डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) या संस्थेचे कार्यस्वरूप स्पष्ट करणाऱ्या लेखमालेतील ‘कॉम्बॅट इंजिनीअरिंग’ अंतर्गत काम करणाऱ्या उपसंस्थांची माहिती देणारा दुसरा भाग.
डीआरडीओ संस्थेच्या ‘कॉम्बॅट इंजिनीअरिंग’ अंतर्गत अनेक उपसंस्था कार्यरत असतात. भारतीय सैन्याच्या बळकटीकरणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या उपसंस्थांच्या कामाचे स्वरूप आणि महत्त्व
पुढीलप्रमाणे आहे-

० कॉम्बॅट व्हेइकल रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (सी.व्ही.आर.डी.ई.)
डीआरडीओ संस्थेची ही उपशाखा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चीफ इन्स्पेक्टोरेट ऑफ मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट एस्टॅब्लिशमेंट या नावाने चकलाला (स्वातंत्र्योत्तर काळात हे ठिकाण पाकिस्तानात आहे) येथे कार्यरत होती. पुढे ही संस्था टेक्निकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट म्हणून महाराष्ट्रातील अहमदनगर येथे हलविण्यात आली. १९६५ साली बनवण्यात आलेल्या विजयंता रणगाडय़ांच्या निर्मितीत, तसेच संशोधन आणि विकास कार्यात या शाखेचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. भारतीय सन्य दलाकडून वापरात येणाऱ्या सशस्त्र लढाऊ विमानांच्या संदर्भातील संशोधन आणि विकास हेतूने या उपशाखेची निर्मिती १९७५ मध्ये करण्यात आली.
कार्यक्षेत्र- या विभागातर्फे भारतीय लष्करातील ट्रॅक्ड कॉम्बॅट व्हेइकल्सची आणि स्पेशालिस्ट ट्रॅक्ड व्हेइकल्सची निर्मिती करण्यात येते. यासंबंधीत विविध भागांची रचना करण्यात येते.
संबंधित उत्पादनांची रचना-संकल्पना आणि विकास करण्याची जबाबदारी या विभागाची असते.
० व्हेइकल्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (व्ही.आर.डी.ई.)
१९६२ साली यातील अभियांत्रिकी शाखा रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (इंजिनीअर्स) या नावाने पुण्यात कार्यान्वित झाली.
कार्यक्षेत्र – स्पेशालिस्ट व्हेइकल्स, लाइट बॅटल टँक आणि रोड मोबाइल लॉन्चर्स प्रणाली, सपोर्ट व्हेइकल्स फॉर स्ट्रॅटेजिक मिसाइल प्रोग्राम, सशस्त्र वाहने, कमी वजनाची मानवरहित विमाने, मानवरहित विमानांची इंजिन्स यांचे विकसन केले जाते. रचना, योग्यता, कामगिरी, मूल्यांकन या निकषांवर लष्करी-बिनलष्करी वाहनांच्या आणि इंजिनांच्या चाचण्या केल्या जातात.

० रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट इंजिनीअिरग (आर.डी.ई)
पुणे येथील दिघी येथे १९६२ मध्ये स्थापन झालेल्या या उपशाखेचे मुख्य कार्य ‘कॉम्बॅट इंजिनीअिरग’ संबंधीच्या सामग्रीचे विकसन हे होते. कालांतराने सर्व मोठय़ा शस्त्रास्त्र निर्मितीच्या अभियांत्रिकी प्रणालीचे विकसन या शाखेकडून होऊ लागले. मिलिटरी ब्रिजिंग, माइन वारफेअर, रोबोटिक सिस्टीम या प्रणालीचे विकसनही या शाखेतर्फे केले जाते.

० स्नो अ‍ॅण्ड एव्हलांच स्टडी एस्टॅब्लिशमेंट (एस.ए.एस.ई.)
बर्फाळ प्रदेशात बर्फकडे कोसळण्यामुळे लष्करी हालचाली, सामान्य जनजीवन, दळणवळण आणि संपर्क व्यवस्था विस्कळीत होत असते. या अडचणींशी सामना करण्यासाठी १९६९ मध्ये मनालीजवळ या शाखेची स्थापना करण्यात आली. ११९० मध्ये सुरू  झालेल्या कोल्ड लॅबोरेटरीद्वारे स्नो फिजिक्स आणि मेकॅनिक्स या विषयात संशोधनही केले गेले. गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांतून तिथे एक्स्पेरीमेंटल रिसर्च स्टेशन फॉर स्ट्रक्चरल कंट्रोल ऑफ एव्हलान्चेस, लो टेम्परेचर कॉन्क्रीट टेिस्टग फॅसिलिटी, रेडिओ बेस्ड रिमोट टेलिमेट्री सिस्टीम अस्तित्वात आली आहे.

० अनुराग
संस्थेच्या ‘अ‍ॅडव्हान्स्ड न्यूमरिकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस ग्रूप’- अनुराग या उपशाखेची स्थापना १९८८ साली करण्यात आली. आवश्यकतेनुसार कम्प्युटिंग सिस्टीम्स, सॉफ्टवेअर पॅकेजेस विकसित करणे
तसेच संख्यात्मक विश्लेषण हे या संस्थेच्या निर्मितीचे
उद्दिष्ट होते.
कार्यक्षेत्र – समांतर प्रक्रिया तंत्रज्ञान (पॅरलल प्रोसेसिंग टेक्नोलॉजी), जनरल पर्पज मायक्रोप्रोसेसर्स, व्ही.एल.एस.आय. चिप्स अ‍ॅण्ड एस.ओ.सी. डेव्हलपमेन्ट, प्रोसेसर रिलेटेड टेक्नोलॉजी, सिस्टीम सॉफ्टवेअर फॉर कस्टम मेड प्रोसेसर्स विकसित करणे.

० सेंटर फॉर आर्टििफशियल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड रोबोटिक्स (सी.ए.आय.आर.)
संस्थेच्या या केंद्राची स्थापना १९८६ मध्ये झाली. येथील संशोधन प्रामुख्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि कंट्रोल सिस्टीम्स, इन्फम्रेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी या विषयासंबंधी केले जाते. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे सुरक्षा व्यवस्थेत कम्युनिकेशन, इन्फम्रेशन आणि इंटेलिजन्सच्या अत्युत्तम प्रणालीचा वापर करणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे.
कार्यक्षेत्र- कम्युनिकेशन सीक्रसी, इन्फम्रेशन सिक्युरिटी, कम्युनिकेशन्स अ‍ॅण्ड नेटवìकग,
कम्युनिकेशन सिक्युरिटी.
(भाग दुसरा)