केंद्रीय विकास आयुक्तांच्या कार्यालयात सहसंचालक, मेकॅनिकल इंजिनीअरच्या ८ जागा
अर्जदार मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत व त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा.  वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी.
संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http//www.upsconline.nic.in  या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मे २०१४.

संरक्षण मंत्रालय- कंट्रोलरेट ऑफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स- नगर येथे कनिष्ठ कारकुनांच्या १० जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांना संगणकाचे ज्ञान असावे आणि त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र व तपशिलासह असणारे अर्ज दि कंट्रोलर, कंट्रोलरेट ऑफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स (व्हेईकल्स), पोस्ट बॉक्स नं. २, औरंगाबाद रोड, अहमदनगर ४१४००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ मे २०१४.

भारत सरकार- टांकसाळ, हैदराबाद येथे कुशल कामगारांच्या २६ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची डाय प्रेस ऑपरेटर, फिटर, मिल राइट, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, मशिनिस्ट, सुतारकाम, मेकॅनिक यांसारखी पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत सरकार- टांकसाळ, हैदराबादची जाहिरात पाहावी अथवा टांकसाळीच्या https//jobapply.in/minthyderabad संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मे २०१४.

मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन, नागपूर येथे टेक्निशियन असिस्टंट (ड्रिलिंगच्या) ३८ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ड्रिलिंग विषयातील पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या http://www.mecl.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर (पीअ‍ॅण्डए), मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, हाय लॅण्ड ड्राइव्ह रोड, सेमिनरी हिल्स, नागपूर ४४०००६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३ मे २०१४.

केंद्रीय भूजल विभाग, चेन्नई येथे असिस्टंट स्टोअरकीपरच्या ३ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांना स्टोअर्स विषयक कामाचा सुमारे तीन वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय भूजल विभाग, चेन्नईची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज ‘दि रिजनल डायरेक्टर, सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड, ई विंग, सी ब्लॉक, राजाजी भवन, बसंतनगर, चेन्नई ६०००९० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ४ मे २०१४.

केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क विभाग, पुणे येथे खेळाडूंसाठी १९ जागा
अर्जदार पदवीधर आणि ८००० शब्द प्रतिमिनिट डाटा स्पीड एण्ट्री पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क विभाग, पुणेच्या http//www.puneceuexcise.gov.in अथवा http://www.cbec.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अप्पर आयुक्त, संवर्ग नियंत्रण कक्ष, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग आणि सेवाकर, पुणे क्षेत्रीय कार्यालय, आसीई हाऊस, वाडिया कॉलेजसमोर, ४१/ए, ससून रोड, पुणे ४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ मे २०१४