News Flash

सीएसआयआर-यूजीसीची संशोधक-प्राध्यापक पात्रता परीक्षा २०१३

कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च अ‍ॅण्ड विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे संयुक्तपणे घेण्यात येणाऱ्या संशोधक पात्रता व प्राध्यापक पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज

| August 19, 2013 08:32 am

कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च अ‍ॅण्ड विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे संयुक्तपणे घेण्यात येणाऱ्या संशोधक पात्रता व प्राध्यापक पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत –
योजनेंतर्गत विषय : या योजनेंतर्गत सामील करण्यात आलेल्या विषयांमध्ये केमिकल सायन्सेस, अर्थ, अ‍ॅटमॉस्फेरिक, ओशन अँड प्लॅनेटरी सायन्सेस, लाइफ सायन्सेस, मॅथमॅटिकल सायन्सेस, फिजिकल सायन्सेस व इंजिनीअरिंग या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी बीई, बीटेक, बीफार्म, एमबीबीएस यांसारखी पदवी परीक्षा व त्यानंतर एमएस/एमएस्सी ही पदव्युत्तर पदवी परीक्षा कमीत कमी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. राखीव गटातील उमेदवारांसाठी गुणांच्या टक्केवारीची अट ५० टक्क्य़ांपर्यंत शिथिलक्षम आहे.
विशेष सूचना : जे अर्जदार वरील पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसले असतील, तेसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर २२ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांच्या आधारे त्यांची संशोधक वा प्राध्यापक पात्रता परीक्षेसाठी निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी ४०० रु. (राखीव गटातील उमेदवारांनी २०० रु.) संगणकीय पद्धतीने सीएसआयआरच्या  www.csirhrdg.res.in या संकेतस्थळावर अथवा इंडियन बँकेच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरावेत.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : या पात्रता परीक्षांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ जुलै ते २ ऑगस्ट २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सीएसआयआर-यूजीसीची जाहिरात पाहावी अथवा सीएसआयआरच्या  ww.csirhrdg.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१३.
विज्ञान, वैद्यकशास्त्र व अभियांत्रिकी विषयातील ज्या पदव्युत्तर पात्रताधारकांना कौन्सिल ऑफ इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड सायंटिफिक रिसर्च व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संशोधक व प्राध्यापक पात्रता परीक्षेद्वारा आपले करिअर सुरू करायचे असेल अशांसाठी ही परीक्षा फायदेशीर ठरू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 8:32 am

Web Title: csir ugc researcher professor eligibility test 2013
Next Stories
1 पश्चिम रेल्वेत महिला खेळाडूंसाठी विशेष संधी
2 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची शिष्यवृत्ती
3 कर्मचारी निवड आयोगाची भाषांतरकार निवड परीक्षा
Just Now!
X