सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) (मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रिब्युशन, भारत सरकार, नवी दिल्ली आपल्या BIS मुख्यालय आणि देशभरातील BIS ऑफिसेसमध्ये पुढील पदांची भरती. एकूण ५० पदे.

१) टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी) – ३० पदे (अजा – ४, अज – ४, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – ११, खुला – ४)

(१ पद अपंग एचआयसाठी आणि ३ पदे माजी सनिकांसाठी राखीव)

(शाखेनुसार रिक्त पदांचा तपशील. केमिकल – १२, मेकॅनिकल – ५, इलेक्ट्रिकल – २, मायक्रोबायोलॉजी – ६, सिव्हिल – ५)

पात्रता – (दि. ८ मार्च २०२० रोजी) बी.एस्सी. (केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/फिजिक्स/ बायोटेक्नॉलॉजी/फूड टेक्नॉलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ इलेक्ट्रॉनिक्स यांपैकी एका विषयासह) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अजसाठी गुणांची अट ५०%) किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/सिव्हिल/केमिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/फूड टेक्नॉलॉजी/मेटॅलर्जी यांपकी एका विषयासह इंजिनीअरिंग डिप्लोमा. किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अजसाठी ५०% गुण आवश्यक)

वेतन – पे लेव्हल-६ अंदाजे दरमहा रु. ५४,०००/-.

(२) सिनियर टेक्निशियन – २० पदे (अजा – १, अज – २, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – २, खुला – ११) (१ पद अपंग एचआयसाठी आणि २ पदे माजी सनिकांसाठी राखीव)

(शाखेनुसार रिक्त पदांचा तपशील – एअरकंडिशिनग/रेफ्रिजरेशन – १ पद, मेकॅनिक (डिझेल इंजिन) – ७ पदे, इलेक्ट्रिशियन – ५ पदे, फिटर – ३ पदे, वेल्डर – १ पद, कारपेंटर – ३ पदे).

पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण आणि २ वर्षांचा अनुभव किंवा संबंधित ट्रेडमधील नॅशनल अ‍ॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट.

वेतन – पे लेव्हल-४ अंदाजे वेतन दरमहा रु. ४०,०००/-.

अर्जाचे शुल्क – रु. ५००/- (अजा/अज/दिव्यांग/माजी सैनिक यांना फी माफ आहे.)

वयोमर्यादा – दि. ८ मार्च २०२० रोजी १८ ते ३० वर्षे. (इमाव – ३३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३५ वर्षेपर्यंत, अपंग – ४० / ४३ / ४५ वर्षेपर्यंत, विधवा/परित्यक्ता महिला – ३५ / ३८ / ४० वर्षेपर्यंत)

ऑनलाइन अर्ज भरण्याविषयी शंका समाधानासाठी संपर्क करा ८०८८४१८७६६ किंवा ८०८८४१८७६४  किंवा

ई-मेल करा labrecruitment@bis.gov.in.

निवड पद्धती –

(अ) ऑनलाइन एक्झामिनेशन आणि

(ब) स्किल टेस्ट/ट्रेड टेस्ट.

ऑनलाइन एक्झामिनेशन – (१) रिझिनग, (२) इंग्लिश लँग्वेज, (३) जनरल अवेअरनेस, (४) टेक्निकल नॉलेज प्रत्येकी ५० प्रश्न / ५० गुण, एकूण २०० गुण, वेळ १२० मिनिटे. (प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील.)

परीक्षा केंद्र मुंबई, रायपूर, पणजी, बंगलोर, हैद्राबाद, भोपाळ, अहमदाबाद, इ.

प्रोबेशन कालावधी – २ वर्षांचा असेल.

ऑनलाइन अर्ज http://www.bis.gov.in  या संकेतस्थळावर दि. ८ मार्च २०२०(१८.०० वाजे)पर्यंत करावेत. (अ) अ‍ॅप्लिकेशन रजिस्ट्रेशन, (ब) पेमेंट ऑफ फीस, (क) फोटोग्राफ आणि सिग्नेचर स्कॅन करून अपलोड करणे.