सेंट्रल युनिव्हर्सिटी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट अंतर्गत हरियाणा, जम्मू, झारखंड, कर्नाटक, काश्मीर, केरळ, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू इत्यादी राज्यांतील विद्यापीठांमध्ये विविध स्तरांवरील अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. सीयुसीईटी या प्रवेश पात्रता परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
अभ्यासक्रमांचा तपशील : या प्रवेश पात्रता परीक्षेद्वारा नमूद केलेल्या राज्यांतील पदवीपूर्व स्तरावरील विविध विषयांसह असणारे ५९ अभ्यासक्रम, पदव्युत्तर व पदव्युत्तर पदविका स्तरावरील १७७ अभ्यासक्रम तर एमफिल-पीएच.डी यांसारख्या ९२ अभ्यासक्रमांचे प्रवेश केले जातात.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांची संगणकीय पद्धतीने निवड चाचणी देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर २१ व २२ मे २०१६ रोजी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख व निवड पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित विद्यापीठात अथवा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येईल.
अधिक माहिती : ‘सीयूसीईटी-२०१६’ या प्रवेश पात्रता परीक्षेच्या संदर्भात अधिक तपशिलासाठी को-ऑर्डिरेटर सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टेस्ट, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान, नॅशनल हाय-वे ८, बंदारसिंदरी,
जि. अजमेर ३०५८१७, राजस्थान येथे संपर्क साधावा अथवा http://www.cwraj.ac.in अथवा http://www.cucet16.co.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १५ एप्रिल २०१६ पर्यंत अर्ज करावा.