नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रूरल मॅनेजमेंट येथे उपलब्ध असणाऱ्या ग्रामीण विकासविषयक पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश-पात्रता परीक्षेसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
अभ्यासक्रमाचा कालावधी व तपशील : या अभ्यासक्रमाचा कालावधी जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१४ असा वर्षभराचा आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत वा पदवी परीक्षेला बसलेले असावेत आणि त्यांना ग्रामीण विकासविषयक कामात रुची असायला हवी.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांची लेखी निवड परीक्षा घेण्यात येईल.  ही निवड परीक्षा देशांतर्गत निर्धारित परीक्षा केंद्रावर २४ नोव्हेंबर २०१३ रोजी घेण्यात येईल.
संबंधित विद्यार्थ्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व लेखी निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येईल.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी संपर्क : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, हैद्राबादच्या दूरध्वनी क्र. ०४०-२४००८५२२ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nird.ong.in/pgdrdw  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी आपल्या अर्जासह ५०० रु.चा (राखीव गटातील उमेदवारांनी ३०० रु.चा) एनआयआरडी-पीजीडीआरएम यांच्या नावे असणारा व हैद्राबाद येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि को-ऑर्डिनेटर (अ‍ॅडमिशन्स), सेंटर फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, राजेंद्रनगर, हैद्राबाद ५०००३० (आंध्र प्रदेश) या पत्त्यावर ११ नोव्हेंबर २०१३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.