News Flash

संकल्पनात्मक अर्थव्यवस्था (मूलभूत अभ्यास )

अर्थव्यवस्था (economy) हा विषय फक्त आकडेवारीपुरताच मर्यादित नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| रोहिणी शहा

मागील लेखामध्ये अर्थव्यवस्था घटकाच्या प्रश्नांचे विश्लेषण अभ्यासाचा दृष्टीने पेपर ४ ची अर्थव्यवस्था पारंपरिक, गतिमान अर्थव्यवस्था, कृषी आणि विज्ञान व तंत्रज्ञान अशा चार भागांत विभागणी करता येईल. अर्थव्यवस्था हा विषय बहुतांश विद्यार्थ्यांना मोठमोठे आकडे व तांत्रिक संज्ञांचा वापर यामुळे अवघड वाटतो. या विषयाबाबतचे समज, गरसमज व न्यूनगंड दूर करून आत्मविश्वासपूर्ण तयारी करण्यासाठी अभ्यासाची नेमकी पद्धत पाहू या.

अर्थव्यवस्था (economy) हा विषय फक्त आकडेवारीपुरताच मर्यादित नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे. या विषयाचा मूलभूत अभ्यास पक्का असणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. या विषयाच्या संकल्पना फक्त व्याख्या पाठ करून समजून घेता येत नाहीत. त्यामुळे सक्षम गाइडकडून त्या व्यवस्थित समजून घ्याव्यात किंवा ज्या पुस्तकातून तुम्हाला  सहजपणे आणि आत्मविश्वासाने हा विषय समजेल तेच पुस्तक वापरावे.

एमपीएससीने अभ्यासक्रमात नमूद केलेल्या क्रमानेच या विषयाच्या घटकांचा अभ्यास केल्यास तो परिणामकारक ठरेल. म्हणजे आधी अर्थव्यवस्था समजून घेणे. त्यानंतर योजनांचा अभ्यास करणे व मग विकासाचे अर्थशास्त्र (economics of development) अभ्यासणे असा क्रम ठेवावा.

 • सर्वप्रथम अर्थव्यवस्था विषयाच्या संकल्पना व संज्ञा व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. या विषयाच्या संकल्पना परस्परांशी घनिष्ठपणे संबंधित असतात. त्यामुळे तुलनात्मक (comparative) अभ्यासाने हा विषय सोपा होऊ शकतो. मूलभूत संकल्पना आणि व्याख्या समजणे या विषयाच्या तयारीसाठीची अट आहे. या तयारीसाठी NCERT ची १०वी १२वीची अर्थशास्त्राची पाठय़पुस्तके अभ्यासणे आवश्यक आहे.
 • दारिद्रय़, बेरोजगारी, पायाभूत सुविधा या संकल्पना समजून घेतानाच त्यांच्या बाबतीत भारतासमोरच्या समस्यांचे स्वरूप, कारणे, परिणाम आणि संभाव्य उपाय यांचा परिपूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे. याबाबत शासन स्तरावरून प्रसिद्ध होणारी तसेच जागतिक स्तरावरील आकडेवारी, ती ठरविण्याच्या पद्धती, संबंधित अभ्यासगट व त्यांच्या महत्त्वाच्या शिफारशी हे मुद्दे बारकाईने पहावेत.
 • पंचवार्षकि योजना हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा पलू आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती साधण्यासाठी शासनाचे प्रयत्न म्हणून पंचवार्षकि योजनांकडे पहायचे आहे. या योजनांच्या अभ्यासासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत.

योजनेचा कालावधी, योजनेची घोषित ध्येये, हेतू व त्याबाबतची पाश्र्वभूमी, योजनेचे प्रतिमान, असल्यास घोषणा, योजनेतील सामाजिक पलू, सुरू करण्यात आलेले उपक्रम, कार्यक्रम, योजना, योजनाकाळात घडलेल्या उल्लेखनीय आर्थिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना, योजनेचे मूल्यमापन व यश/अपयशाची कारणे, परिणाम, योजनेच्या कालावधीत घोषित करण्यात आलेली आर्थिक, वैज्ञानिक धोरणे, योजनेमध्ये विविध क्षेत्रांवर करण्यात आलेल्या खर्चाची, उत्पादनांची टक्केवारी पहावी.

 • भारतातील शहरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, सहकार, उद्योग व कृषीचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व हे चार घटक पारंपरिक व करंट अशा दोन्ही ऑस्पेक्टने अभ्यासायचे आहेत.
 • उद्योग घटकामध्ये प्रकार, महत्त्व, सध्याचे स्थान, जागतिकीकरणाचा परिणाम इ. मुद्याचा संकल्पनात्मक अभ्यास महत्त्वाचा आहे. औद्योगिक धोरणे व विविध पंचवार्षकि योजनांमधील उद्योग क्षेत्राची प्रगती multistatement प्रश्नांसाठी महत्त्वाची आहे. यामध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ बारकाईने पहायला हवा. महत्त्वाचे उद्योग व त्यांची स्थाने यांचा नकाशावर आधारित अभ्यास परिणामकारक ठरेल.
 • सहकार क्षेत्राची ब्रिटिश काळापासूनची प्रगती, वाटचालीतील ठळक टप्पे, कायदे, सहकारातील नव्या संकल्पना, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील सहकारी संस्था, त्या क्षेत्रातील सहकाराची कामगिरी, राज्याचे धोरण व सहकाराची समर्पकता हे मुद्दे संकल्पनात्मक प्रश्नांसाठी महत्त्वाचे आहेत.

पायाभूत सुविधांबाबत table format वापरणे श्रेयस्कर ठरेल.

या टेबलमध्ये पुढील मुद्दे असावेत

 • सुविधेचे असल्यास प्रकार (उदा. ऊर्जेचे प्रकार)
 • उपलब्धता (राष्ट्रीय, राज्य)
 • विकासातील महत्त्व
 • मागणी / गरज / वापर
 • समस्यांचे स्वरूप
 • कारणे
 • उपाय
 • शासकीय धोरणे
 • शासकीय योजना
 • विकासाची प्रारूपे उदा. खासगीकरण, सार्वजनिक खासगी भागीदारी

(BOT /BOOT /BPT /BPOT)

 • महाराष्ट्रातील उद्योग, कृषी, सेवा क्षेत्र, दुष्काळ व्यवस्थापन, परकीय गुंतवणूक या क्षेत्रांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे. याबाबत राज्यातील सद्य:स्थिती, अद्ययावत आकडेवारी, शासकीय धोरणे, योजना हे मुद्दे लक्षात घ्यायला आणि असायला हवेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 12:37 am

Web Title: conceptual economy
Next Stories
1 नोकरीची संधी
2 निबंध लेखन (मांडणीतील बारकावे)
3 पेट्रोलियम क्षेत्रातील संशोधन
Just Now!
X