केंद्रीय कृषी आणि सहकार मंत्रालयात विपणन अधिकाऱ्यांच्या ४ जागा  
अर्जदारांनी रसायनशास्त्र, कृषी, फूड टेक्नॉलॉजी, दुग्धोत्पादन यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०१४.
भाभा अणु-संशोधन केंद्रात तांत्रिक अधिकाऱ्यांच्या (पदार्थविज्ञानशास्त्र) १० जागा
अर्जदारांनी फिजिक्समधील एमएस्सी पदवी कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली भाभा अणु संशोधन केंद्राची जाहिरात पाहावी अथवा बीएआरसीच्या http://www.barc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०१४.
‘इस्रो’मध्ये नेल्लोर येथे संशोधक/अभियंत्यांच्या १० जागा
अर्जदारांनी इंजिनीयरिंगमधील पदवी परीक्षा कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. वयोमर्यादा ४० वर्षे. या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘इस्रो’ची जाहिरात पाहावी अथवा ‘इस्रो’च्या http://www.shar.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०१४.
एअरपोर्ट्स् अॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स)च्या १० जागा
उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, रेडिओ इंजिनीअरिंगमधील पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा व त्यांना संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एअरपोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या http://www.airportsindia.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०१४.
‘इस्रो’मध्ये हासन (कर्नाटक) येथे कुशल कामगारांच्या ८ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची फिटर, रेफ्रिजरेशन, डिझेल मेकॅनिक, प्लम्बर, इलेक्ट्रिशियन यांसारखी पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘इस्रो’ची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दी सीनियर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, मास्टर कंट्रोल फॅसिलिटी, सलगमा रोड, हासन ५७३२०१ (कर्नाटक) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० मे २०१४.
संरक्षण मंत्रालयात कामगारांसाठी १२४ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालय- रांचीची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडंट, एएफडी पानगड, पिन ९००३४९ C/o 99 APO या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ जून २०१४.
बॉम्बे इंजिनीअर ग्रुप- खडकी- पुणे येथे कनिष्ठ कारकुनांच्या ५ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी हिंदी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट व संगणकाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ मे २०१४ च्या अंकातील बॉम्बे इंजिनीयर ग्रुप- खडकी, पुणेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि कमांडंट, बॉम्बे इंजिनीअर ग्रुप अँड सेंटर, खडकी-पुणे ४११००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २ जून २०१४.