जबाबदारी स्वीकारून ती नेटाने पार पाडण्याचा िपड असलेल्या खटपटय़ा स्वभावाच्या व्यक्तींची  सकारात्मक वृत्ती सर्वांपर्यंत पोचत असते.. यातूनच त्यांच्या वाटय़ाला कामाच्या नव्या संधी येतात आणि अशा व्यक्ती पुढे जात राहतात!

nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर

मोबाइलचा सकाळचा गजर वाजला आणि सवयीनं सचिनला जाग आली. रोजची ५ वाजता उठण्याची त्याची ठरलेली वेळ. सकाळी पाणी भरावं लागायचं. काल वीज येत-जात होती. त्यामुळं पंखा अधूनमधून बंद होई आणि मग जाग येई. त्यामुळं झोपही नीट झाली नव्हती.

सचिनचं घर घाटकोपरच्या टेकडीवर जरा वरच्या बाजूलाच होतं. तिथून चालत रस्त्याला यायलाच १५ मिनिटं चालावं लागे. त्यापुढं मग बसस्टॉपला पोहचायला १० मिनिटं, बसची १० मिनिटं, आणि मग लोकल ट्रेनमध्ये खचाखच गर्दीतून प्रवास. त्याचा वसाहतीतला ४-५ जणांचा ग्रुप होता. सगळे एकत्रच निघायचे सकाळी. वसाहतीतील अनेकांच्या घरी हाच दिनक्रम असतो. सचिननं जेमतेम दहावी पास केली. अनेक छोटीमोठी कामं करीत मग ‘दत्तात्रय कुरियर’ कंपनीत स्थिरस्थावर झाला. सकाळी डिस्ट्रिब्युशन सेंटरमधून सगळी कुरियर उचलायची आणि त्यांचं दिवसभर वितरण. अनेक नेहमीची ठिकाणं, नेहमीची माणसं, कधी एखादं नवं ठिकाण. सचिनच्या वसाहतीतली अनेक तरुण मुलंही दत्तात्रयमध्ये कामाला होती. त्यांचंही काम आणि दिनक्रम साधारण असाच असायचा.

दिवसभर उन्हातान्हातून वणवण. कधी पायी, कधी सायकल, तर कधी बस किंवा ट्रेन. काही गिऱ्हाइकांच्या ए.सी. ऑफिसात थोडा गारवा मिळायचा आणि प्यायला थंड पाणी मिळायचं. तेवढंच जरा बरं वाटायचं. काही मोठय़ा कंपन्यांच्या कुरियर डिपार्टमेंटच्या स्टाफबरोबर ओळखी झालेल्या. तिथे चहा आणि थोडीशी चौकशी एवढय़ावर काय तो जीव रमवायचा. बाकी फिरतीवर वडा-पाव मिसळ किती वरकड खाणं व्हायचं त्याची काही गणतीच नाही. संध्याकाळी परतीची गँग वेगळी. त्यांच्याबरोबर लोकल ट्रेन, पत्ते, मग बस आणि मग घरी. या रुटीनमध्ये फरक पडायचा तो लग्न, गणपती, होळी, गोिवदा अशा सणासुदीच्या दिवसात. तेव्हा मात्र धम्माल यायची. मित्र- गप्पा- खाणंपिणं.

सचिनचा स्वभाव लाघवी. साध्या कुरियर डिलिव्हरीच्या वेळेसही चेहऱ्यावर हास्य, लोकांची प्रेमळ चौकशी, थोडय़ा इकडतिकडच्या गप्पा. तो कुरियर द्यायला जायचा, त्या ऑफिसमधल्या लोकांनाही सचिन येऊन गेला की छान ब्रेक व्हायचा. अनेक ठिकाणच्या रिसेप्शनिस्टस् त्याच्याबद्दल प्रेमानं बोलायच्या, त्याची चौकशी करायच्या. कुरियर पिकअपसाठी खरं तर लक्ष्मीचा ऑफिस फोन सगळ्यांकडेच होता. पण सगळे सचिनला त्याच्या मोबाइलवर फोन करायचे. सचिनचा आपुलकीचा आवाज, त्याचा उत्साह, त्याची कळकळ सगळ्यानांच आवडायची. सचिन एकदा येतो म्हणाला की तो यायला कधीच चुकला नाही. अनेकदा ६ वाजता अनेकांना पिकअपची आठवण होई आणि मग सचिनला फोन. पण सचिननं कधीच कुरकुर केली नाही.

