navi-kshitijeमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात उप. प्रादेशिक अधिकारी-वर्ग ‘अ’च्या १३ जागा
संगणकीय पद्धतीने अर्ज करण्याबाबत सूचना, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा इ.च्या तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जाहिरात पाहावी अथवा http:\\oasis.mkcl.org\mpcb\2014 अथवा http://www.mpcb.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर २८ डिसेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावा.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अ‍ॅण्ड इन्फरमेशन रिसोर्सेस, नवी दिल्ली येथे संशोधकांच्या ३ जागा
अर्जाचा नमुना, अधिक माहिती व इतर तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अ‍ॅण्ड इन्फरमेशन रिसोर्सेस, नवी दिल्लीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.niscair.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कंट्रोलर ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन सीएसआयआर- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अ‍ॅण्ड इन्फरमेशन रिसोर्सेस, डॉ. के. एस. कृष्णन मार्ग, नवी दिल्ली ११००१२ या पत्यावर ३० डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

अभियांत्रिकी पदवी उत्तीर्णासाठी सैन्यदलात ६० जागा
उमेदवारांनी अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते अभियांत्रिकीच्या पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत. उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्यांचे वय २० ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी. अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावा.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल बायोलॉजी, कोलकाता येथे सहाय्यकांच्या ६ जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनीट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ डिसेंबर २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल बायोलॉजी, कोलकाताची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.career.iicb.res.in या संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावा.

सैन्यदलाच्या शिक्षण विभागात २० जागा
उमेदवारांनी एमए, एमएस्सी, एमकॉम, एमसीए-एमबीए यांसारखी पात्रता परीक्षा किमान द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहिती साठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ नोव्हेंबर- ६ डिसेंबर २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाच्या शैक्षणिक विभागाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावा.