News Flash

स्टाफ सिलेक्शनची लिपिक भरती

अलीकडेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी लिपिक व डाटा एन्ट्री ऑपरेटर्सच्या पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेन्ट न्यूज- २०

| August 12, 2013 12:05 pm

अलीकडेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी लिपिक व डाटा एन्ट्री ऑपरेटर्सच्या पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेन्ट न्यूज- २० ते २६ जुल २०१३ च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. १ ऑगस्ट २०१३ रोजी वय वष्रे १८ ते २७ वयोगटातील इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना १६ ऑगस्ट २०१३पर्यंत पुढील वेबसाइटवरून ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज स्टाफ सिलेक्शन कमिशनला पाठवायचे आहेत- वेबसाइट -http://ssc.nic.in.
ही एक कायमस्वरूपी, केंद्र सरकारी लिपिकांची नोकरी असून फक्तबारावी शिक्षण, टायिपगचे किंवा डाटा एन्ट्रीचे ज्ञान असणे गरजेचे आहे. यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची लेखी परीक्षा, त्यानंतर टायिपग किंवा डाटा एन्ट्रीची कौशल्य चाचणी होईल. या परीक्षेची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे –
परीक्षेचे नाव – कम्बाइण्ड हायर सेकंडरी लेव्हल (१०+२) परीक्षा -२०१३
शैक्षणिक पात्रता – १ ऑगस्ट २०१३ रोजी मान्यताप्राप्त बोर्डाची बारावीची परीक्षा उत्तीर्ण हवी, तसेच इंग्रजी/हिंदी टायिपगचे ज्ञान किंवा डाटा एन्ट्रीचे ज्ञान आवश्यक आहे किंवा पदवीधरही अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१३ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असावे. उच्च वयोमर्यादा/वयात सवलती पुढीलप्रमाणे आहे. एससी/एसटीसाठी पाच वष्रे, ओबीसीसाठी व माजी सनिकांसाठी तीन वष्रे, अपंगांसाठी दहा वष्रे आहे. [जास्त माहितीसाठी सविस्तर जाहिरात वेबसाइटवर पाहावी.]
परीक्षा शुल्क – जनरल व ओबीसी पुरुष उमेदवारांसाठी रु. १०० परीक्षा फी चलनाद्वारे किंवा सीआरएफएस स्टॅम्पद्वारे भरावी. सर्व महिला उमेदवारांसाठी व एससी/एसटी उमेदवारांसाठी फी माफ आहे.
ऑनलाइन अर्जासाठी वेबसाइट : http://ssc.nic.in
परीक्षा केंद्र – पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर व इतर शहरे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन कार्यालयाचा पत्ता- रिजनल डायरेक्टर, [वेस्टर्न रिजन],स्टाफ सिलेक्शन कमिशन, पहिला मजला, प्रतिष्ठा भवन, १०१, एम. के. रोड, मुंबई-२०.
अर्ज करण्याची शेवटची तारीख  १६ ऑगस्ट २०१३.
लेखी परीक्षेची तारीख – १० नोव्हेंबर २०१३ / १७ नोव्हेंबर २०१३
लेखी परीक्षेचे स्वरूप – परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची दोन तासांची असेल. एकूण चार विषय, प्रत्येकी ५० गुण, एकूण २०० गुण आहेत. परीक्षेसाठी पुढील चार विषय आहेत – जनरल इंटेलिजन्स, इंग्लिश लँग्वेज, क्वॉन्टिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड (बेसिक पातळीवरील गणितकौशल्य), जनरल अवेअरनेस.
या परीक्षेत नुसतेच उत्तीर्ण होऊन चालणार नाही तर गुणवत्ता यादीमध्ये गुण प्राप्त केले तरच डाटा एन्ट्री किंवा टायिपगच्या स्कील टेस्टला कॉल लेटर येऊ शकते, हे लक्षात घ्यावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 12:05 pm

Web Title: clerk recruitment staff selection
Next Stories
1 मलेशियामध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
2 राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसरची संधी
3 धर्म आणि विज्ञान यांच्या पेचात सापडलेले ब्लेझ पास्कल
Just Now!
X