दिवसभराच्या पिकअप डिलिव्हरी करून अनेकदा सचिन थकून भागून ऑफिसला परतायचा. तिकडं मग सपोर्टच्या लोकांबरोबर बसायचा, चहा प्यायचा, गप्पा मारायचा, त्यांच्या कामासंबंधी थोडं थोडं समजून घ्यायचा. सपोर्टची लोकं संगणकावर काम करायची. नव्या कुरियरची एन्ट्री, कुरियर ट्रॅकिंग, गिऱ्हाइकांच्या चौकशांना उत्तरं .. सचिननं हळूहळू सगळंच आत्मसात केलं होतं. अगदी झेरॉक्स करणंसुद्धा. एकदा हार्बर लाइनच्या गोंधळामुळं सपोर्टची २-३ जण येऊ नाही शकले. सुपरवायझर वंझारीनं सचिनला त्या दिवशी ऑफिसमध्येच सपोर्टचं काम करायला बसवलं. सचिननं त्याच्यावर सोपवलेली कामगिरी चोख निभावली. वंझारीनं अक्षरश: सुटकेचा निश्वास टाकला त्या दिवशी. नंतर नंतर महिन्यातून एक-दोनदा हे वरचेवर होऊ लागलं. कुरियरसाठी टेंपररी स्टाफ असायचा, पण सपोर्टला लोकांची चणचण भासायची. सचिनला चार गोष्टी येण्याचा अशा वेळेस खूप फायदा व्हायचा.

एकदा असाच संध्याकाळी सचिन ऑफिसवर टेकायला आलेला असताना अचानक एक तरुण बाई आल्या आणि त्यांनी त्यांच्या हजार कुरियरच्या ऑर्डरची चौकशी केली. डिलिव्हरी स्टेटस न मिळाल्यानं त्या हैराण होत्या. बॅक ऑफिसच्या शरदसमोर त्या उभ्या ठाकल्या. त्यांच्या एकंदर ऐटीनं शरद अर्धमेला झाला होता. वर हजार कुरियरची ऑर्डर म्हटल्यावर त्याला घामच फुटला. त्यात सिस्टीममध्ये नेमका या ऑर्डरचा स्टेटस काही सापडेना. शरदची चुळबुळ पाहून बाईंचा चेहरा वेडावाकडा झाला. त्यांनी तुसडेपणानं म्हटलं, ‘चुकलंच माझं तुम्हा मंडळींना हे काम देऊन. ही डिलिव्हरी गेली नाही वेळेत तर आमचे सर सालटीच उतरवतील एकेकाची. मला आत्ताच्या आत्ता माहिती हवीय, काय झालं माझ्या ऑर्डरचं.’ वंझारी नेमका काहीतरी कामासाठी बाहेर गेला होता. शरद काकुळतीनं मदतीसाठी आजूबाजूला पाहू लागला.

सचिन पुढं होऊन त्या बाईंना म्हणाला, ‘तुम्ही स्वस्तिक इंडस्ट्रीजच्या ना?’

‘हो. तुला कसं माहीत?’

‘मॅडम, मी तुमच्या इथं कुरियर डिलिव्हरीला येतो. माझं नाव सचिन. मी तुम्हाला पाहिलय. तुमचं नाव?’.

‘दीपिका.’ बाईंच्या चेहऱ्यावरचा राग थोडा निवळला. ‘काय प्रॉब्लेम आहे आमच्या ऑर्डरचा?’

‘मॅडम, तुमचा नंबर देता का? मी तुम्हाला तासाभरात फोन करतो.’

‘कशाला? उगाच तोंडावर मारायला? वेळ मारून न्यायची नेहमीची ट्रिक आहे ही तुम्हा लोकांची. मला माहीत आहे.’

