navi-sandhi2राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागांतर्गत  रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, अधीक्षक व सांख्यिकी अधिकारी पदाच्या १४७ जागा
अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in अथवा https://mahaupsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ६ एप्रिल २०१५ पर्यंत अर्ज करावा.
 
 ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी व इतर   ७४५ जागा
उमेदवारांनी सिमेंटिंग, सिव्हिल, ड्रिलिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेंटेशन, मेकॅनिकल, प्रॉडक्शन, रिझव्‍‌र्हायर इंजिनीअरिंग, पर्यावरण विज्ञान, फायर इंजिनीअरिंगमधील पदवी अथवा एमबीए-एचआर, सीए-आयसीडब्ल्यूए यांसारखी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संगणकाचे अद्ययावत ज्ञान असावे. वयोमर्यादा ३० वर्षे. या पात्रतेशिवाय उमेदवारांनी ‘जीएटीई-२०१५’ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ मार्च २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या http://www.ongcindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १० एप्रिल २०१५ पर्यंत अर्ज करावा.
 
कर्नाटक अ‍ॅण्टिबायोटिक्स अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्स, बंगळुरू येथे मॅनेजमेंट ट्रेनी- (क्वालिटी अ‍ॅशुरन्सच्या)
८ जागा
उमेदवाराने बीफार्म वा एमफार्म पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा
२६ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी २१ ते २७ मार्च २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्नाटक अ‍ॅण्टिबायोटिक्स अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल्सची जाहिरात पाहावी अथवा केएपीएलच्या http://www.kaplindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने अर्ज वरील संकेतस्थळावर ११ एप्रिल २०१५ पर्यंत पाठवावा.

फिशरी सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, मुंबई येथे ज्युनिअर रिसर्च फेलोच्या ३ जागा
उमेदवारांनी फिशरीज सायन्स, फिश अ‍ॅण्ड फिशरीज सायन्स, मरीन बायोलॉजी, ओशनोग्राफी, फिशरीज मॅनेजमेंट वा प्राणीशास्त्र विषयातील एमएस्सी पात्रता किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० मार्च २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली फिशरी सव्‍‌र्हे ऑफ इंडिया-मुंबईची जाहिरात पाहावी अथवा सव्‍‌र्हेच्या http://fsi.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले आणि आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर- जनरल फिशरी सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, बोटावाला चेंबर्स, सर फिरोजशा मेहता मार्ग, मुंबई- ४००००१ या पत्त्यावर १३ एप्रिल २०१५ पर्यंत पाठवावेत.

pune election duty marathi news, pune election training marathi news
पुणे : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर; पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
Paytm Payments Bank Managing Director and CEO Surinder Chawla resigns
पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी सुरिंदर चावला यांचा राजीनामा
candidate of Vanchit from Dhule Abdul Rehman demand for voluntary retirement but central government opposed it
वंचितच्या धुळे येथील उमेदवाराची स्वेच्छानिवृत्तीची मागणी, मागणीला केंद्र सरकारचा विरोध