सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

’    स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये एकूण १,३५५ पदांची भरती.

(जाहिरात क्र. Phase-VIII/2020/Selection Posts)

महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि दादरा-नगरहवेली यांचा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेस्टर्न रिजन (हफ) मध्ये समावेश होतो, यांतील एकूण

८९ रिक्त पदांचा तपशील – (कंसात पोस्ट कोड नंबर/नियुक्तीचे ठिकाण दिले आहे.)

(क ) पदवी पात्रता असलेली पदे –

(१) कॉस्टिंग ऑफिसर – (दि. १ जानेवारी २०२० रोजी) (WR 10220/टेक्स्टाईल कमिशनर मुंबई) – ४ पदे

(इमाव – १, खुला – ३)

वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०२० रोजी)

१८ ते ३० वर्षे.

वेतन – अंदाजे दरमहा रु. ५४,०००/-

(२) गर्ल कॅडेट्स इन्स्ट्रक्टर्स (GCIS) (फक्त महिलांसाठी) – (WR 10620/डायरेक्टोरेट जनरल एनसीसी, मुंबई) – २४ पदे (अजा – ३, इमाव – ८, खुला – ११, ईडब्ल्यूएस् – २)

वयोमर्यादा – २०-२५ वर्षे.

वेतन – अंदाजे रु. ४०,०००/-.

(३) इकॉनॉमिक ऑफिसर – (WR 11020/टेक्स्टाईल कमिशनर, मुंबई) – ८ पदे (अजा – १, इमाव – २, खुला – ५,

ईडब्ल्यूएस – १)

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

वेतन – अंदाजे रु. ५४,०००/- दरमहा.

(४) टेक्निकल असिस्टंट – (WR11520/नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नवी दिल्ली) – ३ पदे (इमाव – १, खुला – १, ईडब्ल्यूएस – १)

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

वेतन – अंदाजे रु. ५४,०००/- दरमहा.

(५) लॅबोरेटरी असिस्टंट – ग्रेड- II (WR 11620/सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च, पुणे) – ११ पदे (अजा – २, इमाव – २, खुला – ६, ईडब्ल्यूएस – १) (१ पद अपंग एचएसाठी राखीव).

वयोमर्यादा – २१ ते २७ वर्षे.

वेतन – अंदाजे रु. ४०,०००/- दरमहा.

(६) सीनियर रेडिओ टेक्निशियन – (WR 11720/डायरेक्टोरेट ऑफ लाइट हाऊसेस अ‍ॅण्ड लाईट शिप्स, गोवा) – २ पदे (इमाव – १,

खुला – १) (१ पद अपंग इतरसाठी राखीव)

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

वेतन – अंदाजे रु. ५४,०००/- दरमहा.

(७) ज्युनियर इंजिनीअर (क्वालिटी अ‍ॅश्युरन्स)व्हेहिकल – (WR 11820/डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन) – ३ पदे

(अजा – १, खुला – २)

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

वेतन – अंदाजे रु. ५४,०००/- दरमहा.

(८) सायंटिफिक असिस्टंट (मिलिटरी एक्स्प्लोझिव्हस्) – (WR 12020/डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन) – ४ पदे

(अजा – १, इमाव – १, खुला – २)

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

वेतन – अंदाजे रु. ५४,०००/- दरमहा.

(९) टेक्निकल ऑफिसर – ((WR 12320/टेक्स्टाईल कमिशनर, मुंबई) – ४ पदे (अजा – १, खुला – २, ईडब्ल्यूएस – १) वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

वेतन – अंदाजे रु. ५४,०००/- दरमहा.

(१०) डाएटिशियन ग्रेड- -III (ज्युनियर डाएटिशियन) – (WR 12520//डायरेक्टोरेट जनरल मेडिकल सर्व्हिसेस (आर्मी)) – ६ पदे (इमाव – २, खुला – ४)

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

वेतन – अंदाजे रु. ५४,०००/- दरमहा.

(११) मेकॅनिकल सुपरवायझर (SR)-(WR 10120/फिशरी सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, मुंबई) – १ पद (ईडब्ल्यूएस्)

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

(१२) केअर टेकर – (WR 10720/नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट) – १ पद (खुला)

वयोमर्यादा – १८-२५ वर्षे.

