07 March 2021

News Flash

शैक्षणिक संधी

डीडस् (डेव्हलपमेन्ट एज्युकेशन एम्पॉवरमेन्ट ऑफ दि डिसअ‍ॅडव्हान्टेज्ड इन सोसायटी) या स्वयंसेवी संस्थेतर्फे कर्णबधिर मुलांसाठी विनामूल्य शिक्षण, व्होकेशनल ट्रेनिंग तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

| June 24, 2013 09:38 am

कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य प्रशिक्षणक्रम
डीडस् (डेव्हलपमेन्ट एज्युकेशन एम्पॉवरमेन्ट ऑफ दि डिसअ‍ॅडव्हान्टेज्ड इन सोसायटी) या स्वयंसेवी संस्थेतर्फे कर्णबधिर मुलांसाठी विनामूल्य शिक्षण, व्होकेशनल ट्रेनिंग तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या संस्थेतर्फे कर्णबधिर मुलांसाठी विनामूल्य ‘कुकरी अ‍ॅण्ड फूड प्रॉडक्शन’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या एक वर्षांच्या अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना पाच वेगवेगळ्या खाद्यपद्धतींतील १३५ पाककृती शिकवल्या जातील. त्याचप्रमाणे बेकरी, पाश्चिमात्य, कॉन्टिनेन्टल आणि चायनीज प्रकारच्या पाककृतींचे प्रशिक्षण दिले जाईल. फूड कावर्ि्हग, प्रेझेन्टेशन आणि सवर्ि्हग तंत्रही शिकवले जाईल. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमादरम्यान विद्यावेतनही दिले जाईल. या अभ्यासक्रमादरम्यान इंग्रजीचे लेखी आणि संवादाचे मूलभूत प्रशिक्षणही दिले जाईल. या प्रशिक्षणाअंती कर्णबधिर विद्यार्थ्यांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये प्रशिक्षण आणि नोकरीची संधीही मिळवून दिली जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुला-मुलींचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असायला हवे आणि त्यांचे वय १५ ते ३० वर्षे असायला हवे. अधिक माहितीसाठी प्रतिभा राव यांच्याशी ९८२०२३११५८ या मोबाइल क्रमांकावर तसेच ०२२-२६०५८०४८ / ४९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी
‘करिअर फेस्ट’
डोंबिवलीच्या विवेकानंद सेवा मंडळ या संस्थेतर्फे २९ – ३० जून रोजी डोंबिवली – कल्याण पालिका क्रीडासंकुल, एमआयडीसी, डोंबिवली (पूर्व) येथे आयोजित केलेल्या ‘करिअर फेस्टील्लॠ. 2013’ या सशुल्क उपक्रमात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि थेट नोकरीच्या संधींची माहिती देण्यात येणार आहे. या मेळाव्यादरम्यान अभियांत्रिकीच्या प्रत्येक विद्याशाखेत काम करण्यासाठी लागणारे कौशल्य आणि संधी याविषयी चर्चासत्रे होतील. या करिअर मेळाव्यात सुमारे २५ कंपन्या उपस्थित राहणार आहेत. या करिअर मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अंतिम वर्षांत शिकणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी www.vsmandal.org/careerguruया संकेतस्थळावर नावनोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी ०२५१ – २८००३०३ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायं. ७ या कालावधीत संपर्क करावा. अथवा helpdesk@vsmandal.org  पत्त्यावर ईमेल करता येईल.

संस्कृतमधील उच्च
शिक्षणाच्या संधी
मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागातर्फे संस्कृत प्रमाणपत्र, पदविका, प्रगत पदविका, हस्तलिखितशास्त्र प्रमाणपत्र, पदविका, प्रगत पदविका, पुराकथाशास्त्र पदव्युत्तर पदविका, प्रगत पदविका, रहस्यवाद पदव्युत्तर पदविका, प्रगत पदविका, भक्तिसाहित्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होत आहे. इच्छुकांनी २६५३०२०१ क्रमांकावर संपर्क साधावा अथवा sanskritbhavan.blogspot.com या संकेतस्थळावर अधिक माहिती पाहावी.

रशियन विद्यापीठातर्फे शिष्यवृत्त्या
रशियाच्या राज्य व सरकारी विद्यापीठांत व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या पूर्णवेळ किंवा अर्धवेळ शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे.
प्रवेश आणि अधिक माहितीसाठी प्रवेशाचे अधिकृत केंद्र असणाऱ्या एज्युरशियाच्या www.edurussia.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येईल.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 9:38 am

Web Title: educational opportunities
टॅग : Loksatta,News
Next Stories
1 फ्लोरल डिझायनिंग
2 अभियांत्रिकीची सामायिक प्रवेश प्रक्रिया
3 सेन्ट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट, लखनौ
Just Now!
X