सीमा सुरक्षा दलात रेडिओ ऑपरेटर्सच्या ४३० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची रेडिओ, टीव्ही वा इलेक्ट्रॉनिक विषयांतील पात्रता उत्तीर्ण झालेले असावेत व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २ ते ८ फेब्रुवारी २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी अथवा http://www.bsf.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि डीआयजी- कमाण्डन्ट, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, एसटीएस- टीआयजीआरआय कॅम्प, एम. बी. रोड, मदनगीर, नवी दिल्ली-११००६२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०१३.
सैन्य दलात दंतवैद्यकांच्या २०० जागा
अर्जदार एमबीबीएस अथवा एमडी-एमएस यासारखे पात्रताधारक असायला हवेत व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ४५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या
२६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्य दलाच्या http://www.indianarmy.nic.in  या संकेतस्थळाला भेट
द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो डिमाण्ड ड्राफ्ट आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर जनरल- आर्मड फोर्सेस मेडिकल सव्‍‌र्हिसेस, १-ए, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, ‘एम’ ब्लॉक, रूम नं. ६०, चर्च रोड, नवी दिल्ली-११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०१३.
दिल्ली पोलीसमध्ये वायरलेस ऑपरेटर्सच्या ९६ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांच्याजवळ मेकॅनिक-कम-ऑपरेटर अथवा कम्युनिकेशन सिस्टीममधील कौशल्यपात्रता असायला हवी. टंकलेखनाचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी दिल्ली पोलीसच्या http://www.delhipolice.nic.in अथवा http://www.delhipolicerecruitment.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॉक्स नं. ८०२०, दिल्ली-११००३३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०१३.
छात्र सैनिकांसाठी सैन्य दलात ५० जागा
 अर्जदार पदवीधर, छात्र सेनेचे ‘सी’ प्रमाणपत्रधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २ ते ८ फेब्रुवारी २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्य दलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज छात्र सेनेच्या संबंधित मुख्यालयात जमा करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०१३.
दिल्ली पोलीस दलात महिलांसाठी ५२२ जागा
 अर्जदार महिला बारावी उत्तीर्ण झालेल्या असाव्यात व त्या शारीरिकदृष्टय़ा सक्षम असाव्यात. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी दिल्ली पोलिसांच्या http://www.delhipolice.nic.in अथवा http://www.delhipolicerecruitment.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॉक्स नं. ८०२०, दिल्ली-११००३३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१३.
भूजल विभाग, रायपूर येथे टेक्निकल ऑपरेटर्सच्या
१० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक अथवा वेल्डरची पात्रता असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली भूजल विभाग, रायपूरची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज रिजनल डायरेक्टर, सेन्ट्रल ग्राऊण्ड वॉटर बोर्ड, एनसीसीआर, दुसरा मजला, रीना अपार्टमेन्ट, पचपेडी नाका, रायपूर (छत्तीसगड)- ४९२००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१३.
सीएसआयआर व यूजीसीची कनिष्ठ संशोधक व प्राध्यापक पात्रता परीक्षा २०१३
उमेदवारांनी बीई, बी.टेक, फार्मसी, एमबीबीएस, इन्टिग्रेटेड बीएस-एमएस, एम.एस्सी. यांसारखी पात्रता परीक्षा कमीत कमी ५५ टक्के गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांनी ५० टक्के गुणांसह) उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
कनिष्ठ संशोधक उमेदवारांसाठी वयोमर्यादा २८ वर्षे असून प्राध्यापक पात्रता परीक्षेसाठी वयोमर्यादेची अट नाही.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली काऊन्सिल ऑफ सायन्टिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रिअल रिसर्च आणि विद्यापीठ अनुदान आयोगाची जाहिरात पाहावी अथवा सीएसआयआरच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०१३.
केंद्रीय भूजल विभागात मेकॅनिकच्या ६ जागा
 अर्जदार शालान्त परीक्षा व त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ऑटोमोबाइलविषयक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांना संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २८ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २ ते ८ फेब्रुवारी २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय भूजल विभागाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर, सेन्ट्रल ग्राऊण्ड वॉटर बोर्ड, नॉर्दन रीजन, भूजल भवन, सेक्टर बी, सीतापूर रोड योजना, राम राम बँक चौराहा, अलिगंज, लखनऊ-२२६०२१ (उप्र) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २ मार्च २०१३.