उमेदवारांनी मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन अथवा इन्स्ट्रमेन्टेशन इंजिनीअरिंगमधील पदवी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी जीएटीई- २०१४ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या http://www.hpclcareers.com अथवा http://www.hindustanpetroleum.com या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०१४.
‘इस्रो’मध्ये टेक्निशियन्ससाठी ६० जागा  
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी फिटर, प्लंबर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन, वेल्डर, पंप ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिक यासारख्या विषयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण केलेली असावी.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘इस्रो’ची जाहिरात पाहावी अथवा ‘इस्रो’च्या http://www.shar.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, रिक्रुटमेंट सेक्शन, सतीश धवन स्पेस सेंटर- सहार, श्रीहरिकोटा, ५२४१२४, जि. नेल्लोर, आंध्र प्रदेश या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०१४.
 सैन्यदलात खानपान अधिकाऱ्यांच्या ७ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी कॅटरिंग टेक्नॉलॉजी वा हॉटेल मॅनेजमेंटमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. हिंदी व इंग्रजीचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाच्या खानपान विभागाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज आर्मी सप्लाय कॉर्पस् सेंटर (साऊथ), पोस्ट आग्रम, बंगळुरू- ५६०००७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०१४.
 आयुध निर्माणी- इटारसी येथे फायरमनच्या १३ जागा  
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी अग्निशमनविषयक प्रशिक्षण- पात्रता पूर्ण केलेली असावी.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी- इटारसीची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, इटारसी, मध्य प्रदेश- ४६११२२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०१४.
एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट- २०१४
अर्जदारांनी इंजिनीअरिंगसह कुठल्याही विषयातील पदवी कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २३ वर्षे.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय हवाई दलाची जाहिरात पाहावी अथवा हवाई दलाच्या http://www.careerairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०१४.
 सीमा सुरक्षा दलात स्टेनोग्राफर्सच्या २५ जागा
 अर्जदार बारावीची परीक्षा उत्तीर्ण व लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट, तर टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट पात्रता उत्तीर्ण झालेले असावेत व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी अथवा बीएसएफच्या http://www.bsf.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०१४.
 राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, गोवा येथे टेक्निशियन्सच्या ५ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र असणारे अर्ज कंट्रोलर ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी, दोना पावला, गोवा- ४०३००४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०१४.