प्रभावित होते हे सहज लक्षात येते. एखाद्या गोष्टीबद्दलची आपली वृत्ती बदलली की त्या अनुषंगाने वर्तन बदलते. बऱ्याचदा पालक किंवा इतर मोठय़ा व्यक्ती मुलांना त्यांचा दृष्टिकोन बदलायला सांगतात. खरंतर त्यांना वर्तनातील बदल अपेक्षित असतो व दृष्टिकोन (Attitude) बदलला की वर्तन बदलेल अशी सर्वसाधारण धारणा असते. त्यामधूनच अॅटिटय़ूड बदलण्याविषयी सल्ला दिला जातो. याच प्रकारचे आणखी उदाहरण द्यायचे तर नागरिकांनी कार चालवताना सीट बेल्ट घालावा, वाहतुकीचे नियम पाळावेत या व अशा विविध गोष्टी सुचविणारे फलक, सूचना, घोषणा वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे केल्या जातात. लोकांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकून त्यायोगे त्यांच्या वागण्यात बदल केला जातो. समुपदेशन, शिकवणे, मूल वाढवणे या सर्व प्रक्रियांमधील एक समान धागा म्हणजे- वैयक्तिक आयुष्यातील धारणा, दृष्टिकोन सामाजिक वर्तनावर प्रभाव टाकत असतात असे समजणे, आणि म्हणूनच कुणाचेही वर्तन बदलायचे असल्यास त्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे.
विसाव्या शतकाच्या मध्यात दृष्टिकोन व वर्तन यांच्यामधील संबंध खूप दृढ नाही असे संशोधकांच्या लक्षात येऊ लागले. लोकांच्या दृष्टिकोनात बदल झाल्यावरही वर्तनात बदल होतोच असे नाही.
उदा. बहुतेक सुशिक्षित लोकांना सिगरेट ओढण्याने होणारा त्रास व त्यातून होणारी शरीराची हानी याचे ज्ञान असते, तरीदेखील धूम्रपान सुरूच राहते. अशा प्रकारची धोक्याची सूचना छापल्याने वर्तनात कोणताही आमूलाग्र बदल दिसून येत नाही. हेल्मेट घालणे सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे हे मान्य असले तरीही अनेक दुचाकीस्वार हेल्मेट न घालता गाडी चालवताना दिसतात. अनेक मानसशास्त्रज्ञांनी हे आपल्या संशोधनाद्वारे दाखवून दिले आहे की, वृत्ती/दृष्टिकोन बदलल्याने वर्तन बदलतेच असे नाही. अनेकांच्या अभ्यासातून एक समान निष्कर्ष असाही आला की वर्तन बदलले की दृष्टिकोन बदलतो.
अशा प्रकारचा विरुद्ध आंतरसंबंध कसा अस्तित्वात असू शकतो याची अनेक स्पष्टीकरणे दिली जातात. फिलिप िझबाडरे (Phillip Zimbardo) यांचा Stanford Prison Experiment असं दाखवून देतो की, लोकांना एखादी विशिष्ट भूमिका वठवायला दिली तर त्या भूमिकेचे दृष्टिकोनही ती व्यक्ती आत्मसात करते. या प्रयोगामध्ये सहभागी झालेल्यांचे दोन गट करण्यात आले. यापकी एका गटाने तुरुंगातील कैद्यांसारखे वागायचे होते, तर दुसऱ्या गटातील व्यक्तींना तुरुंग अधिकाऱ्यांसारखे वागायचे होते. तात्पुरत्या उभ्या केलेल्या तुरुंगामध्ये काही दिवसांसाठी हा प्रयोग चालला. यापेक्षा वेगळ्या कोणत्याही सूचना कोणत्याही गटाला देण्यात आल्या नव्हत्या. काही दिवसांनी असे पाहण्यात आले की, तुरुंग अधिकाऱ्यांचा गट कैद्यांच्या गटाशी अतिशय िहसक पद्धतीने वागत आहे. हा वर्तनातील व दृष्टिकोनातील बदल इतका तीव्र होता की प्रयोग मध्यातच बंद करावा लागला. (Stanford Prison Experiment हा अतिशय महत्त्वाचा, मलाचा दगड मानावा असा प्रयोग आहे. इंटरनेटवर याबद्दल खूप सविस्तर व रंजक माहिती उपलब्ध आहे.) इथे नोंद करण्यासारखी गोष्टी म्हणजे इतक्या थोडय़ा काळामध्येही बदललेले वर्तन हे वृत्ती बदलण्यास कारण ठरू शकते. अशाच अनेक खऱ्या आयुष्यातील घटना व प्रसंगांमध्येही हेच निरीक्षण नोंदवता येऊ शकते. वृत्ती व वर्तन यांच्यातील हा संबंध स्पष्ट करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले आहेत. यातील एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे cognitive dissonance – आकलनातील विसंगती. यात असे सुचवले आहे की, आपल्या आकलनातील सुसंगतता कायम ठेवण्याकरता आपण आपल्या वृत्तीमध्ये गरजेप्रमाणे बदल करून घेत असतो. इसापनीतीमधील कोल्हा आणि द्राक्षे ही गोष्ट प्रसिद्ध आहे; ज्यामध्ये उंचावर असलेली द्राक्षे, जी कोल्हा खाऊ शकत नाही, ती आंबटच असली पाहिजेत आणि म्हणून ती त्याला नकोच होती, अशी स्वत:ची समजूत कोल्हा करून घेतो. हे cognitive dissonance चे अतिशय समर्पक उदाहरण आहे.
