News Flash

लघु उद्योजकांसाठीची मुद्रा योजना

मुद्रा बँक योजना थोडक्यात

देशातील लघु उद्योगांना सहज कर्जपुरवठा व्हावा, या उद्देशाने ८ एप्रिल २०१५ रोजी  २०,००० करोड रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी’ अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन करण्यात आले. मुद्रा बँकेद्वारे छोटय़ा कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळण्याची सोय झाली आहे. ज्यांना नवा उद्योग, काम सुरू करायचे असेल, त्यांनाही कर्ज मिळेल. त्याच बरोबर भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार यांनाही कर्ज देण्यात येईल, असे या योजनेत नमूद केले आहे.

मुद्रा बँक योजना थोडक्यात

पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टरनुसार योजना बनवली जाते. प्रत्येक सेक्टरमध्ये वेगवेगळ्या योजना असतात. मुद्रा बँक ही रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली काम करते. मुद्रा ही संस्था मुख्यत: लघु उद्योगांनाच अर्थ पुरवठा करते. या योजनेतील व्याजाचा दर कमी आहे. कर्ज मंजूर झाले की त्यानंतर कर्जदाराला ‘मुद्रा कार्ड’ दिले जाते जे की क्रेडिट कार्डसारखे असेल आणि जेवढे कर्ज मंजूर झाले आहे तसे वापरता येईल.

मुद्रा योजनेचे फायदे व तरतुदी

 • या बँकेतून लघु उद्योजकांना १० लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध होते.
 • यासाठी सरकारने एकूण २० हजार कोटींची तरतूद केली आहे.
 • या बँकेच्या मध्यमातून लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी देशातील इतर बँकांना प्रोत्साहनही देण्यात येईल.
 • शिवाय या कर्ज योजनांच्या नियमनाचं कामही मुद्रा बँकेच्या हाती असेल.

 

मुद्रा योजनेतील कर्जाचे प्रकार

 • मुद्रा योजनेत खालील तीन श्रेणीचा समावेश आहे:
 • शिशू : शिशू श्रेणीअंतर्गत ५०,००० रुपयांचं कर्ज मिळू शकतं
 • किशोर : किशोर श्रेणीत ५०, ००० रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं
 • तरुण श्रेणी : तरुण श्रेणीअंर्तगत ५ लाख रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल

मुद्रा कर्जासाठी आवश्यक बाबी

 • वयाची १८ वर्षे पूर्ण आवश्यक
 • योजना सरकारी बँकेसाठी लागू
 • अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

मुद्रा बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

 • ओळखीचा पुरावा म्हणजेच मतदान ओळखपत्र, आधार कार्ड इ.
 • रहिवासी पुरावा उदा. वीज पावती, घर पावती.
 • आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता.
 • व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इ. त्याचे कोटेशन व बिले.
 • आपण ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पूर्ण नाव व पत्ता.
 • अर्जदाराचे २ फोटो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 3:03 am

Web Title: currency plan for small entrepreneurs
Next Stories
1 करिअरमंत्र
2 एमपीएससी मंत्र : शब्द शब्द जपून..
3 वेगळय़ा वाटा : करिअरची केमिस्ट्री
Just Now!
X