दिल्ली विद्यापीठांतर्गत कार्यरत असणाऱ्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीजअंतर्गत दोन वर्षे कालावधीच्या व्यवस्थापन विषयांतर्गत एमबीए व पीएचडी या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक पात्रता : अभ्यासक्रमनिहाय पात्रता व प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल-
एमबीए अभ्यासक्रम : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी ते सर्वसाधारण गटातील असल्यास कमीतकमी ५०% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांनी ४५% गुणांसह) उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांनी सीएटी-२०१३ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
प्रवेश प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व सीएटीमधील गुणांकाच्या आधारे त्यांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची एमबीए अभ्यासक्रमासाठी अंतिम निवड करण्यात येईल.
व्यवस्थापन विषयातील संशोधनपर पीएचडी : अर्जदार व्यवस्थापन वा संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादतर्फे १६ ऑक्टोबर २०१३ रोजी घेण्यात आलेली कॉमन अॅडमिशन टेस्ट- २०१३ दिलेली असावी.
प्रवेश प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदव्युत्तर पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व कॉमन एन्ट्रन्स टेस्टमधील गुणांकांच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची व्यवस्थापन विषयातील संशोधनपर पीएचडीसाठी नोंदणी करण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अभ्यासक्रमांशी संबंधित अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास २५० रु.चा दि रजिस्ट्रार, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीजकडे पाठवावा.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या http://www.du.ac.in, http://www.fms.edu अथवा http://www.cat2013iimidr.ac.i या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०१४.
ज्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर व्यवस्थापन विषयातील एमबीए व संशोधनपर पीएचडी करायची असेल अशांनी या संधींचा लाभ घ्यावा.