सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

मिश्रधातू निगम लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम), कांचनबाग, हैद्राबाद पुढील एकूण १८ पदांची भरती.

(१) ज्युनियर आर्टझिन (फिटर) (WG2) – एकूण ६ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २).

(२) ज्युनियर आर्टझिन (इलेक्ट्रिकल) – ३ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – १).

पद क्र. १ व २ साठी पात्रता – (दि. ४ मार्च २०२० रोजी) दहावी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमधील आयटीआय नॅशनल अ‍ॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेटसह आणि ४ वर्षांचा अनुभव.

वेतन – दरमहा रु. ३४,०००/-.

वयोमर्यादा – ३० वर्षेपर्यंत.

(३) एनडीटी ऑपरेटर (WG4) – ४ पदे (अजा – १, अज – २, खुला – १).

पात्रता – मेकॅनिकल/मेटॅलर्जीमधील इंजिनीअरिंग डिप्लोमा आणि एनडीटी लेव्हल-२ सर्टिफिकेट २ वर्षांचा अनुभव (रेडिओग्राफी टेस्टिंगमधील).

वेतन – दरमहा रु. ३७,५००/-.

वयोमर्यादा – ३५ वर्षेपर्यंत.

(४) ज्युनियर मॅनेजर (सिव्हिल) – २ पदे (खुला).

पात्रता – बी.ई./बी.टेक. (सिव्हिल) किमान ६०% गुण आणि १ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – २८ वर्षेपर्यंत.

वेतन – रु. ५२,५००/- प्रतिमाह.

(५) ज्युनियर मॅनेजर (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) – २ पदे (इमाव – १, खुला – १).

पात्रता – पदवी किमान ५५% गुणांसह आणि एम.बी.ए. किंवा समतुल्य आणि १ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – २८ वर्षेपर्यंत.

वेतन – रु. ५२,५००/- प्रतिमाह.

(६) असिस्टंट मॅनेजर (आयटी-सिस्टीम अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) – १ पद (खुला).

पात्रता – बी.ई./बी.टेक. (सीएसई/आयटी/ईसीई) किंवा एमसीए किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण आणि २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – ३० वर्षेपर्यंत.

वेतन – रु. ६.६ लाख प्रती वर्ष.

निवड पद्धती –

पद क्र. १ ते ३ साठी लेखी परीक्षा आणि ट्रेड/स्किल टेस्ट.

पद क्र. ४ ते ६ साठी फक्त लेखी परीक्षा.

ऑनलाइन अर्ज URL://www.midhani-india.in>careers>e-recruitment वर दि. १८ मार्च २०२० (१७.०० वाजे)पर्यंत करावेत.

 

आरआयटीईएस लिमिटेड (RITES Limited) (भारत सरकारचा उपक्रम) इंजिनीअर (सिव्हिल) च्या ३५ पदांची भरती. (अजा – १४, अज – ४, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – २, खुला – १२) (१ पद अपंग उमेदवारासाठी राखीव)

पात्रता – बी.ई./बी.टेक. (सिव्हिल इंजिनीअरिंग) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण आणि २ वर्षांचा अनुभव. (अजा/अज/इमाव/दिव्यांग उमेदवारांना ५०% गुण आवश्यक)

वयोमर्यादा – (दि. १ फेब्रुवारी २०२० रोजी) ४० वर्षेपर्यंत (इमाव/ईडब्ल्यूएस – ४३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ४५ वर्षेपर्यंत).

वेतन – रु. ८ लाख प्रति वर्ष.

निवड पद्धती – शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा आणि/किंवा इंटरव्ह्य़ूसाठी मुंबई, नागपूर इ. केंद्रांवर बोलाविले जाईल. तारीख नंतर जाहीर केली जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. ६००/- + जीएसटी (ईडब्ल्यूएस /अजा / अज / अपंग उमेदवारांना रु. ३००/- + जीएसटी).

