इंडो-तिबेटन पोलीस दलात पशुवैद्यक साहाय्यकांच्या ४६ जागा : अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी पशुवैद्यक साहाय्यकविषयक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. याशिवाय उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ ऑगस्ट २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन पोलीस दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (एस्टॅब्लिशमेंट), डायरेक्टर जनरल, इंडो-तिबेटन पोलीस दल, एमएचए ब्लॉक-२, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख
२५ सप्टेंबर २०१३.
हिमालयन बायो-रिसोर्स इन्स्टिटय़ूटमध्ये संशोधकांसाठी ८ जागा : उमेदवारांनी रसायनशास्त्र, कृषी, फलोत्पादन, जीवशास्त्र, वन-व्यवस्थापन यासारख्या विषयात संशोधनपर पीएच. डी. पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ सप्टेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.ihbt.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१३.
भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये माजी सैनिकांसाठी संधी : अर्जदार सैन्यदलातून निवृत्त झालेले असावेत व त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन अथवा टेलि-कम्युनिकेशनमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ५० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ सप्टेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली भारत हेवी इलेक्ट्रिकल्सची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील व कागदपत्रांसह असणारे अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, नचाराम, हैदराबाद – ५०००७६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१३.
वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरोमध्ये कॉन्स्टेबलच्या १६ जागा : अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वन-संरक्षण क्षेत्रातील अनुभव ही अतिरिक्त पात्रता समजण्यात येईल.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ सप्टेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली वाइल्ड लाइफ कंट्रोल ब्युरोची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील व संपूर्णपणे भरलेले तपशीलवार अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०१३.
सीमा सुरक्षा दलात आयटीआय प्रशिक्षितांसाठी ६८५ जागा : अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इलेक्ट्रॉनिक विषयातील पात्रता पूर्ण केलेली असावी किंवा बारावीची परीक्षा गणित, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयांसह पूर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३१ ऑगस्ट – ६ सप्टेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज दि इन्स्पेक्टर जनरल, फ्रंटियर एचक्यू- बीएसएफ- राजस्थान, मंडोर रोड, जोधपूर (राजस्थान) ३४२०२६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१३.
चंद्रपूर जिल्हा परिषदेत स्थापत्य इंजिनीयर्सच्या १३ जागा : अर्जदारांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी अथवा पदविका पात्रता पूर्ण केलेली असावी.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या http://www.zpchandrapur.com अथवा http://zpchandrapur.applyjobz.com या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०१३.