‘मॅडम, हा माझा फोन नं.पण घ्या, विश्वास नसेल तर. मी डिलिव्हरीला येतो तुमच्याकडं. कुठे तोंड लपवणार?’

‘मी बाहेर बसलेय. कळल्याशिवाय मला आमच्या सरांना तोंड दाखवायची हिंमत नाही होणार.’ दीपिका मॅडम मग बाहेरच उभ्या उभ्या त्यांचा मोबाइल पाहू लागल्या.

सचिननं एका मशीनचा ताबा घेतला. पावतीवरून शोध सुरू केला. ऑर्डर सिस्टीममध्ये दिसत होती, पण तिचा डिलिव्हरी स्टेटस काही दिसत नव्हता. सिस्टीममधले सगळे ऑप्शन्स धुंडाळून पाहिले. काहीच पत्ता लागेना. त्यालाही मग घाम फुटला. त्यानं हेड ऑफिसला फोन लावला. फोनवर आलेल्याला प्रॉब्लेम सांगितला. त्यानं थोडा वेळ प्रयत्न केला आणि मग फोन आय.टी. डिपार्टमेंटला ट्रान्सफर केला. सचिननं मग त्यांना परत ऑर्डर डिटेल्स दिल्या. पलीकडच्या बाजूनं काही काळ सन्नाटा.

सचिननं परत ‘हॅलो’ म्हटलं.

‘ऑर्डर सिस्टीममध्ये दिसते आहे.’

‘ती मलाही दिसते आहे. पण तिचा स्टेटस का दिसत नाहीए?’

‘ही ऑर्डर, एन्ट्रीनंतर कुठेतरी अडकलीय. थांब मी बघतोय ..’

दोन मिनिटांनी परत पलीकडून आवाज आला, ‘सिस्टीममध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मी बॅकएन्डमधून ती पुढे ढकललीय. ऑर्डर इनक्वायरी परत करून बघ.’

सचिननं परत ऑर्डर टाकली आणि अचानक स्टेटस दिसू लागला! सगळी ऑर्डर डिलिव्हर झाली होती. सचिनच्या जिवात जीव आला. इतरांना सांगण्यासाठी तो वळला तर ४-५ जण त्याच्या मागंच उभे होते. त्यांचा सुटलेला सामूहिक उच्छ्वास सचिनला जाणवला. बाहेर जाऊन दीपिका मॅडमना सांगायला तो ताडकन उठला तर मॅडम दारातच उभ्या होत्या. त्यांना वेगळं काही सांगण्याची गरजच भासली नाही.

काही दिवसांनी सचिनचे स्वस्तिक इंडस्ट्रीजला डिलिव्हरीसाठी सहज पाय लागले. त्याला मागच्या प्रसंगाची आठवण झाली आणि मजा वाटली. त्याला दीपिका मॅडमना सहज हॅलो म्हणायची इच्छा झाली. त्याने फ्रंट डेस्कवर मॅडमची चौकशी केली. कुरियर डिपार्टमेंटचाच एक ओळखीचा मग त्याला दीपिका मॅडमकडं घेऊन गेला.

‘मॅडम नमस्कार.’

‘नमस्कार. कसा आहेस?’

‘मी छान आहे मॅडम. फक्त हॅलो म्हणायचं होतं. त्या दिवशी तुम्ही वेगळ्याच मूडमध्ये ऑफिसात आला होता. नंतर नीट बोलणंच नाही झालं.’.

‘खरं आहे. एक मिनीट थांब’ म्हणत बाई एका केबिनमध्ये गेल्या आणि एका मिनिटाने बाहेर येत सचिनला म्हणाल्या ‘एक मिनिट इकडे ये.’

सचिन केबिनमध्ये शिरला. आत कुणी वरिष्ठ माणूस होता.

‘सचिन, मी डिसोझा. इथलं अ‍ॅडमिन पाहतो. कुरियर माझ्या अंडर येतं.’

‘नमस्कार सर. काही चुकलं का सíव्हसमध्ये?’

