मागील लेखामध्ये प्राकृतिक भूगोल व त्याच्याशी संबंधित अभ्यासक्रमातील इतर घटकांची तयारी कशी करावी याबाबत चर्चा केली होती. या लेखामध्ये आर्थिक व सामाजिक भूगोलाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान

महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल हा पूर्णत: तथ्यात्मक घटक आहे. यामध्ये खनिजे व ऊर्जास्रोतात महत्त्वाचे पायाभूत उद्योग, महत्त्वाची धरणे/प्रकल्प व महत्त्वाची पर्यटनस्थळे यांचा अभ्यास स्थान, वैशिष्टय़े, आर्थिक महत्त्व, वर्गीकरण, पर्यावरणीय मुद्दे, संबंधित समस्या, कारण, उपाय आणि चालू घडामोडी या मुद्दय़ांच्या आधारे करावा. या मुद्दय़ांवर जोडय़ा जुळवा प्रकारचे प्रश्न वारंवार विचारण्यात आले आहेत.

धार्मिक, वैद्यकीय, सांस्कृतिक पर्यटन, राखीव उद्याने इ. संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. या संकल्पनांवर आधारित राज्यातील स्थळे व त्यांची वैशिष्टय़े माहीत करून घ्यावीत. पर्यटनविषयक धोरणे व योजनांची अद्ययावत माहिती असायला हवी.

महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय उद्याने, वने माहीत असायला हवीत. भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्य:स्थितीत चच्रेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी. संदर्भ साहित्यातील संबंधित सगळा टेबल पाठ करणे आवश्यक नसले तरी वरचेवर त्यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. किल्लेही त्यांच्या ठळक इतिहासासह स्थान, प्रकार, वैशिष्टय़े अशा मुद्दय़ांच्या अनुषंगाने पाहावेत.

सामाजिक भूगोल

राजकीय

राज्यातील जिल्ह्य़ांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिल्ह्य़ांच्या राजधान्या व त्यांची वैशिष्टय़े, जिल्ह्य़ांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी / डोंगर / नसíगक भूरूपे या बाबी अभ्यासक्रमामध्ये वेगळ्याने नमूद केलेल्या नसल्या तरी विचारण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.

मानवी भूगोल

मानवी व सामाजिक भूगोलामध्ये वसाहती व स्थलांतर हे मुख्य मुद्दे आहेत. वसाहतींचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आर्थिक महत्त्व पाहायला हवेत. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वसाहत आहे हे समजून घेता आले तर उत्तम. पण माहिती नसल्यास वसाहतींचे प्रकार नीट अभ्यासले असतील तर एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी वसाहत कोणत्या प्रकारे विकसित झालेली असू शकेल याचा अंदाज नक्की बांधता येऊ शकतो. असा अंदाज बांधण्याचा सराव तयारीच्या वेळी केल्यास एकूणच या घटकाची तयारी चांगली होईल.

स्थलांतराचा कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय इ. दृष्टीने अभ्यास आवश्यक आहे. या बाबतीत आकडेवारी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आर्थिक पाहणी अहवालामधून अद्ययावत करून घ्यायला हवी.

लोकसंख्याशास्त्र या मुद्दय़ामध्ये अद्ययावत आकडेवारी आणि महत्त्वाचे सिद्धांत यांचा समावेश होतो. अद्ययावत आकडेवारी ही जनगणना पोर्टलवरील आकडेवारीतून अभ्यासायची आहे. सन २०११च्या जनगणनेबरोबरच महत्त्वाच्या मुद्दय़ांबाबत सन २००१ची तुलनात्मक आकडेवारीही पाहावी. ही आकडेवारी म्हणजे टक्केवारी आहे हे नेहमी लक्षात ठेवावे.

  • लोकसंख्याशास्त्रातील सिद्धांत आणि ते मांडणारे समाजशास्त्रज्ञ / अर्थतज्ज्ञ यांची माहिती करून घ्यावी. भारतामध्ये त्यातील कोणता टप्पा / स्तर चालू आहे ते समजून घ्यावे.
  • पेपर तीनमधील मानवी हक्क / संसाधने किंवा पेपर चारमधील अर्थशास्त्राचा भाग म्हणूनही विचारले जाऊ शकणारे काही जागतिक व राष्ट्रीय निर्देशांक व त्यातील भारताचे व त्याच्या शेजारी देशांचे स्थान या बाबींची अद्ययावत माहिती असायला हवी.

चालू घडामोडी

पूर्णपणे भौगोलिक घटना आहेत त्यांचा नकाशा समोर ठेवून अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याच वेळी संबंधित मूलभूत संकल्पनाही समजून घ्यायला हव्यात.

खाणी, धरणे, महत्त्वाचे प्रकल्प यांबाबत नवे निर्णय, त्यांबाबत पर्यावरणीय मुद्दे, लोकांचा विरोध / स्वीकार ही तथ्यात्मक माहिती करून घ्यावी.

पर्यावरणसंबंधी चालू घडामोडींमध्ये त्यांचा भौगोलिक पलू महत्त्वाचा असतो. तसेच जागतिक स्तरावर पर्यावरणविषयक होणारे करार, सभा, परिषदा, आकडेवारी यांची माहिती असणे आवश्यक आहे.

कृषीविषयक चालू घडामोडींमध्ये जी एम बियाणी, नव्या पीक पद्धती, नवे वाण इत्यादींचा अभ्यास पेपर ४ शीही संबंधित आहे. त्यामुळे गांभीर्याने करणे आवश्यक आहे.

दूरसंवेदन क्षेत्रातील चालू घडामोडी इंडिया इयर बुक व इंटरनेटवरून पाहाव्या लागतील.

पेपर ४ मधील आपत्ती व्यवस्थापन हा चालू घडामोडींचा भाग नसíगक आपत्तींच्या अनुषंगाने भूगोलाच्या अभ्यासात समाविष्ट करायला हवा.