(१३) सीनियर फोटोग्राफर – (WR 10820//नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट) – १ पद (खुला).

वयोमर्यादा – १८-३० वर्षे.

(१४) लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फॉम्रेशन असिस्टंट – ((WR 11120/सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च, पुणे) – १ पद (खुला)

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

(१५) हेड ड्राफ्ट्समन – (WR 11420/सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च, पुणे) – १ पद (अज).

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

(१६) सायंटिफिक असिस्टंट (मेटॅलर्जी) – (WR 11920/डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन) – १ पद (अजा).

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

(१७) सायंटिफिक असिस्टंट (व्हेहिकल) – ((WR 12120/डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शन) – १ पद (अजा).

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

(१८) इन्स्ट्रक्टर स्टेनोग्राफी (इंग्लिश) –

((WR 12320/नॅशनल करियर सर्व्हिस सेंटर फॉर एस्सी/एस्टी, सुरत) – १ पद (अजा).

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे.

(ii) बारावी पात्रता असलेली पदे – १९ ते २४.

(१९) स्टॉकमॅन (ज्युनियर ग्रेड) – (WR 10320/मिनिस्ट्री ऑफ फिशरिज, अहमदाबाद) – ५ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – १, ईडब्ल्यूएस – २)

वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे.

(२०) ज्युनियर कॉम्प्युटर – (WR 10420/सेंट्रल वॉटर कमिशन) – २ पदे (खुला)

वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे.

(२१) रिसेप्शनिस्ट/टिकेटिंग असिस्टंट – (WR 10920/नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स) – १ पद (खुला).

वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे.

(२२) असिस्टंट स्टोअर किपर – (WR 1122/नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर) – १ पद (खुला)

वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे.

(२३) मेकॅनिक – (WR 11320/नॅशनल फायर सर्व्हिस, कॉलेज, नागपूर) – १ पद (खुला).

वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे.

(२४) अ‍ॅग्रिकल्चर फिल्ड मॅन – (WR 12420/सेंट्रल कॅटल ब्रिडिंग फार्म, सुरत) – १ पद (खुला)

वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे.

(III) दहावी पात्रता असलेले पद –

(२५) फिल्ड कम लॅबोरेटरी अटेंडंट – (WR  10520/नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फर्मिंग) – १ पद (इमाव).

वयोमर्यादा – १८-२५ वर्षे.

कमाल वयोमर्यादेत सूट.

(इमाव – ३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ५ वर्षेपर्यंत).

(विधवा/परित्यक्ता महिला यांना वयोमर्यादा – ३५ (खुला)/ ४० (अजा/अज) वर्षेपर्यंत).

वेतन – पद क्र. १९ ते २१ आणि २३ साठी

रु. ३०,०००/- दरमहा.

पद क्र. २२ व २४ साठी रु. ४०,०००/- दरमहा.

अर्जाचे शुल्क – रु. १००/- (अजा/अज/महिला/दिव्यांग/माजी सैनिक यांना फी माफ आहे.)

ऑनलाइन फी भरण्याचा अंतिम दि. २३ मार्च २०२० (२३.५९ वाजे)पर्यंत.

ऑफलाइन (एसबीआय चलान २३ मार्च २०२० पर्यंत डाऊनलोड केले असल्यास) फी भरण्याचा अंतिम दि. २५ मार्च २०२० पर्यंत.

परीक्षा केंद्र – स्टाफ सिलेक्शन कमिशन (हफ) साठी मुंबई, पुणे, अहमदाबाद.

निवड पद्धती – कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची

(किमान शैक्षणिक पात्रतेच्या स्तरावरील)

(१) जनरल इंटेलिजन्स,

(२) जनरल अवेअरनेस,

(३) क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड (प्राथमिक अंकगणित),

(४) इंग्लिश लँग्वेज – प्रत्येकी २५ प्रश्न/ ५० गुण, एकूण २०० गुण, वेळ ६० मिनिटे.

प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.५०गुण वजा केले जातील. ऑनलाइन अर्ज https://ssc.nic.in या संकेतस्थळावर दि. २० मार्च २०२०

(२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.