डिसोझा हसत म्हणाले, ‘चुकलं वगरे काही नाही. उत्तम काम करतोस तू. आमच्याकडं अ‍ॅडमिनमध्ये काम करणार का?’

सचिन ही ऑफर घेईल किंवा घेणारही नाही. पण एक गोष्ट नक्की. सचिन लक्षात राहतो लोकांच्या. जबाबदारी डोक्यावर घेऊन ती नेट लावून पार पाडण्याचा त्याचा िपड, खटपटय़ा स्वभाव आणि त्याची सकारात्मक वृत्ती सर्वांपर्यंत पोचते. ती स्वस्तिकच्या लक्षात आली, दत्तात्रयच्या वंझारींनाही ती कळली. स्वस्तिकची आज समोरून ऑफर आली. दत्तात्रयमध्ये तो पुढे कधीतरी वर चढेल. सचिनसारखा मुलगा पुढे जाणार हे मात्र नक्की.

palsule.milind@gmail.com

 

इंटिग्रेटेड कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम

इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सेंटर फॉर गव्हर्नन्स, रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग या संस्थेच्या इंटिग्रेटेड कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

अभ्यासक्रमाचे स्वरूप : तीन वर्षे कालावधीच्या व पूर्णवेळ स्वरूपातील या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने कंपनी सेक्रेटरीविषयक कार्य क्रियान्वयन व त्याशिवाय व्यवस्थापन क्षेत्राशी निगडित विविध कौशल्यांचा समावेश आहे.

उमेदवारांची संख्या : अभ्यासक्रमामध्ये जास्तीतजास्त ५० उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल.

शैक्षणिक अर्हता : अर्जदार विद्यार्थ्यांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांनी सीएटी, एक्सएटी, एनएमएटी, जीएमएटी, एसएनएपी, एमएच सीईटी, एटीएमए यांसारखी प्रवेश पात्रता दिलेली असावी अथवा कंपनी सेक्रेटरीज इन्स्टिटय़ूटचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा : अर्जदारांचे वय २६ वर्षांहून अधिक नसावे.

निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांची लेखी निवड परीक्षा घेण्यात येईल. निवड परीक्षा संगणकीय पद्धतीने परीक्षा केंद्रांवर ३० एप्रिल २०१६ रोजी घेण्यात येईल.

निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. अभ्यासक्रम ४ जुलै २०१६ पासून सुरू होईल.

अधिक माहिती : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक तपशिलासाठी अथवा www.icsi.edu या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची मुदत : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २० एप्रिल २०१६ पर्यंत अर्ज करावेत.

 

व्यवस्थापन विषयातील पीएच.डी

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनचे सेंटर फॉर मॅनेजमेंट एज्युकेशन व अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने व्यवस्थापन विषयातील संशोधनपर पीएच.डी करण्यासाठी नोंदणीँप्रक्रिया सुरू झाली आहे.

आवश्यक अर्हता व अनुभव : उमेदवारांनी वाणिज्य, ुमॅनिटीज, विज्ञान, अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा सीए, आयसीडब्ल्यूए यासारखी पात्रता पूर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असायला हवा. याशिवाय अर्जदारांना संबंधित विषयात काम करण्याचा कमीतकमी पाच वर्षांचा अनुभव असावा.

निवडप्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना रिसर्च मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट आरएमएटी या निवड पात्रता परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर ७ मे २०१६ रोजी देशांतर्गत विविध केंद्रांवर घेण्यात येईल. त्यामध्ये मुंबईचा समावेश असेल.

अर्जदारांची शैक्षणिक अर्हता : परीक्षेतील गुणांची टक्केवारी व आरएमएटी प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांची पीएच.डी करण्यासाठीची नोंदणी करण्यात येईल.

अर्जासह पाठवायचे शुल्क : उमेदवारांनी आपल्या अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १५०० रु. चा ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.

अधिक माहिती : या संदर्भात अधिक तपशिलासाठी  असोसिएशनच्या www.aima.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची मुदत : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २५ एप्रिल २०१६ पर्यंत नोंदणी करावी.