अर्जदारांनी चांगल्या शैक्षणिक आलेखासह बी.फार्म. अथवा एम.फार्म. पात्रता पूर्ण केलेली असावी.
अधिक माहिती व तपशिलासाठी कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकलच्या http://www.kaplindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर, कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड, निर्माण भवन, डॉ. राजकुमार रोड, फर्स्ट ब्लॉक, राजाजीनगर, बंगळुरू- ५६००१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख
१३ मे २०१४.

जिऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियामध्ये प्रशासन अधिकाऱ्यांच्या १० जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांना अकाउंटस् व प्रशासन विषयक कामाचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ एप्रिल – २ मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या ttp://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०१४.

‘इस्रो’मध्ये संशोधन-साहाय्यकांच्या ५ जागा
उमेदवारांनी अ‍ॅनिमेशन वा मल्टी-मीडिया विषयातील बीएस्सी पदवी पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘इस्रो’च्या http://www.sac.gov.in अथवा http://www.sac.isro.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (आरएमटी), बिल्डिंग नं. ३० डी, स्पेस अ‍ॅप्लिकेशन्स सेंटर, ‘इस्रो’, अंबावाडी विस्तार पोस्ट ऑफिस, जोधपूर टेकडा, अहमदाबाद- ३८० ०१५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ मे २०१४.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन- मुंबई येथे लेबॉरेटरी टेक्निशियन्सच्या ७ जागा
उमेदवारांनी अ‍ॅनलॅटिकल केमिस्ट्रीसह एमएस्सी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्यांनी बीएस्सी पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना अ‍ॅनलॅटिकल कामाचा अनुभव असायला हवा.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ मे ते १० मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा बीपीएलच्या http://www.bplcareers.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख १९ मे २०१४.

सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजीमध्ये कनिष्ठ कारकुनासाठी ७ जागा
अर्जदारांनी बारावी उत्तीर्ण केलेली असावी व ते हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट तर इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असायला हवेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ एप्रिल ते २ मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.cift.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज  टेक्नॉलॉजी, विलिंग्डन आयलंड, मत्स्यपुरी पोस्ट ऑफिस, कोचीन ६८२०२९ (केरळ) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ मे २०१४.