|| रोहिणी शहा

मागील लेखामध्ये अर्थव्यवस्था विषयातील महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास कशा प्रकारे करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये समष्टी अर्थशास्त्र अणि विकास या मुद्दय़ांशी संबंधित घटकांची तयारी कशी करावी याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

* राष्ट्रीय उत्पन्न, ते मोजण्याच्या पद्धती, साधने, चलनवाढ आणि महागाईबाबतचे सिद्धांत, कारणे, परिणाम, उपाय यांचा अभ्यास ठउएफळ पुस्तकांमधून करावा. फइक ची काय्रे हा मुद्दा पारंपरिक परिप्रेक्ष्यातून पाहण्यापेक्षा महागाई, चलनवाढ नियंत्रण, व्याजदर नियंत्रण यातील फइकची भूमिका समजून घेण्यावर भर द्यावा.

* शासकीय योजना त्यांच्या उद्देश / विषयाप्रमाणे समजून घेता येतील. उदा. रोजगारासाठीच्या योजना एकत्रितपणे अभ्यासल्यास त्यांच्यातील साम्य-फरकाचे मुद्दे लक्षात येतील. यामुळे multistatement प्रश्नांची तयारी चांगल्या रीतीने होईल. योजनांसाठी table format मध्ये पुढील मुद्दे पाहायचे आहेत.

* सुरू झाल्याचे वर्ष, असल्यास कायद्याचे नाव, कोणत्या पंचवार्षकि योजनेच्या कालावधीत सुरू, ध्येय, हेतू, स्वरूप, खर्चाची विभागणी, अंमलबजावणी करणारी यंत्रणा, असल्यास लाभार्थ्यांचे निकष, कुठल्या योजनेत विलीन झाली असेल तर त्या योजनेचे नाव, मूल्यमापन, राजकीय आयाम (कोणते शासन).

* सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था या उपघटकाचा अभ्यास त्यामध्ये नमूद प्रत्येक मुद्दा मूलभूतपणे समजून घेऊन करणे आवश्यक आहे. याबाबत संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तसेच हा भाग नियमितपणे अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. आíथक पाहणी अहवालामध्ये याबाबत होणारी चर्चा, नवे मुद्दे, संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.

* सार्वजनिक वित्त घटकामध्ये अर्थसंकल्प हा मुद्दा मध्यवर्ती ठेवून संबंधित सर्व संकल्पना समजून घेतल्यास अवघड किंवा बोजड वाटणार नाहीत. अर्थसंकल्पाचे प्रकार, त्याच्या मंजुरीची प्रक्रिया, महसूल, कर रचना, कर सुधारणा, वित्तीय सुधारणा, वित्तीय तूट व त्याची कारणे, परिणाम, उपाय, याबाबतचे शासकीय तसेच फइकचे निर्णय, शासकीय कर्जे, शासकीय खर्च, त्यातील बाबी या मुद्दय़ांबाबत ठउएफळ च्या पुस्तकांमध्ये सोप्या व समजेल अशा भाषेत चर्चा करण्यात आली आहे.

* वित्तीय संस्थांपकी केवळ बँकांचा उल्लेख केलेला आढळतो. बँकांचे प्रकार, त्यांची स्थापना व त्यामागची भूमिका, बँकिंग क्षेत्रातील नवे ट्रेन्ड्स, संकल्पना, या क्षेत्रातील चालू घडामोडी, शासकीय तसेच फइक चे निर्णय या मुद्दय़ांचा आढावा घ्यायला हवा.

* विकास हा मुद्दा आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून अभ्यासावा असे आयोगास अपेक्षित आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकास संबंधित संज्ञांचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे. शाश्वत विकास, हरित विकास, पर्यावरणीय मुद्दे, बहुराष्ट्रीय संस्था या संकल्पना, त्यांचा आंतरराष्ट्रीय संदर्भ लक्षात घेऊन समजून घ्याव्यात. याबाबत संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक प्रश्न विचारण्यात आले आहेत.

* आर्थिक विकासाची साधने म्हणून नैसर्गिक व मानवी साधनसंपत्ती या मुद्दय़ांचा अभ्यास करायला हवा. यासाठी अभ्यासक्रमामध्ये देण्यात आलेले निर्देशांक, त्यांची पाश्र्वभूमी, त्यातील भारताचे स्थान समजून घ्यावे.

* आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे सिद्धांत, भारताचे इतर देशांशी व्यापारी करार, भारत सदस्य असलेले प्रादेशिक व्यापारी करार तसेच महत्त्वाचे प्रादेशिक व्यापारी करार व त्यातील सदस्य देश यांचा अद्ययावत अभ्यास आवश्यक आहे. जागतिक बँक गटातील वित्तीय संस्था, त्यांची कार्ये, रचना, महत्त्वाचे अद्ययावत निर्णय व त्याबाबतची भारताची भूमिका अशा आयामांच्या आधारे अभ्यासाव्यात.

* जागतिकीकरण, आर्थिक उदारीकरण व त्याचे टप्पे, त्यामागची पाश्र्वभूमी, त्यांचे सामाजिक, आर्थिक परिणाम हे मुद्दे विश्लेषण करून समजून घ्यावेत. याबाबत उद्योग व भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या घटकांवर झालेला, होणारा परिणाम समजून घेणे आवश्यक आहे.

याचबरोबर काही मूलभूत गोष्टींबाबत महाराष्ट्राची माहिती / अभ्यास गरजेचा आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्टय़े, पंचवार्षकि योजनांमधील महत्त्वाचे मुद्दे, महाराष्ट्रातील कृषीविषयक बाबी, ग्रामीण, नागरी, पायाभूत सूविधा इ. पारंपरिक बाबीसुद्धा अभ्यासणे आवश्यक आहे.

भारतीय कृषी, तिचे ग्रामीण विकासातील व अर्थव्यवस्थेतील महत्त्व आणि अन्न व पोषण आहार या घटकांबाबत दि. २२ जून २०१८च्या लेखामध्ये चर्चा करण्यात आली आहे. या मूलभूत घटकांच्या अभ्यासाची रणनीती पाहिल्यावर अर्थव्यवस्था विषयाच्या अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास कशा प्रकारे करावा याबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.