‘इस्रो’मध्ये टेक्निशियन्सच्या १४ जागा : अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इलेक्ट्रिशियन, केमिकल ऑपरेटर, फोटोग्राफी, टर्नर, रेफ्रिजरेशन, मेकॅनिकविषयक पात्रता अथवा राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘इस्रो’ची जाहिरात पाहावी अथवा ‘इस्रो’च्या http://www.vssc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जुलै २०१३.

‘इस्रो’मध्ये टेक्निकल असिस्टंटच्या ७ जागा : उमेदवारांनी सिव्हिल, इलेक्ट्रिकल अथवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदविका चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘इस्रो’ची जाहिरात पाहावी अथवा ‘इस्रो’च्या http://www.vssc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जुलै २०१३.

‘सेल’मध्ये माइनिंग फोरमनच्या १३ जागा : अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत, त्यांनी खाणकाम व्यवस्थापन व सुरक्षा विषयातील पदविका घेतलेली असावी व  ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा   २८ वर्षे.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा ‘सेल’च्या www.sail.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०१३.

इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, नागपूर येथे सीनिअर टेक्निकल असिस्टंटच्या ८ जागा : अर्जदारांनी मायनिंग इंजिनीअरिंगमधील पदविका, रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पात्रता अथवा सर्वेक्षण विषयातील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ब्युरो ऑफ माइन्सची जाहिरात पाहावी अथवा आयबीएमच्या www.ibm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स,    चौथा मजला, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर-४४०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०१३.

भारतीय वायुदलातील संधी : अर्जदार इंजिनीअरिंगसह कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांच्या गुणांची टक्केवारी कमीत कमी ६० टक्के असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. दृष्टी निकोप असणे आवश्यक. वयोगट १९ ते २३ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी अथवा वायुदलाच्या www.careerairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०१३.

एनटीपीसीच्या वित्त विभागात एक्झिक्युटिव्ह ट्रेनीजच्या २७ जागा : उमेदवारांनी पात्रता, वयोमर्यादा, गुणांची टक्केवारी इ. माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली एनटीपीसीची जाहिरात पाहावी अथवा एनटीपीसीच्या www.ntpccareers.net या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०१३.