‘सीएसआयआर’ म्हणजेच काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्चतर्फे राष्ट्रीय स्तरावर प्राध्यापक व संशोधक पात्रता परीक्षा-२०१४ साठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
निवड परीक्षेचे स्वरूप : या निवड परीक्षेअंतर्गत केमिकल सायन्सेस, अर्थ, अॅटमॉस्फेरिक, ओशन अॅण्ड प्लॅमेटरी सायन्सेस, लाइफ सायन्सेस, गणित, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी यांसारख्या विषयांचा प्रामुख्याने समावेश आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी वरील विषयांसह बी.ई., बी.टेक्., बी.फार्म., एम.बी.बी.एस., इंटिग्रेटेड बीएसएमएस, एमएस्सी यांसारखी पात्रता परीक्षा ते सर्वसाधारण गटातील असल्यास ५५ टक्के गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांनी ५० टक्के गुणांसह) उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा.
वयोमर्यादा : प्राध्यापक पात्रता परीक्षेसाठी वयोमर्यादेची अट नसली तरी संशोधक पदासाठी उमेदवारांचे वय २८ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक अर्जदारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही परीक्षा ‘सीएसआयआर’तर्फे देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रावर २१ डिसेंबर २०१४ मध्ये घेण्यात येईल. त्यामध्ये राज्यातील पुणे व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
अर्जदारांची संबंधित पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल. अर्जासह भरायचे शुल्क : अर्जासह भरायचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटातील उमेदवारांनी  ४०० रु. (राखीव गटातील उमेदवारांनी २०० रु.) इंडियन बँकेच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरणे आवश्यक आहे. अधिक माहिती : यासंदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘सीएसआयआर’ची जाहिरात पाहावी अथवा http://www.csirhrdg.res.in या संकेतस्थळाला  भेट द्यावी. अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेत स्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०१४ आहे.