इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, गांधीनगर येथे संशोधनपर पीएच.डी., एमटेक व पदव्युत्तर पदविका स्तरावर खालीलप्रमाणे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत-
पीएच.डी : बायोलॉजिकल इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग, रसायनशास्त्र, सिव्हिल इंजिनीअरिंग, संगणक विज्ञान व तंत्रज्ञान, भू विज्ञान, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, इतिहास, विविध भाषा, मटेरियल्स सायन्स अँड इंजिनीअरिंग, गणित, मेकॅनिकल इंजिनीअरिंग,
तत्त्वज्ञान, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र या विषयांतील संशोधनपर पीएच.डी. अभ्यासक्रम.
शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी वरील विषयांतर्गत पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
एमटेक व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम : केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग या विषयांतील एमटेक व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी वरील विषयांतर्गत पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सतर्फे लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. त्यांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- गांधीनगरच्या http://www.iitgn.ac.in/admission.htm या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- गांधीनगर (गुजरात) येथे २० फेब्रुवारी २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.