सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज एज्युकेशन- मुंबई येथे कारकुनांच्या   पाच जागा :
अर्जदारांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रति मिनिट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रति मिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ जून- ५ जुलै २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज एज्युकेशनची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या  www.cife.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, पाच मार्ग, यारी रोड, अंधेरी (प.), वर्सोवा, मुंबई ४०००६१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख          २० ऑगस्ट २०१३.

भूमी अभिलेख विभाग- पुणे येथे करमापक- लिपिकांच्या १२२ जागा :
उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविका अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची सर्वेक्षणविषयक पात्रता पूर्ण केलेली असावी.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणेच्या httplloasis.mkcl.orgllaudrccord या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१३.

भाभा अणू संशोधन केंद्रात टेक्निशियन्सच्या ११ जागा :
अर्जदारांनी बारावीची परीक्षा विज्ञान विषय घेऊन व कमीतकमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी ऑपरेशन थिएटर असिस्टंटचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ जुलै – २ ऑगस्ट २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भाभा अणू संशोधन केंद्राची जाहिरात पाहावी अथवा बीएआरसीच्या www.barc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने बीएआरसीच्या www.barc.regov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०१३.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स- भंडारा येथे सिव्हिल इंजिनीअर्सच्या आठ जागा :
अर्जदार सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत व त्यांना संबंधित कामाचा एक वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा     ३३ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ ऑगस्ट २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.ची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडिशनल जनरल मॅनेजर एचआर, बिल्डिंग नं. २४, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि., बिल्डिंग नं. २४, त्रिचरापल्ली ६२०६१४, तामिळनाडू या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख       २४ ऑगस्ट २०१३.
पश्चिम रेल्वेच्या खेळाडूंसाठी १६ जागा :
अर्जदार पदवीधर असावेत व त्यांनी अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, क्रॉसकंट्री, बॅडमिंटन यांसारख्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्वरूपाची कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ जुलै-         २ ऑगस्ट २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली पश्चिम रेल्वेची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि पोस्टल ऑर्डरसह असणारे अर्ज सीनिअर स्पोर्टस् ऑफिसर, वेस्टर्न रेल्वे स्पोर्टस् असोसिएशन, हेडक्वार्टर ऑफिस, चर्चगेट, मुंबई ४०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१३.

मध्य रेल्वेत माजी सैनिकांसाठी ९०५ जागा :
अर्जदार माजी सैनिक असावेत व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ जुलै – २ ऑगस्ट  २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर- रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट सेल, चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, वाडीबंदर, पी. डी’मेलो मार्ग, मुंबई-४०००१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१३.    ल्ल