अर्जदार इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसणारे असावेत. त्यांनी परीक्षेत ६० टक्के संपादन करायला हवेत. वयोगट १९ ते २४ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदलाची जाहिरात पाहावी अथवा नौदलाच्या http://www.nausena-bharti.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ५ ऑगस्ट २०१४ पर्यंत अर्ज करावेत.

चंदिगढ प्रशासनात आरोग्य सेवकांच्या १० जागा
अर्जदारांनी शालान्त परीक्षा भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य सेवा-विषयक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली चंदिगढ प्रशासनाची जाहिरात पाहावी अथवा प्रशासनाच्या http://recruitment-cdacmohali.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ६ ऑगस्ट २०१४ पर्यंत अर्ज करावा.

सैन्य दलात छात्रसैनिकांसाठी ५० जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर, शारीरिकदृष्टय़ा सक्षम व छात्रसेनेचे ‘सी’ प्रमाणपत्र धारक असावेत. वयोगट १९ ते २५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली छात्रसेनेची जाहिरात पाहावी अथवा http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यात संपूर्णपणे भरलेले अर्ज राष्ट्रीय छात्रसेनेच्या संबंधित मुख्यालयात ८ ऑगस्ट २०१४ पर्यंत जमा करावेत.

आयुध निर्माणी कारखान्यांमध्ये अभियांत्रिकी पदविकाधारकांसाठी १५७२ जागा
अर्जदार मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाइल, सिव्हिल वा इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘आयुध निर्माणी’ची जाहिरात पाहावी अथवा ‘आयुध निर्माणी’च्या ofb.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ९ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत.

भारतीय हवाई दलाच्या तांत्रिक विभागात संधी
अर्जदारांनी विज्ञान, गणित, सांख्यिकी, भूगोल, संगणक विज्ञान, पर्यावरणशास्त्र यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी कमीतकमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १६ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुसेनेची जाहिरात पाहावी अथवा वायुसेनेच्या http://www.careerairforce.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॅग नं. ००१, नरिमन भवन पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली- ११०१०६ या पत्त्यावर ९ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.

सैन्यदलाच्या शैक्षणिक विभागात १९५ जागा
उमेदवारांनी एमए, एमएस्सी, बीटेक्, बीसीए, बीएस्सी (आयटी) यांसारखी पदवी प्राप्त केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा
२५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाच्या शैक्षणिक विभागाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज एचक्यू-रिकृटिंग झोन, ३, राजेंद्रसिंहजी मार्ग, पुणे- ४११००१ या पत्त्यावर १० ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅबियॉटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, बारामती येथे स्टेनोग्राफर्सच्या ६ जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी व हिंदी स्टेनोग्राफीची ८० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅबियॉटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, बारामतीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.niam.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅबियॅटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, मालेगाव खुर्द, बारामती- ४१३ ११५ या पत्त्यावर ११ ऑगस्टपर्यंत पाठवावेत.

‘एनटीपीसी’मध्ये कुशल कामगारांसाठी १२९ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावा आणि त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची फिटर, इलेक्ट्रिशियन वा इन्स्ट्रमेंट मेकॅनिकची पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘एनटीपीसी’ची जाहिरात पाहावी अथवा ‘एनटीपीसी’च्या http://www.ntpccareers.net या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ११ ऑगस्ट २०१४ पर्यंत अर्ज करावा.