24 September 2020

News Flash

टेक्स्टाइल प्रोसेसिंगमधील पदविका

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी, वाराणसी येथे उपलब्ध असणाऱ्या टेक्स्टाइल प्रोसेसिंगमधील प्रगत पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-

| June 16, 2014 01:01 am

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी, वाराणसी येथे उपलब्ध असणाऱ्या टेक्स्टाइल प्रोसेसिंगमधील प्रगत पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-
शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी हँडलूम, हँडलूम टेक्नॉलॉजी, टेक्स्टाइल टेक्नॉलॉजी, टेक्स्टाइल केमिस्ट्री वा टेक्स्टाइल प्रोसेसिंग यांसारख्या विषयातील पदविका किंवा रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र वा गृह-विज्ञान या विषयांसह बीएस्सी पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
प्रवेश प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना लेखी निवड परीक्षा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची या अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.
अभ्यासक्रमाचा कालावधी व पाठय़वेतन : दीड वर्षे. दरमहा ५०० रु. पाठय़वेतन देण्यात येईल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे प्रवेश अर्ज डायरेक्टर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी, चौकघाट, वाराणसी- २२१००२ (उत्तर प्रदेश) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २३ जून २०१४                                                                                                                                                      

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 1:01 am

Web Title: degree in textile processing
Next Stories
1 बँकिंग परीक्षांचे स्वरूप
2 जैवविविधतेत एम्. एस्सी.
3 ‘लेबर स्टडी’अभ्यासक्रम
Just Now!
X