उमेदवारांनी बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यानंतर फार्मसी विषयातील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचे फार्मासिस्ट म्हणून पंजीकरण झालेले असावे. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ ऑगस्ट २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (मेडिकल), आयटीबीपीएफ, पोस्ट ऑफिस सीमानगर, चंदीगड १६०००३ या पत्त्यावर ५ सप्टेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
सीएसआयआर- स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग रिसर्च सेंटर, तारायणी-चेन्नई येथे संशोधकांसाठी ८ जागा
अर्जदारांनी स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगच्या विशेष अभ्यासासह सिव्हिल इंजिनीअरिंगची पदव्युत्तर पदवी उत्तम शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे. अधिक माहितीसाठी http://www.serc.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दि कंट्रोलर ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, सीएसआयआर, स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग रिसर्च सेंटर, पोस्ट बॅग नं. ८२८७, सीएसआयआर रोड, तारामणी पोस्ट ऑफिस, चेन्नई- ६००११३ या पत्त्यावर
५ सप्टेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
‘इस्रो’-त्रिवेंद्रम येथे कुशल कामगारांसाठी ४४ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची फिटर, मेकॅनिक, केमिकल ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, इलेक्ट्रोप्लेटर, टर्नर, इन्स्ट्रमेंट मेकॅनिक यासारखी पात्रता पूर्ण केलेली असावी. अर्जाच्या नमुन्यासाठी ‘इस्रो’च्या   http://www.vssc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने अर्ज वरील संकेतस्थळावर ५ सप्टेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
नौदलात इंजिनीअर्ससाठी संधी
अर्जदारांनी इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा कमीतकमी
६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा १९.५ ते २५ वर्षे. अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदलाची जाहिरात पाहावी अथवा नौदलाच्या http://www.bharti.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॉक्स नं. ०४, चाणक्यपुरी पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली ११० ०२१ या पत्त्यावर ६ सप्टेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
कंट्रोलर ऑफ क्वालिटी अ‍ॅश्युरन्स- खडकी, पुणे येथे फायरमनच्या ३ जागा
 अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, अग्निशमन क्षेत्रातील पात्रताधारक आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा
२७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली कंट्रोलर ऑफ क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स, पुणेची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज कंट्रोलर, कंट्रोलर ऑफ क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स, (अ‍ॅम्युनेशन), खडकी, पुणे ४११००३ या पत्त्यावर ७ सप्टेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
आयुध निर्माणी-जबलपूर येथे कनिष्ठ कारकुनांच्या ४ जागा
 अर्जदार बारावी उत्तीर्ण, इंग्रजी आणि हिंदीतील टंकलेखन पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी-जबलपूरची जाहिरात पाहावी अथवा आयुध निर्माणीच्या http://www.vfj.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह आयुध निर्माणी, संरक्षण मंत्रालय, व्हेईकल फॅक्टरी, जबलपूर (मप्र) ४८२००९ या पत्त्यावर ९ सप्टेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
मध्य रेल्वेत नागपूर येथे खेळाडूंसाठी ५ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. त्यांनी बॅडमिंटन, हॉकी, अ‍ॅथलॅटिक व पोहणे यासारख्या क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी. अर्ज सीनिअर डिव्हिजनल पर्सोनेल ऑफिसर, नागपूर मंडळ, मध्य रेल्वे, डीआरएम ऑफिस, किंग्ज- वे, नागपूर ४४०००१ या पत्त्यावर ८ सप्टेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर, हैद्राबाद येथे संशोधक/ इंजिनीअर्सच्या ६ जागा
 अर्जदारांनी जिओफिजिक्स, वॉटर रिसोर्स इंजिनीअरिंग यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवीधर असावेत. त्यांना रिमोट सेन्सिंग विषयातील ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहिती http://www.nrsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ८ सप्टेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावा.
‘गेल’ (इंडिया) लिमिटेडमध्ये सिनीअर इंजिनीअर-केमिकलच्या २० जागा
अर्हता- केमिकल वा पेट्रो-केमिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर. गुणांची टक्केवारी किमान ६५ टक्के.  संबंधित कामाचा कमीतकमी एक वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा ३० वर्षे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘गेल’ इंडिया लि.ची जाहिरात पाहावी अथवा ‘गेल’च्या http://www.gailonline.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर २०१४.
इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनची कारकून निवड परीक्षा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांना संबंधित प्रादेशिक भाषा व संगणकाचे ज्ञान असायला हवे. वयोगट २० ते २८ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते
२२ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.ibps.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्जाची नोंदणी करण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर २०१४.