अर्जदार पदवीधर असावेत. त्यांनी क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, कॅरम, टेबल-टेनिस यांसारख्या क्रीडा प्रकारात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २६ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ जून ते ४ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा रिझव्र्ह बँकेच्या http://www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह रिझव्र्ह बँकेच्या मुंबई कार्यालयात १५ जुलै २०१४ पर्यंत जमा करावेत.
‘इस्रो’मध्ये टेक्निकल असिस्टंटच्या १४ जागा
उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, केमिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ जून ते ४ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची जाहिरात पाहावी अथवा ‘इस्रो’च्या http://www.shar.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १७ जुलै २०१४पर्यंत अर्ज करावा.
राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी – रायबरेली येथे साहाय्यकांच्या ४ जागा
अर्जदार पदवीधर असावेत. त्यांनी इंग्रजी व हिंदी टंकलेखनाची पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ जून – ४ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी- रायबरेली जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज रजिस्ट्रार, राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, रातापूर चौक, रायबरेली २२९३१६ (उ.प्र.) या पत्त्यावर १५ जुलै २०१४ पर्यंत पाठवावेत.
नौदलाच्या परिवहन विभागात असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर्सच्या ५ जागा
अर्जदार इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत. त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ जून ते ४ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १७ जुलै २०१४ पर्यंत अर्ज करावा.
मँगनीज ओअर इंडियामध्ये कुशल कामगारांच्या २१ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी खाणकामविषयक कामाची पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली मँगनीज ओअर इंडियाची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज जनरल मॅनेजर (पर्सोनेल), मँगनीज ओअर इंडिया लि., मॉइल भवन, १-ए, काटोल रोड, नागपूर ४४००१३ या पत्त्यावर २१ जुलै २०१४ पर्यंत पाठवावेत.
पूर्व-तटीय रेल्वेत स्काउट्स व गाइडस्साठी ८ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिकशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. त्यांनी स्काउट्स व गाइड्स क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली पूर्व-तटीय रेल्वेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील अर्ज संपूर्णपणे भरून कागदपत्रांसह डिव्हिजनल पर्सोनेल ऑफिसर, ईस्ट-कोस्ट रेल्वे, वाल्टीयर डिव्हिजन, पोस्ट दोंडापार्थी, विशाखापट्टणम,
आंध्र प्रदेश- ५३०००४ या पत्त्यावर २१ जुलै २०१४  पर्यंत पाठवावेत.