आपण करत असलेल्या चच्रेच्या अनुषंगाने आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, वृत्तीतील हा बदल वरवरचा आणि थोडाच काळ टिकणारा असा नसून खोलवर रुजलेला आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. या प्रक्रियेध्ये मेंदू वृत्ती (आपल्या उदाहरणातील द्राक्षं खाण्याची तीव्र इच्छा) आणि वर्तन (द्राक्षांपर्यंत न पोहोचू शकणे) यांच्यातील संघर्ष वृत्ती बदलून सोडवत असतो. म्हणूनच जिथे अशा प्रकारची विसंगती तिथे वर्तन वृत्ती बदलू शकते. आतापर्यंत आपण असे पाहिले की दृष्टिकोन/ वृत्ती वर्तन बदलतात; तसेच वर्तनामुळे वृत्ती बदलतात, हेही आपण पाहिले. अर्थातच यावर काही मर्यादा आहेत. आपल्यासमोरील प्रमुख मुद्दा म्हणजे या सगळ्याचा नागरी सेवांशी कसा आणि काय संबंध आहे याचा विचार करणे.
अधिकारी म्हणून विविध क्षेत्रांत कार्यरत असताना तुम्हाला वृत्ती व वर्तन यांच्यातील गुंतागुंतीची ओळख असणे अपेक्षित आहे. जेव्हा स्वत:च्या किंवा इतरांच्या वर्तनातील बदल आवश्यक असतो तेव्हा मानसिकता बदलण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. परंतु केवळ मानसिकता बदलणे पुरेसे ठरेलच असे नाही. कित्येकदा आवश्यक कायदे, नियमावली यांच्या माध्यमातून कृती बदलली जाऊ शकते. अशा प्रकारे कृतीतील बदल हा एक कृती करण्याच्या पद्धतीतील बदलाचे साधन ठरू शकतो. तसेच हा बदल कालांतराने व्यक्तींकडून आत्मसात केला जातो. याचाच परिणाम म्हणून व्यक्तींच्या वृत्तीतही लक्षणीय बदल घडून येतो. उदा. १९५४ मध्ये अमेरिकेत कृष्णवर्णीयांसाठी व श्व्ोतवर्णीयांसाठी वेगवेगळ्या शाळा असणे हे संविधानाच्या दृष्टिकोनातून अवैध समजण्यात आले व त्यानुसार कायदे बदलण्यात आले. जरी सुरुवातीला श्व्ोतवर्णीयांकडून याला विरोध झाला तरी कालांतराने अशा प्रकारच्या शाळा असणे बहुतेक लोकांनी मान्य केले व यातून एकात्मीकरणाला सुरुवात झाली. अशीच अनेक उदाहरणे भारतीय संदर्भातही पाहिली जाऊ शकतात.
अशा प्रकारे सामाजिक मानसशास्त्र अनेक ‘जागृती मोहिमां’मागील स्पष्टीकरण समजून घेण्यास मदत करते. सामाजिक मानसशास्त्र लक्षात घेतले की, सरकार चालवत असलेल्या लसीकरण मोहिमा, सुरक्षित रस्ता सप्ताह, सौजन्य सप्ताह या योजनांमागील भूमिका (वृत्तीचा वर्तनावर व वर्तनाचा वृत्तीवर होणारा परिणाम) सहज लक्षात येते.                                                     
 admin@theuniqueacademy.com

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…