हवाई दलात सैनिक म्हणून संधी
उमेदवारांनी बारावीची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र व इंग्रजी हे विषय घेऊन कमीत कमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा १९ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ सप्टेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय हवाई दलाची जाहिरात पाहावी अथवा हवाई दलाच्या http://www.indianairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील अर्ज साध्या टपालाने प्रेसिडेंट, सेंट्रल एअरमन सिलेक्शन बोर्ड, पोस्ट बॉक्स नं. ११८०७, नवी दिल्ली- ११००१० या पत्त्यावर २२ सप्टेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

भारतीय संरक्षण अकादमी खडकवासला येथे कर्मचाऱ्यांच्या १३० जागा  
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली राष्ट्रीय संरक्षण अकादमी- खडकवासलाची जाहिरात पाहावी अथवा अकादमीच्या http://www.nda.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज आवश्यक त्या तपशीलासह आणि कागदपत्रांसह ‘दि कमांडंट, नॅशनल डिफेन्स अकादमी, एनडीए- खडकवासला, पुणे- ४११०२३’ या पत्त्यावर
२५ सप्टेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

संरक्षण दलात अभियंता होऊ इच्छिणाऱ्यांसाठी संधी
अर्जदार अभियांत्रिकी पदवी-पूर्व वर्षांचे विद्यार्थी असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २४ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २८ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्य दलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २५ सप्टेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.

‘इस्रो’च्या सॅटेलाइट सेंटर, बंगळुरू येथे तंत्रज्ञांच्या ६५ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इलेक्टॉनिक मेकॅनिक, फिटर, वायरमन, सुतारकाम, प्लंबर, मोटर मेकॅनिक, टर्नर, ग्राइंडर यासारखी पात्रता पूर्ण
केलेली असावी.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित झालेली ‘इस्रो’ची जाहिरात पाहावी अथवा ‘इस्रो’च्या http://www.isro.gov.in या  संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २६ सप्टेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.

‘सिडको’मध्ये उपनियोजनकारांच्या १७ जागा
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज व्यवस्थापक (कार्मिक), दुसरा मजला, कार्मिक विभाग, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ या पत्त्यावर
२६ सप्टेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत. अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली ‘सिडको’ची जाहिरात पाहावी अथवा सिडकोच्या http://www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला
भेट द्यावी.

राजा रामण्णा सेंटर फॉर अॅडव्हान्सड् टेक्नॉलॉजी, इंदोर येथे तंत्र प्रशिक्षार्थीच्या २६ जागा
अर्जदार दहावी – बारावीची परीक्षा कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावेत. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इलेक्ट्रॉनिक्स, फिटर, मशिनिस्ट, वेल्डर, ड्राफ्टसमन् यासारखी पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २२ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली राजा रामण्णा सेंटर फॉर अॅडव्हान्सड् टेक्नॉलॉजी- इंदोरची जाहिरात पाहावी अथवा सेंटरच्या http://www.rrcat.gov.in या संकेतस्थळावर
२९ सप्टेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.                                               

इंडियन ऑइल कॉपरेरेशनमध्ये कनिष्ठ अभियंता साहाय्यकांच्या ११३ जागा
उमेदवारांनी केमिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदविका किंवा बीएस्सी पात्रता कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २६ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ सप्टेंबर २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ऑइल कॉपरेरेशनची जाहिरात पाहावी अथवा इंडियन ऑइलच्या http://www.paradiprefinery.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर
२६ सप्टेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.