-मेल-admission@ niftem.ac.in

मी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन या विषयात  बीटेक केले आहे. मी गेटच्या(GATE) स्कोअरवर मुंबईस्थित नीटी या संस्थेत पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित झाला आहे. आयआयटी-बीएचयू आणि एनआयटीमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करणार आहे. प्लेसमेंटसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम हा चांगला आहे का? हा अभ्यासक्रम एमबीएच्या समकक्ष आहे की नाही? नीटीमध्ये हा अभ्यासक्रम नव्याने सुरू झाला आहे. मी नुकताच बीटेक उत्तीर्ण झालो आहे. नोकरीतले समाधान आणि उत्तम प्लेसमेंट हे माझे ध्येय आहे. मला अध्यापनाच्या क्षेत्रात रस नाही. त्यामुळे  अभ्यासक्रम निवडीचा कुठला निर्णय अचूक ठरेल?
– आशुतोष थोबल
नीटी ही संस्था गेली ५० वर्षे कार्यरत असून औद्योगिक आस्थापनांना आवश्यक असणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाची निर्मिती करणारे विविध अभ्यासक्रम ही संस्था चालवीत असते. प्लेसमेंटबाबत तू मिळवलेली माहिती योग्यच आहे. अभ्यासक्रम नवा असणे आणि प्लेसमेंटचा संबंध जोडू नये. संस्थेची ख्याती व गुणवत्ता लक्षात घेऊन विविध कंपन्या प्लेसमेंटसाठी येत असतात. विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक कामगिरी, व्यक्तिमत्त्व विकास आणि संवादकौशल्य आणि विषयाचे ज्ञान, सादरीकरण हे निवडीचे काही निकष असतात. चांगल्या नावाजलेल्या संस्थेत प्रवेश मिळवूनही जे विद्यार्थी गुणवत्ता व दर्जा राखू शकत नाहीत त्यांना उत्तम प्लेसमेंट मिळेलच याची शाश्वती नसते. संस्थेच्या दर्जासोबतच आपलाही शैक्षणिक दर्जा महत्त्वाचा ठरतो. ही बाब लक्षात घेऊन तुला व्यवस्थापकीय क्षेत्रात करिअर करायचे असल्यास हा अभ्यासक्रम करायला हरकत नसावी. अशा संस्थांमध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम हे एमबीएच्या समकक्षच मानले जातात. मात्र, आयआयटी बीएचयू वा एनआयटीमध्ये संधी मिळत असल्यास त्याचा विचार करावा.  या अभ्यासक्रमांमुळे प्राप्त होणाऱ्या संधींची खातरजमा संबंधित संस्थेच्या प्लेसमेंट सेलकडून घ्यावी.