उमेदवारांनी बीएससी पदवी रसायनशास्त्र, गणित, सांख्यिकी, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान व इंग्रजी यांसारखे विषय घेऊन व कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असायला हवी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली न्यूक्लिअर पॉवर कॉपरेरेशनची जाहिरात पाहावी अथवा कॉपरेरेशनच्या http://www.npcil.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी मॅनेजर एचआर (रिक्रूटमेंट), तारापूर अणुऊर्जा केंद्र, पोस्ट ऑफिस- टीएपीपी, बोईसर (प. रेल्वे), ता. पालघर, जि. ठाणे-४०१६०४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०१४.

कर्मचारी निवड आयोगाची पदवीधर निवड परीक्षा- २०१४
अर्जदारांना पदवी परीक्षा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी.
महाराष्ट्रातील उमेदवारांनी संपूर्णपणे भरलेले आपले अर्ज क्षेत्रीय निदेशक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, १०१ – महर्षी कर्वे मार्ग, मुंबई-४०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१४.

सैन्यदलात कायदा पदवीधरांसाठी १० जागा :
अर्जदारांनी कायदा विषयातील पदवी कमीतकमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ जानेवारी २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टोरेट जनरल ऑफ रिक्रूटिंग, आरटीजी-ए, जेएजी एंट्री, एजीज ब्रँच, आर्मी हेडक्वार्टर्स, वेस्ट ब्लॉक-३, आर. के. पुरम, नवी दिल्ली-११००६६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१४.

महाराष्ट्र गुप्तचर विभागात सिक्युरिटी असिस्टंटच्या ३४ जागा :
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांना मराठीचे ज्ञान असायला हवे. गुप्तचरविषयक कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य. वयोमर्यादा २६ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय गुप्तचर विभागाची जाहिरात पाहावी अथवा गुप्तचर विभागाच्या http://www.mha.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१४.

कंपनी व्यवहार मंत्रालयात ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटच्या १९ जागा :
उमेदवार अर्थशास्त्र, वाणिज्य वा कायदा विषयातील पदवीधर असायला हवेत. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज रिजनल डायरेक्टर स्टाफ  सिलेक्शन कमिशन, ईस्टर्न रिजन, २३४/४, आचार्य जगदीशचंद्र बोस मार्ग, निझाम पॅलेस, फर्स्ट एमएसओ बिल्डिंग, ८ वा मजला, कोलकाता-७०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१४.

मध्य व पश्चिम रेल्वेमध्ये कुशल कामगारांच्या ४१५५ जागा :
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. प्रादेशिक भाषांचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली रेल्वे निवड मंडळाची जाहिरात पाहावी. अथवा रेल्वे निवड मंडळाच्या http://www.rrbmumbai.gov.in  या संकेतस्थळाला
भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज
दि असिस्टंट सेक्रेटरी, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड, डिव्हिजनल ऑफिस कंपाऊंड, मुंबई सेंट्रल, मुंबई-४००२०२
या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१४.