अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संगणक-टंकलेखनाचे ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ जुलै २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी.
महाराष्ट्रातील उमेदवारांनी संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि रिक्रूटमेंट तिकिटांसह असणारे अर्ज निदेशक (पश्चिम विभाग), कर्मचारी निवड आयोग, प्रतिष्ठा भवन, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई ४०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१३.
सैन्य दलात इंजिनीअर्ससाठी ६९ जागा :
अर्जदारांनी सिव्हिल, आर्किटेक्चर, मेकॅनिकल, टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाइल, एरोनॉटिकल, मेटॅलर्जी, इलेक्ट्रिकल, बायो-टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यांसारख्या विषयांतील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ जुलै २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१३.
भारत भवन न्यास- भोपाळ येथे कलाकारांसाठी २० जागा :
अर्जदारांनी नाटय़ कला विषयातील पात्रता, भारतेंदू नाटय़ कला अकादमीची पदविका अथवा नाटय़ कला अकादमीची अभिनयविषयक पात्रता पूर्ण केलेली असावी अथवा त्यांचा पंजीकृत संस्थेतील अभिनयविषयक  कामाचा५ वर्षांचा अनुभव असायला हवा. संगीतविषयक पात्रता व अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी भारत भवन न्यासाच्या www.bharatbhawan.or या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज भारत भवन न्यास, ज. स्वामीनाथन मार्ग, श्यामला हिल्स, भोपाळ ४६२००२ (मप्र) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१३.
जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन-पुडूचेरी येथे परिचारिकांसाठी ४६५ संधी :
अर्जदारांनी नर्सिग विषयातील पदवी घेतलेली असावी व त्यांचे नर्सिग काऊन्सिल ऑफ इंडियाकडे पंजीकरण झालेले असावे. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन, पुदुचेरीच्या http://www.jipmer.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०१३.
पदवीधर छात्र-सैनिकांना रिलायन्समध्ये संधी :
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत व त्यांनी छात्रसेनेची ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी रिलायन्स उद्योग समूहाच्या दूरध्वनी क्र. ०२२-४४७७१५९९ वर संपर्क साधावा अथवा रिलायन्स उद्योग समूहाला ६६६.१्र’.ूे या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०१३.
भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माणमध्ये ऑफिसर फायनान्स आणि अकाऊन्ट्सच्या १० जागा :
अर्जदार सीए/आयसीडब्ल्यूए पात्रताधारक असावेत अथवा त्यांनी एमबीए-फायनान्स पात्रता प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ जुलै २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत प्रतिभूती व मुद्रा निर्माणची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम, जवाहर व्यापार भवन, जनपथ, नवी दिल्ली ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१३.