हेल्प डेस्क क्र.०११-३३५५७००० विस्तार क्र. १३२२१

ई-मेल आयडी – pghelpdesk@hdfcbank.com

ऑनलाइन अर्जाची पिंट्रआऊट (ज्यावर रजिस्ट्रेशन नंबर लिहिलेला असेल.) सोबत आवश्यक कागदपत्रे (स्वयंसाक्षांकित) सिलेक्शन टेस्टच्या वेळी सादर करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज http://www.rites.com या संकेतस्थळावर दि. २३ मार्च २०२० पर्यंत करावेत.

अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लॅबोरेटरी, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मिसाईल काँप्लेक्स, डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, हैद्राबादमध्ये ग्रॅज्युएटल, टेक्निशियन आणि ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेसच्या ६० पदांची भरती. (जाहिरात क्र. अरछ/23/2020/3322/डफ/1)

(ए) ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस –

(१) एअरोस्पेस इंजिनीअरिंग – ३ पदे,

(२) कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग – ३ पदे,

(३) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – २ पदे,

(४) इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग – ४ पदे,

(५) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – ८ पदे.

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी उत्तीर्ण.

स्टायपेंड – दरमहा रु. ९,०००/-.

(बी) टेक्निशियन (डिप्लोमा) अ‍ॅप्रेंटिस –

(१) कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग – २ पदे,

(२) इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग – ४ पदे,

(३) इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग – ४ पदे,

(४) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – १० पदे.

पात्रता – संबंधित विषयातील डिप्लोमा इंजिनीअरिंग.

स्टायपेंड – दरमहा रु. ८,०००/-.

(सी) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस –

(१) सीएनसी प्रोग्रॅमर कम ऑपरेटर – २ पदे,

(२) कॉम्प्युटर ऑपरेटर अ‍ॅण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट – २ पदे,

(३) इलेक्ट्रिशियन – ६ पदे,

(४) फायबर रिएन्फोस्र्ड प्लॅस्टिक प्रोसेसर – २ पदे,

(५) फिटर – ८ पदे.

पात्रता – संबंधित ट्रेडमधील आयटीआय.

स्टायपेंड – रु. ७,७००/- रु. ८,०५०/- दरमहा.

प्रशिक्षणाचा कालावधी असेल १२ महिने. ज्या उमेदवारांनी पात्रता परीक्षा २०१७, २०१८ किंवा २०१९ मध्ये उत्तीर्ण केली आहे असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

ग्रॅज्युएट आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अ‍ॅप्रेंटिसेससाठी उमेदवारांनी त्यांचे नाव http://www.mhrdnats.gov.in आणि ट्रेड अ‍ॅप्रेंटिसेस (आयटीआय) पदांसाठी ncvtmis.gov.in या संकेतस्थळावर रजिस्टर करावे.

निवडलेल्या उमेदवारांना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सादर करावे लागेल.

अर्जाचा नमुना ७ मार्च २०२० च्या एम्प्लॉयमेंट न्यूज साप्ताहिकाच्या पान क्र. ३४ वर दिलेला आहे.

विहित नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज सोबत पुढील कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती जोडून दि. २१ मार्च २०२० पर्यंत पुढील पत्त्यावर पोहोचतील असे पाठवावेत.

The Director, Advanced System Laboratory, Dr. A.P.J. Abdul Kalam Missile Complex, Defence Research and Development Organisation, P.O. Kanchanbagh, Hyderabad – 500 058.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे गुणपत्रके, पदवी/पदविका/आयटीआय सर्टिफिकेट्स, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, जातीचा दाखला (लागू असल्यास), अपंगत्वाचा दाखला (लागू असल्यास), आधार/फोटो आयडी, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (MHRDNATS/ NCVTMIS या पोर्टलवरील).

अर्जाच्या लिफाफ्यावर ‘Application for Apprenticeship Training 2020 (Graduate/Diploma/ITI)’ (लागू असलेले) असे लिहावे.