राजा रामण्णा सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्सड् टेक्नॉलॉजी, इंदोर येथे टेक्निशियन्सच्या ८ जागा
अर्जदारांनी १२वीची परीक्षा गणित व विज्ञान विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण केलेली असावी. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा  ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ ऑगस्ट २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली राजा रामण्णा सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्सड् टेक्नॉलॉजीची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर-३, राजा रामण्णा सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्सड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी, पोस्ट ऑफिस सीएटी, इंदोर (मप्र) ४५२०१३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०१३.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागात अधिपरिचारिकांच्या ९२ जागा अर्जदारांनी नर्सिगमधील पात्रता उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचे महाराष्ट्र नर्सिग काऊन्सिलकडे पंजीकरण झालेले असावे. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.च्या http://mahaarogya.gov.in अथवा http://oasis.mkcl.orgdhs या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने अर्जासह पाठवायचे शुल्क भरून वरील संकेतस्थळावर अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१३.

सीमा सुरक्षादलात खेळाडूंसाठी कॉन्स्टेबलच्या ९० जागा
अर्जदारांनी शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत व त्यांनी आर्चरी, अ‍ॅथलेटिक्स, पोहणे, मुष्ठीयुद्ध, नेमबाजी, बास्केटबॉल, फुटबॉल, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल यांसारख्या विषयांत राज्य वा राष्ट्रीय स्तरावर विशेष कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २३ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ जुलै- २ ऑगस्ट २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षादलाची जाहिरात पाहावी अथवा सीमा सुरक्षा दलाच्या www.bsf.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज ओआयसी (स्पोर्टस्), द्वारा/ २५ बटालियन बीएसएफ, छावाला कँप, पोस्ट छावाला, नवी दिल्ली ११००७१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख           ८ सप्टेंबर २०१३.

कोटक महिंद्र बँकेत साहाय्यक व्यवस्थापकांच्या १० जागा
अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना बँकिंगविषयक कामाचा कमीत कमी ७ वर्षांचा अनुभव असायला हवा.
अर्जाचा नमुना अधिक माहिती व तपशिलासाठी कोटक महिंद्र बँकेच्या http://www.kotak.comया संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख    ७ सप्टेंबर २०१३.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅबियॉटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, बारामती येथे संशोधकांसाठी १४ जागा
अर्जदारांनी सॉइल सायन्सेस, कृषी, रसायनशास्त्र, जल-संसाधन, फलोत्पादन, मत्स्यविज्ञान, दुग्धोत्पादन, पर्यावरण विज्ञान, बायो-टेक्नॉलॉजी यांसारख्या विषयांतील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ जुलै-           ०२ ऑगस्ट २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.naim.red.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅबियॉटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, माळेगाव, बारामती (जि. पुणे) ४१३११५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०१३.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी-गोवा येथे संशोधकांच्या १३ जागा
अर्जदारांनी ओशनोग्राफी, मरिन फिजिक्स, मरिन जिओलॉजी, जिओफिजिक्स, मरिन बायोलॉजी, पर्यावरण विज्ञान यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अर्जाचा नमुना, इतर माहिती व तपशिलासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी-गोवाच्या http://www.nio.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख    ९ सप्टेंबर २०१३.